महाराष्ट्राचे हिंदूपण

28 Dec 2019 18:18:49

 हिंदुहित याचा अर्थ हिंदू संप्रदायाचे हित नव्हे. कारण हिंदू कधी सांप्रदायिक असू शकत नाही. हिंदू म्हणजे भारत, भारत म्हणजे भारतातील सर्व नागरिक. त्यांचे उपासना पंथ कोणते असेनात का, ते सर्व हिंदुस्थानातील हिंदू आहेत. त्यांच्या हिताचे रक्षण म्हणजे हिंदुहित. 'हिंदुहित' या शब्दाचा आहे. ज्यांना हा अर्थ समजत नाही, त्यांना आपल्याकडे पुरोगामी म्हणतात. ते काळाच्या पुढे असतात. त्यामुळे ते वेगाने काळाच्या पडद्यामागे जात असतात. नरेंद्र मोदी, आज देशातील यच्ययावत हिंदौूंंना आपले नेते वाटतात. आपल्या हितासाठी राज्यसत्ता राबविणारा राज्यकर्ता अशी त्यांची प्रतिमा झालेली आहे.
 
 
हिंदू म्हणजे भारत, भारत म्हणजे भारतातील सर्व नागरिक. त्यांचे उपासना पंथ कोणते असेनात का, ते सर्व हिंदुस्थानातील हिंदू आहेत. त्यांच्या हिताचे रक्षण म्हणजे हिंदुहित. देशपातळीवर हे हिंदुपण जपण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहे, या हिंदुत्त्वाच्या व्यापक कोंदणात महाराष्ट्रातील 'मी मराठी' आपल्याला बसविता आले पाहिजे.


hindu mh_1  H x

नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व 2014च्या निवडणुकीने सिध्द केले. नरेंद्र मोदी कधीही आपल्या भाषणात, 'हा देश हिंदूंचा आहे, हे हिंदुराष्ट्र आहे, देशाची संस्कृती हिंदू संस्कृती आहे, तिचा स्वीकार सर्वांनी केला पाहिजे,' असे कधीही म्हणत नाहीत. परंतु यापैकी काहीही न बोलता ते जे निर्णय घेतात, ज्या योजना आखतात, त्या सर्व हिंदू समाजाला राजकीयदृष्टया सशक्त करणाऱ्याच असतात. हिंदुत्वाचे राजकारण देशपातळीवर कसे करायचे, याचा चालताबोलता आदर्श म्हणजे नरेंद्र मोदी आहेत.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक

काही उदाहरणांनी हा विषय अधिक स्पष्ट होईल. 21 जून हा दिवस त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. पतंजली यांनी योगाची व्याख्या 'चित्तवृत्तीचा निरोध' अशी पतंजली यांनी केली आहे. चित्तवृत्ती चंचल असतात. त्या पाच प्रकारच्या असतात. त्या व्यक्तीला इकडे-तिकडे खेचत राहतात. योगविद्या हा त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा मार्ग आहे. ही योगविद्या, हिंदू योगविद्या आहे. पण नरेंद्र मोदी तसे कधी बोलत नाहीत. योग याचा अर्थच हिंदू संस्कृती, हिंदू विचार आणि हिंदू जीवनमूल्य, असा आहे. त्यांनी योग लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला. जो योगसाधना करायला लागला, तो आपोआपच हिंदुत्वाची साधना करू लागतो.

राज्यघटनेचे 370कलम काश्मीरमधील हिंदूंवर घोर अन्याय करणारे होते. देशातील सर्व हिंदूंवर त्याहूनही मोठा अन्याय करणारे होते. काश्मीर मुसलमानांसाठी, तेथे अन्यांना प्रवेश नाही. म्हणजे हिंदूंना प्रवेश नाही. असा त्याचा अर्थ होता. हिंदूंच्या देशात हिंदूंना प्रवेश नाही. हे काम पं. नेहरू यांनी केले. मोदींनी दुसऱ्यांदा सत्तेवर येताच या कलमाचे 'कलम' करून टाकले. देशातील एकूण एक हिंदू सुखावला. दूरचित्रवाहिन्यांवर माकडउद्गार काढणारे सोडले, तर 370कलम गेल्याचे कुणालाही कसलेही दुःख नाही. 370कलमासाठी रडणाऱ्यांना 70 वर्षांत भरपूर भत्ते मिळाले. त्यामुळे त्यांचे अश्रू 'भत्तेअश्रू' होते. नरेंद्र मोदी यांनी तिहेरी तलाक बेकायदेशीर ठरविला. सर्व मुस्लीम भगिनी प्रसन्न झाल्या. आयोध्येचा निकाल हिंदूंच्या बाजूने लागला. हिंदूंच्या आनंदाला पारावार राहिला नाही. पुलवामा येथे सैनिक मारले गेले. नरेंद्र मोदी यांनी बालाकोटवर हल्ला करून पाकिस्तानचा दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून टाकला.

