एका डॉक्टरची गोष्ट

21 Dec 2020 17:26:43

अनंतानुभवहे पस्तीस वर्षांचा लेखाजोखा मांडणारे पुस्तक असले, तरी यातील जास्तीत जास्त भाग जनजाती क्षेत्रातील कार्याशी संबंधित आहे. मोखाडा, इगतपुरी परिसरात डॉ. अनंतराव कुलकर्णी यांनी केलेली रुग्णसेवा या पुस्तकात सविस्तरपणे येतेच, त्याचबरोबर जनजाती समाजाचे सूक्ष्म निरीक्षणही या पुस्तकात जागोजागी दिसते. ‘वनवासी माणसाला एकदाच मरण येतेहा प्रसंग रेखाटताना जनजाती क्षेत्र आणि नागरी/शहरी क्षेत्र यांतील ताणतणावावर डॉ. कुलकर्णी सहजपणे भाष्य करतात. जनकल्याण रक्तपेढीची महाराष्ट्र साखळी निर्माण करताना आलेले असंख्य अनुभव डॉक्टर या पुस्तकात नमूद करतात. रक्तपेढ्या उभारणारे असंख्य कार्यकर्ते, डॉक्टर यांचे अनुभव या पुस्तकात वाचायला मिळतात.

book_1  H x W:

आज
वैद्यकीय क्षेत्रातील अनेक सेवा-सुविधा आणि विविध आजारांविषयीचे तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध असतात. ग्रामीण भागातही तातडीच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध होत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. पण तीस-पस्तीस वर्षांपूर्वी जेव्हा वैद्यकीय सेवा उपलब्ध होणे जिकिरीचे होते, अशा काळात वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून थेट जनजाती क्षेत्रात दाखल होणार्या एका सेवाभावी डॉक्टरने पस्तीस वर्षे कशी सेवा केली आणि त्याचा काय परिणाम झाला, हे समजून घ्यायचे असेल तरअनंतानुभवहे डॉ. अनंत कुलकर्णी यांचे पुस्तक वाचायला हवे. रूढार्थाने हे त्यांचे आत्मकथन नाही. त्यांनी 1980पासून वैद्यकीय क्षेत्रात जे काम केले, त्याचा लेखाजोखा या पुस्तकात मांडला आहे. संघसंस्कारात वाढलेला एक तरुण वैद्यकीय शिक्षण पूर्ण करतो आणि आपल्या ज्ञानाला सेवाभावाची जोड देत जनजाती क्षेत्रात काम करतो. पुढे याच कामाचा विस्तार विविध पातळ्यांवर होतो. या पुस्तकाची प्रस्तावना लिहिताना डॉ. अशोक कुकडे यांनी हा धागा खूप बारकाईने उलगडून दाखवला आहे. डॉ. कुकडे लिहितात - ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघात व्यक्तिगत जीवन पूर्णपणे बाजूस सारून पूर्णवेळ काम करणार्याला प्रचारक म्हणतात. डॉ. अनंतराव कुलकर्णी हे असे प्रचारक कधीच नव्हते. दीर्घकाळ कुठलेही वेतन घेता वैद्यकीय व्यवसाय करता सामाजिक सेवेचे व्रत आचरणात आणत अनंतरावांनी गेल्या 35-40 वर्षांत रक्तपेढ्या, आरोग्य रक्षक, दाई प्रशिक्षण, रुग्णमित्र, रुग्णोपयोगी साहित्य केंद्र असे वैद्यकीय क्षेत्रात बहुविध आयामांचे प्रकल्प देशभर उभे केले. अनंत हालअपेष्टा सहन करत, परंतु दृढ निश्चयाने त्यांची वाटचाल सुरू राहिली.’


अनंतानुभव या पुस्तकाच्या एकूण सोळा प्रकरणांतून डॉ. कुलकर्णी यांच्या पस्तीस वर्षांच्या सेवाभावाचा आढावा घेताना त्यांचे कुटुंब, नातेवाईक, सहकारी, संघ-अधिकारी, संस्था-संघटनांचे पदाधिकारी यांचा यथोचित उल्लेख केला आहे. त्यामुळे हे कथन व्यक्तिकेंद्रित होता समूहकेंद्री झाले आहे. डॉ. अनंतराव कुलकर्णी आपल्या मनोगतात नम्रपणे सांगतात कीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेला दृष्टीकोन, आईवडिलांनी केलेले संस्कार यामुळे शहरी भागात निखळ पैसे कमावण्यासाठी वैद्यकीय व्यवसाय करता ग्रामीण, जनजाती भागातील वंचित उपेक्षित बांधवांसाठी आपले वैद्यकीय ज्ञान उपयोगात आणावे, असा विचार शिकत असल्यापासून माझ्या मनात येत होता. तशी उदाहरणे मी सभोवताली पाहत होतो. याचा मला आज अभिमान वाटतो. माणूस आणि संपत्ती यांचा नेमका अर्थ जीवनाच्या वाटचालीच्या सुरुवातीलाच मला समजला, हे माझे भाग्यच म्हणायला हवे. माझ्या पस्तीस वर्षांचा सार्वजनिक जीवनातला प्रवास विविध अनुभवांनी भरलेला आहे, अनेक प्रकल्पांच्या उभारणीने समृद्ध झालेला आहे, अनेक प्रकारच्या, अनेक स्वभावाच्या माणसांनी त्याची समृद्धता वाढवली आहे. हे सारे मांडून त्यातून नव्या वैद्यक पदवीधरांना काही प्रेरणा मिळावी, हा खरे पाहता या लेखनामागचा उद्देश आहे.’ अनंतानुभव हे पुस्तक व्यक्ती-गुणगान करणारे नसून ज्यांना व्रतस्थपणे, निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करायची आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक रोडमॅप आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अनंत कुलकर्णी यांनी ज्या निष्ठेने खडतर परिस्थितीत सेवा कार्य उभे केले, ते पाहता नव्या पिढीसाठी ते आयडॉल ठरतात.

