महाराष्ट्राच्या विकासाचा चेहरा

28 Oct 2020 17:14:29

राजकीय जीवनात जो नेता स्वत:च्या कर्तृत्वावर उभा असतो, त्याच्या पदरात नियती यशाचे दान टाकतेच, असा अनुभव आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या रूपाने ते दान देवेंद्रजींच्या पदरात पडणे हे महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीने महत्त्वाची हिताची बाब ठरणार आहे.

  devendra fadnvis_1 &

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात असे कोणी सांगितले असते, तर ज्याला महाराष्ट्राचाय राजकारणाची तोंडओळख आहे त्यानेही विश्वास ठेवला नसता. एकतर त्यांची जात आणि दुसरा प्रदेश. महाराष्ट्रातील राजकीय नेतृत्व हे पश्चिम महाराष्ट्राचे किंवा ज्यांच्यावर पश्चिम महाराष्ट्रातील नेत्याची मर्जी आहे त्यांनीच करायचे, हा महाराष्ट्रातील राजकारणाचा अलिखित नियम. व्यक्तिश: देवेंद्रजींबाबत बोलायचे, तर नागपूरबाहेर त्यांना फारसा राजकीय पाया नव्हता. त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले, तेव्हा ते किती काळ टिकणार याचीच चर्चा पक्षात आणि पक्षाबाहेर सुरू होती. परंतु ते या चर्चेला पुरून उरले आणि गेल्या पाच वर्षांत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय जीवनावर एवढा प्रभाव निर्माण केला की, महाराष्ट्रात भाजपाचा अन्य मुख्यमंत्री चालेल, पण देवेंद्रजी नको एवढी राजकीय दहशतत्यांनी निर्माण केली आहे. देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री बनले तर महाराष्ट्रातील आपले राजकीय अस्तित्त्व प्रभावहीन होत राहील, याची भीती महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्यामध्ये राहिली आणि ते मुख्यमंत्रिपदावर नसले, तरी आपल्या विरोधकांच्या मनात असे स्थान निर्माण करण्याइतका प्रभाव निर्माण करणे हेच त्यांचे मोठे राजकीय यश आहे, असे मी मानतो.

देवेंद्रजींचे वैशिष्ट्य म्हणजे स्वत:चे हे स्थान निर्माण करत असताना त्यांनी जातपात अन्य कोणताही आधार घेता महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रमीण विकासाचा आराखडा आपल्या डोळ्यासमोर ठेवला आणि त्या आधारे आपली राजकीय वाटचाल सुरू केली. गेल्या वर्षी ऑक्टोबर २०१९ रोजी विवेकच्या व्यासपीठावरून देवेंद्रजींशी महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या उद्योजकांचा सामाजिक कार्यकर्त्यांचा खुला संवाद झाला. त्या वेळी त्यांना विचारलेल्या प्रश्नांपैकी कोणत्याही प्रश्नाची कल्पना त्यांना दिलेली नव्हती. हातात कागदाचा तुकडाही घेता, कोणाशीही सल्लामसलत करता देवेंद्रजींनी या प्रश्नांना तपशीलवार उत्तरे दिली. यावरून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या प्रश्नावर त्यांची किती पकड आहे, याची श्रोतृवर्गाला जाणीव झाली.


devendra fadnvis_1 & 

शेती, सिंचन, ऊर्जा, बीडीडी चाळ, धारावी पुनर्विकास, रोजगार, पर्यटन, रस्ते वाहतूक, जनव्यवस्थापन इत्यादी गोष्टींवर देवेंद्रजींना प्रश्न विचारले गेले. देवेंद्रजींनी आवश्यक त्या आकड्यांनुसार त्यांची उत्तरे दिली होती. त्यातून त्यांची विकासाची दृष्टी आणि काम करण्याची धमक दिसून येते.

वास्तविक पाहता देवेंद्रजी ज्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा कोकण, . महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देश, मुंबईसारखे महानगर या विभागांच्या विविध प्रकारच्या प्रश्नांबाबत माहीतगार नव्हते. त्या सर्व विभागातील प्रश्न एवढे भिन्न आहेत की हे समजून घ्यायलाच त्यांचा काही काळ गेला असता. त्यातच त्यांचे स्थान अस्वीकार करण्याकरता अनेक प्रकारचे प्रयत्न चालू होते. आंदोलने होत होती. जो सहकारी मित्रपक्ष होता, तो आपले राजकीय अस्तित्त्व सिद्ध करण्याकरता रोज नवनव्या कटकटी निर्माण करत होता. या पार्श्वभूमीवर नंतरच्या दीड-दोन वर्षांत महाराष्ट्रातील विकासकामाने जी गती घेतली होती, ती तशीच राहिली असती तर आज महाराष्ट्राचे वेगळे चित्र पाहायला मिळाले असते.

वास्तविक पाहता त्यांच्यासारख्या नव्या राजकीय नेत्याची पहिली पाच वर्षे पायाभरणीत जातात त्याचे खरे परिणाम पुढील पाच वर्षांत दिसायला लागतात. देवेंद्रजींच्या बाबतीत नियतीचा खेळ असा खेळला गेला की, त्यांना ती संधी मिळाली नाही; परंतु कोरोनाच्या काळात महाराष्ट्राच्या सर्व भागात त्यांनी जो प्रवास केला आणि त्याला लोकांनी जो प्रतिसाद दिला, तो पाहिला तर महाराष्ट्रातील सर्व भागातील जनतेला त्यांच्याबद्दल किती आस्था, प्रेम विश्वास आहे याची प्रचिती येते. जात, पात या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या खर्या विकासाचे राजकारण केवळ तेच करू शकतात, अशा प्रकारचा विश्वास त्यांनी जनमानसात मिळवला आहे. त्यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली, तर तो विश्वास खरा करून दाखवतील आणि मग आपल्या राजकीय अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, म्हणून त्यांच्या द्वेषाचे राजकारण सुरू आहे. परंतु ग्रहणकाळात सूर्याचे तेज मंदावलेले दिसले, तरी ती कायमची अवस्था नसते. राजकीय जीवनात जो नेता स्वत:च्या कर्तृत्वावर उभा असतो, त्याच्या पदरात नियती यशाचे दान टाकतेच, असा अनुभव आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या रूपाने ते दान देवेंद्रजींच्या पदरात पडणे हे महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीने महत्त्वाची हिताची बाब ठरणार आहे.

 

Powered By Sangraha 9.0