 

हे सर्व जे काही झाले, त्याला हिंदुहिताचे राजकारण असे म्हणतात. हिंदुहित याचा अर्थ हिंदू संप्रदायाचे हित नव्हे. कारण हिंदू कधी सांप्रदायिक असू शकत नाही. हिंदू म्हणजे भारत, भारत म्हणजे भारतातील सर्व नागरिक. त्यांचे उपासना पंथ कोणते असेनात का, ते सर्व हिंदुस्थानातील हिंदू आहेत. त्यांच्या हिताचे रक्षण म्हणजे हिंदुहित. 'हिंदुहित' या शब्दाचा आहे. ज्यांना हा अर्थ समजत नाही, त्यांना आपल्याकडे पुरोगामी म्हणतात. ते काळाच्या पुढे असतात. त्यामुळे ते वेगाने काळाच्या पडद्यामागे जात असतात. नरेंद्र मोदी, आज देशातील यच्ययावत हिंदौूंंना आपले नेते वाटतात. आपल्या हितासाठी राज्यसत्ता राबविणारा राज्यकर्ता अशी त्यांची प्रतिमा झालेली आहे.

देशपातळीवर हे ठीक आहे, चांगले आहे, पण महाराष्ट्राचे काय? महाराष्ट्रात हिंदुहिताचे राजकारण करणारा नेता कोण? बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत हयात होते, तोपर्यंत बाळासाहेब ठाकरे म्हणजे हिंदुहित असे समीकरण झाले होते. आता असे समीकरण राहिलेले नाही. आता उध्दव ठाकरे म्हणजे मुख्यमंत्रिपद, हे समीकरण झालेले आहे. महाराष्ट्रात हिंदुहिताचे राजकारण प्रभावीपणे करण्याची एक जबरदस्त पोकळी निर्माण झालेली आहे.

महाराष्ट्रातील काही राजकीय नेत्यांचे चेहरे जर समोर आणले तर असे लक्षात येईल की, ते कोणत्या ना कोणत्या जातीचे नेते आहेत. काही नेते वेगवेगळया जातींची समीकरणे बांधून एखादे संघटन उभे करतात, त्याला गोंडस नाव देतात, पण राजकारण मात्र जातींचेच करतात. महाराष्ट्राचे राजकारण म्हणजे जातींचे राजकारण. जातवादी राजकारणाचा गड म्हणजे महाराष्ट्र, अशी महाराष्ट्राची आज स्थिती आहे.

महाराष्ट्रातील काही नेते शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन उभे राहतात. कुणीऊसाचा प्रश्न घेतो, कुणी कांद्याचा प्रश्न घेतो, कुणी दुधाचा प्रश्न घेतो, कुणी कर्जमुक्तीचा प्रश्न घेतो, कुणी द्राक्षांचा प्रश्न घेतो. असे प्रश्न तात्कालिक असतात. तसेच ते परिस्थितीजन्य असतात. पाऊस अती झाला की नुकसान होते आणि कमी झाला तर पीके नाहिशी होतात. असे प्रश्न कायम स्वरुपाचे राजकीय संघटन उभे करु शकत नाहीत. महाराष्ट्रव्यापी राजकीय शक्तीदेखील अशा प्रश्नांतून उभी राहत नाही.

महाराष्ट्रातील जातवादी मानसिकतेला उतारा हिंदुहिताच्या राजकारणाचाच आहे. त्यासाठी अनेक प्रश्न योग्य नेत्याची वाट पाहत आहेत. महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोरांची संख्या कमी नाही. मुंबईत त्यांच्या वसत्या उभ्या राहिल्या आहेत. ससून डॉकमधून मासे घेऊन ते दारोदारी विकणारे बहुतेक बांगलादेशी असतात. त्यांना देशातून हाकलून लावले पाहिजे. ते आपले नागरिक नाहीत. त्यांना पोसण्याची आपली जबाबदारी नाही.

 

महाराष्ट्रातील गरीब वस्त्यांतून मिशनऱ्यांच्या झुंडीच्या झुंडी फिरत असतात. गरीब जनतेला लालूच दाखवून, भ्रमित करुन, त्यांचे धर्मांतर केले जाते. अगोदर छोटया घरात चर्च उभे राहते. मग हळूहळू त्याचा आकार मोठा व्हायला लागतो. मुंबईतील वस्त्या-वस्त्यांतून गेल्या पाच वर्षांत अनेक नवीन चर्चेस उभी राहिली आहेत. मातंग समाज, भटके विमुक्त, आदिवासी, यांच्यामधील धर्मांतराचे प्रमाण चिंता करावे, इतके मोठे आहे. हे धर्मांतर केवळ उपासना पध्दतीतील बदल एवढयापुरते सीमित नसते. नाव बदलते, पोशाख बदलतो, आहारदेखील बदलतो. आपल्या देवदेवता खोटया आणि राक्षसी वाटू लागतात. तशी शिकवण दिली जाते. हे सर्व भयानक आहे. त्याविरुध्द उभे राहिले पाहिजे.