अनंतानुभवहे पस्तीस वर्षांचा लेखाजोखा मांडणारे पुस्तक असले, तरी यातील जास्तीत जास्त भाग जनजाती क्षेत्रातील कार्याशी संबंधित आहे. मोखाडा, इगतपुरी परिसरात डॉ. अनंतराव कुलकर्णी यांनी केलेली रुग्णसेवा या पुस्तकात सविस्तरपणे येतेच, त्याचबरोबर जनजाती समाजाचे सूक्ष्म निरीक्षणही या पुस्तकात जागोजागी दिसते. ‘वनवासी माणसाला एकदाच मरण येतेहा प्रसंग रेखाटताना जनजाती क्षेत्र आणि नागरी/शहरी क्षेत्र यांतील ताणतणावावर डॉ. कुलकर्णी सहजपणे भाष्य करतात. जनकल्याण रक्तपेढीची महाराष्ट्र साखळी निर्माण करताना आलेले असंख्य अनुभव डॉक्टर या पुस्तकात नमूद करतात. रक्तपेढ्या उभारणारे असंख्य कार्यकर्ते, डॉक्टर यांचे अनुभव या पुस्तकात वाचायला मिळतात. जिथे डॉक्टर पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी आरोग्य रक्षक योजना राबवत असताना पूर्वनियोजन आणि योजनेचे सकारात्मक परिणामही डॉ. अनंतराव या पुस्तकातून सांगतात. एका व्रतस्थ माणसाचा हा पस्तीस वर्षांचा प्रवास म्हणजे संघविचार प्रत्यक्षात आणण्याचा प्रवास आहे. ‘कुणी ना राहो दुबळा येथेहे ध्येय साध्य करण्यासाठी केलेला हा वैद्यकीय क्षेत्रातील प्रवास आहे. एका बाजूला सेवेचा बुरखा पांघरून जनजाती क्षेत्रात धर्मांतर करणारे, तर दुसर्या बाजूला केवळ सेवाभावाच्या आधारे काम करताना आपले आयुष्य पणाला लावणारे, अशा विषम परिस्थितीत डॉ. अनंतराव कुलकर्णी यांनी मोखाडा तालुक्यात कामात सुरुवात केली आणि केवळ पस्तीस वर्षांच्या कालखंडात अनेक पथदर्शक प्रकल्प सुरू करून वैद्यकीय सेवा क्षेत्रात काम कसे करावे याचा आदर्श निर्माण केला.

अनंतानुभव हे आत्मकथन नसले, तरी डॉ. अनंतराव कुलकर्णी यांच्या मन:पटलावरची कंपने या पुस्तकात खूप चांगल्या पद्धतीने मांडली गेली आहेत. पुस्तकाचे शब्दांकन आणि संपादन करणार्या सुधीर जोगळेकर यांना याचे श्रेय दिले पाहिजे. प्रवाही तरीही सहजसुलभ लेखनशैली ही पुस्तकाची जमेची बाजू आहे. प्रकाशक रवींद्र घाडपांडे यांनी उत्तम निर्मिती केली आहे. अडीचशे पानांचा हा ऐवज म्हणजे अनाम सेवासाधकाला प्रकाशझोतात आणण्यासाठीचा यशस्वी प्रयत्न आहे. या पुस्तकात डॉ. अनंतराव कुलकर्णी यांचा चित्ररूप जीवनपट मांडला असून त्यातूनही कार्याची व्याप्ती लक्षात येते.

पुस्तकाचा समारोप करताना डॉ. कुलकर्णी लिहितात - ‘गीता प्रत्येक जणच वाचतो, परंतु उपनिषदे काही जणच वाचतात. संघाची प्रार्थना म्हणणारेदेखील कोटीच्या संख्येत आहेत. त्यातलेअभ्युदयआणिनिःश्रेयसहे दोन शब्द आज वास्तवात आल्यासारखे वाटतात. अभ्युदयाचा अर्थ आयुष्यात समृद्धी, उत्कर्ष, भरभराट, मंगल कल्याण, आनंद यांची अनुभूती घेण्याचा, तर निःश्रेयसचा अर्थ जिवंतपणी मुक्ती आणि मोक्ष याची अनुभूती घेता आल्याचा. हे तत्त्वज्ञान प्रत्यक्षात आचरणात आणणारी मोक्ष-मुक्ती अनुभवणारी जिवंत उदाहरणे मी इथेच पाहिली. मी सर्वार्थाने समृद्ध झालो. आणखी काय सांगू, काय लिहू आयुष्याविषयी!!’

एका सेवाभावी डॉक्टरची ही गोष्ट नव्या पिढीला मार्गदर्शक ठरेल, याची खात्री वाटते.

लेखक : डॉ. अनंत कुलकर्णी

शब्दांकन : सुधीर जोगळेकर

प्रकाशक : स्नेहल प्रकाशन, पुणे

पृष्ठसंख्या : 252

मूल्य : रु. 300/-

Powered By Sangraha 9.0