बाबरी ढाचा पाडला यांचे दुःख वाटणारे जिथे बाबरी ढाचा उभारण्यात आला तेथे आधी मंदिर होते हे मान्य करत नाहीत. कारण हे मान्य केले, तर मुस्लीम समाजाचे लांगूलचालन कसे करता येईल? बाबरी ढाचा हा मुस्लीम समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय नव्हता, कारण त्या वास्तूत कधी नमाज पढला जात नव्हता. मात्र 'चहापेक्षा किटली गरम' याच न्यायाने मुस्लीम समाजापेक्षा त्या समाजाला गृहीत धरणारे जास्त आक्रमक होते. बाबरी ढाचा जमीनदोस्त करणे म्हणजे मुस्लीम समाजावर आघात आहे असा या मंडळींनी सातत्याने प्रचार केला. मतांसाठी मुस्लीम समाजाची तळी उचलणाऱ्या या मंडळींना बदललेले मुस्लीम मानस कळले नाही.
बाबरी ढाच्याच्या नावाने या मंडळींनी गेली सत्तावीस वर्षे आपली दुकाने चालवली होती.
या खटल्यातील मुस्लीम पक्षकार इक्बाल अन्सारी यांनी निकालानंतर प्रतिक्रिया देताना "यापुढे वाद नकोत, हिंदू-मुस्लीम समाजाने भावाभावाप्रमाणे राहिले पाहिजे" असे मत व्यक्त केले आहे. जो पक्षकार होता, त्याने न्यायालयाचा निर्णय मान्य केला आहे. मात्र ज्यांनी रामजन्मभूमी मुक्ती लढा आणि बाबरी ढाच्याचे पतन केवळ राजकीय खेळीसाठी वापरले, त्यांची मळमळ सुरू झाली आहे. बाबरी ढाचा पाडला यांचे दुःख वाटणारे जिथे बाबरी ढाचा उभारण्यात आला तेथे आधी मंदिर होते हे मान्य करत नाहीत. कारण हे मान्य केले, तर मुस्लीम समाजाचे लांगूलचालन कसे करता येईल? बाबरी ढाचा हा मुस्लीम समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय नव्हता, कारण त्या वास्तूत कधी नमाज पढला जात नव्हता. मात्र 'चहापेक्षा किटली गरम' याच न्यायाने मुस्लीम समाजापेक्षा त्या समाजाला गृहीत धरणारे जास्त आक्रमक होते. बाबरी ढाचा जमीनदोस्त करणे म्हणजे मुस्लीम समाजावर आघात आहे असा या मंडळींनी सातत्याने प्रचार केला. मतांसाठी मुस्लीम समाजाची तळी उचलणाऱ्या या मंडळींना बदललेले मुस्लीम मानस कळले नाही. भारतात आता असणारा मुसलमान हा १९४८ सालचा नाही. २०२० सालचा राष्ट्रीय विचार त्याने आत्मसात केला आहे. म्हणूनच रामजन्मभूमीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुस्लीम समाजाने त्या निकालाचे स्वागत केले होते आणि काल आलेल्या निकालानंतरही तशाच प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुस्लीम समाज इथल्या मातीत रुजलेल्या संस्कृतीचा आणि परंपरांचा स्वीकार करत आहे, याची ही प्रचिती आहे. भलेही उपासना पद्धती वेगळी असेल, पण या देशाशी, या मातीशी आपले नाते आहे हे मुस्लीम समाज मान्य करतो आहे, हे चित्र एका बाजूला आहे; तर आपणच मुस्लीम समाजाचे तारणहार आहोत असे समजणारे वेगळ्या जगात वावरत आहेत. आणि म्हणून काल आलेल्या निकालानंतर ते मुस्लीम समाजाला उत्तेजित करणारी भाषा बोलत आहेत. बाबरी ढाचा जमीनदोस्त होणे ही केवळ हिंदू समाजाच्या दृष्टीने नव्हे, तर भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. या एका घटनेने इतिहास घडवला आहे. या इतिहासाचे आणखी एक पान कालच्या निकालाने लिहिले गेले आहे.