जगन्नाथाचा शैक्षणिक रथ

13 Aug 2019 16:58:39



महाराष्ट्रात गेली दहा वर्षे विद्यार्थी विकास योजनेच्या माध्यमातून काम चालत असून गुणवंत आहे
, पण आर्थिक क्षमता नाही अशा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेचे वैशिष्टय असे की कोणतेही अर्ज न मागवता संपर्क आणि प्रत्यक्ष भेटीतून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. गेल्या दहा वर्षांत चारशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मदत करणऱ्या या योजनेविषयी माहिती, जी तुम्हालाही या योजनेत सहभागी होण्याची प्रेरणा देईल.

मागच्या आठवडयात एक बातमी वाचली. धाराशिव जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याला त्यांच्या गुणवत्तेच्या बळावर मेडिकलला प्रवेश मिळालापण केवळ आर्थिक क्षमता नसल्यामुळे त्याचा प्रवेश अडचणीत आला आहे. हे झाले एक प्रातिनिधिक उदाहरण. असे असंख्य विद्यार्थी असतीलज्यांच्याकडे गुणवत्ता आहे पण आर्थिक क्षमता नाहीत्यांनी काय करायचेआज शिक्षण महाग झाले आहेत्याचप्रमाणे गुणवत्तापूर्ण क्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही वाढ झाली आहे. अशा वेळी ज्यांची आर्थिक क्षमता आहे ते पुढे निघून जातात आणि क्षमता नाही ते मन मारूनगुणवत्ता असूनही केवळ आर्थिक क्षमता नाही म्हणून कमी दर्जाचे आणि कमी खर्चाचे शिक्षणक्रम निवडतात. ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे पण क्षमता नाहीअशा विद्यार्थ्यांना मदत करणारी एक योजना गेली दहा वषर्े महाराष्ट्रात चालवली जात आहे. या योजेअंतर्गत गेल्या दहा वर्षांत चारशे विद्यार्थांना सात कोटी रुपयांहून अधिक मदत केली गेली आणि तीही कोणताही गाजावाजा न करता. 'विद्यार्थी विकास योजनाअसे तिचे नाव. 'सेवा सहयोग फाउंडेशननावाच्या सामाजिक क्षेत्रातील मान्यताप्राप्त संस्थेच्या मदतीने ही योजना चालते.

मुळात ही कल्पना रवींद्र कर्वे यांची. ठाणे जनता सहकारी बँकेतून उच्चपदावरून निवृत्त होण्यापूर्वीच आपण शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात काम करायचे असा निर्णय त्यांनी घेतला होता. आरोग्य क्षेत्रातील काम रवींद्र कर्वे नाना पालकर रुग्णसेवा समितीच्या माध्यमातून करत आहेतच. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रासाठी विद्यार्थी विकास योजनाही त्यांनी तयार केली व निवृत्तीपूर्वी काही प्रमाणात कामही सुरू केले आणि निवृत्तीनंतर या कामाला व्यापक रूप देत आपले मित्र, परिवार या कामला जोडत कामाला अधिक गती दिली.

 
Seva Sahayog Foundation

 Sb Ac 003110100073069

 Rtgs / Neft / Ifsc Code - Tjsb0000003

 TJSB,naupada br

या योजनेचे वैशिष्टय असे की आर्थिक मदतीसाठी कोणतेही अर्ज मागवले जात नाहीत. महाराष्ट्रभर पसरलेल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गुणवंतांचा शोध घेतला जातो. त्याच्या घरी जाऊन परिस्थितीचा अंदाज घेतला जातो. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी दहावीला नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण, बारावीला एेंशी टक्के गुण आणि सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये प्रवेश मिळण्याइतपत गुण अपेक्ष्ाित असतात. अशी गुणवत्ता असणाऱ्या पण आर्थिक क्षमता नसलेल्या खरोखरीच्या गुणवंतांना संस्था गेली दहा वर्षे मदत करत आहे. सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात 287 विद्यार्थ्यांना एक कोटी चाळीस लाख रुपयांची मदत दिली गेली असून आता महाराष्ट्राच्या सव्वीस जिल्ह्यांत या संस्थेचा विस्तार झाला आहे.

 साधारणपणे व्यवसायिक शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही मदत होत असते. त्यामुळे एका विद्यार्थ्यांला कमीत कमी चार आणि जास्तीत जास्त सहा वर्षे तरी मदत करावी लागते. गेल्या दहा वर्षांत ज्या चारशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलाते आता आपले शिक्षण पूर्ण करून नोकरी-व्यवसायाला लागले आहेत. त्यांनीही आता या योजनेसाठी आपले आर्थिक योगदान देण्यास सुरुवात केली आहेही आनंदाची बाब म्हणायला हवी.

ही योजना यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रभरात चाळीस कार्यकर्त्यांचा समूह कार्यरत असून ते या योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांचा शोध घेतात आणि पुढे त्या विद्यार्थ्यांशी, त्याच्या कुटुंबाच्या संपर्कात राहतात. केवळ शैक्षणिक फीसाठी या याोजनेतून मदत केली जाते असे नाही, वसतिगृह अशा गोष्टीसाठीही मदत केली जाते. ज्यांना अशी मदत दिली जाते, त्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाते आणि दर सहा महिन्यांनी त्याचा आढावा घेतला जातो.

संपर्क :
- सेवा सहयोग फाऊन्डेशन

306 तुलशी श्याम सहकारी गृहनिर्माण सोसायटी

पंजाब आणि सिंध बॅकेच्या वर,तीनहातनाका.ठाणे (प) 400604


 

  

केवळ विद्यार्थ्यांना मदत देण्यापुरते या संस्थेचे काम मर्यादित नसून ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या मुलांना अत्याधुनिक शिक्षण मिळावे यासाठीही काम केलेजाते. आतापर्यंत पाच शाळांच्या इमारतींची उभारणी आणि संगणकीकरण संस्थेच्या माध्यमातून केले आहे.

एखादी सेवाभावी संस्था विकसित होते ती पारदर्शक व्यवहार आणि स्नेहपूर्ण संबंध यामुळे. सेवा सहयोगअंतर्गत चालणारी ही योजना खूप पारदर्शकपणे चालवली जाते, म्हणूनच दानशूर व्यक्तींनी या संस्थेकडे आजवर सात कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केली आहे. योग्य व्यक्तीपर्यंत मदत पोहोचवण्याची शंभर टक्के खात्री आपल्या कामातून निर्माण करण्यात सर्वच कार्यकर्त्यांना यश आले आहे. गेली दहा वर्षे ही योजना चालू असली, तरी या योजनेवर होणारा प्रशासकीय खर्च शून्य आहे. कार्यालय, फोन, प्रवास यावर होणारा खर्च कार्यकर्ते स्वतः करत असल्यामुळे संस्थेवर त्याचा भार पडत नाही.

 

आगामी काळात अन्य विद्याशाखांसाठी आणि कौशल्य विकास शिक्षणासाठीही मदत करण्याचा संस्थेचा मानस आहे. ही योजना म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे. असंख्य अदृश्य हातांनी तो ओढला जात आहे. म्हणूनच गुणवंतांना आर्थिक कारणाने आपले शिक्षण थांबवण्याची वेळ येत नाही. आपणही हा जगन्नाथचा रथ पुढे घेऊन जाण्यास मदत करू शकता. आपल्या मदतीतूनच आर्थिकदृष्टया कमजोर गटातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार आहे.

 

सदस्यांची यादी

ठाणे ः रवींद्र कर्वे - 9323234585

अरुण करमरकर -9321259949

राजू हंबर्डे - 9869275029

महेश वैद्य - 8976658824

कल्याणः ज्ञानेश्वर गोल्हे - 9833819237

रायगड ः महादेव जाधव - 9049656520

07040530430

रत्नागिरी ः श्रध्दा फडके - 9421590802

नाशिक ः प्रकाश भिडे - 9833729622

ज्ञानेश्वर चिखले - 9420367367

सिंधुदुर्ग ःप्रसाद देवधर -9422596500

गणेश कुसे-9403938234

सांगली ः श्रीकांत पटवर्धन - 9225825399

कोल्हापूर ः विद्यानंद देवधर - 9822325136

मुंबई ः श्रीराम नाखरे 09987797617

पुणे ः सुनील यादव - 9822411189

लातूर ः प्रदीप नणंदकर - 9422071666

जळगाव ः रत्नाकर पाटील -9405444627

सोलापूर ः माधव देशपांडे - 9049007450

वर्धा ः भूपेंद्र शहाणे - 9822200918

औरंगाबाद ः मनोज पत्की - 9422206081

धुळे/नंदुरबार ः भीमसिंग राजपूत - 9422735841


Powered By Sangraha 9.0