धर्मांतराच्या कार्यात मुस्लीम मुल्ला-मौलवी मागे नसतात. लव जिहादचा विषय नवीन नाही. हिंदू मुलींना फसवून आणि फूस लावून मुस्लिम तरुण त्यांच्याशी निकाह लावतात. नंतर त्यांना तलाक देतात. अशी प्रकरणे देशभर गाजत आहेत. महाराष्ट्रातसुध्दा अशी प्रकरणे घडतात. पुरोगामी ती दाबून ठेवतात. ती बाहेर काढली पाहिजेत आणि त्याविरुध्द चळवळ उभी केली पाहिजे. पाकिस्तानी मनोवृत्ती म्हणजे काय
? हे हिंदूला समजते. पुरोगामी सोडून कोणताही हिंदू पाकिस्तानी मनोवृत्तीचे समर्थन करीत नाही. समर्थन तर सोडा, तो या मनोवृत्तीचा कट्टर विरोधी असतो. त्या मनोवृत्तीविरुध्द तुम्ही उभे राहा, हिंदू माणूस तुमच्या मागे आपोआप उभा राहील. या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करायला पाहिजे. त्यांची भाषणे आणि भाषा समजून घ्यायला पाहिजे.

 

असे विषय घेतले की, त्याविरुध्द उभा राहणारा जातवादी हिंदू, पंथवादी हिंदू, वटवट करायला सुरुवात करतो. त्याची चिंता करण्याचे कारण नाही. हे कंसकृत्य आहे. कंसाने अधर्म केल्याशिवाय धर्म काय आहे, हे समजत नाही. आणि मग धर्मकार्य करण्यासाठी जेव्हा कृष्ण उभा राहतो, तेव्हा लोक आपणहोउन त्याच्यामागे उभे राहतात. हे समजून घेण्यासाठी वाचले पाहिजे, श्रीकृष्णाचे चरित्र.

महाराष्ट्राचा इतिहास खूप भव्य आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे, महाराष्ट्राची स्वतःची अस्मिता आहे. ज्ञानदेव, नामदेव, तुकाराम ते गाडगेबाबा ही महाराष्ट्राची संतपरंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज ते सेनापती तात्या टोपे ही महाराष्ट्राची क्षात्रपरंपरा आहे. महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते अण्णा भाऊ साठे ही महाराष्ट्राची नवसमाजनिर्मितीची परंपरा आहे. हिंदूपण यातूनच घडलेले आहे. त्याची अभिव्यक्ती राजकारणात करता आली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले प्रत्येक स्थान स्मृतिस्थळ म्हणून विकसित केले पाहिजे. शिवराय ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. काही महत्त्वाचे किल्ले त्यांच्या वैभवाची आठवण करून देतील, अशा पध्दतीने ते नवरचित केले पाहिजेत. तेथे जाणाऱ्याला त्या इतिहासाची जिवंत आठवण करुन देणारे ते स्मृतिस्थळ झाले पाहिजे.

हीच गोष्ट पुढे राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे, संत रोहिदास, महाकवी वाल्मिकी यांच्या बाबतीतदेखील करता आली पाहिजे. यांची भव्य स्मारके ही अस्मितेची प्रतीके असतात. माणूस केवळ भाकरीवर जगत नाही. भाकरीपेक्षा त्याला त्याची इज्जत, त्याची अस्मिता अधिक प्रिय असते. देश घडविणारे, लाखो-कोटयवधी रुपये खर्च करून आपल्या देशात या अस्मितांचे जतन करतात. आमच्याकडील पुरोगामी पंडित यात धर्मवाद, मागासलेपण वगैरे पाहत असतात. पुरोगामित्वामुळे ज्याची बुध्दीच मागास झाली आहे, तो याशिवाय काय पाहणार?

एखादे भव्य-दिव्य ध्येय उभे केल्याशिवाय संकुचित कल्पना नाहिशा होत नाहीत. आज जातवादी नेते आपल्या समुदायाच्या भावना आरक्षणाच्या प्रश्नावरून सतत भडकावीत असतात. त्यांचे राजकीय दुकान चालण्यासाठी असे करणे त्यांना आवश्यक झालेले असते. हे असले टुकार राजकारण अर्थहीन करायचे असेल तर भव्य स्वप्न घेऊन उभे राहिले पाहिजे. वर ज्या महापुरुषांची नावे दिली आहेत, त्यात अनेक नावांची भर घालता येईल. स्वातंत्र्यवीर सावरकर, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, महर्षी शिंदे, विनोबा भावे या सर्वांचे स्वप्न सशक्त महाराष्ट्र आणि समर्थ भारत घडविण्याचे होते. महाराष्ट्राचे हिंदू हिताचे राजकारण म्हणजे जातीपातीविरहित राजकारण, सर्वांच्या सहभागाचे राजकारण आणि सर्वांना न्याय देणारे राजकारण असायला पाहिजे.

विकासाच्या राजकारणाचा आत्मा आपली अस्मिता असली पाहिजे. आपली पहिली अस्मिता आपल्या हिंदूपणाची आहे. मराठीपणाचा प्रादेशिक बाज तिच्यावर आहे. या प्रादेशिकपणाचा अभिमान जरूर असला पाहिजे, स्वभाषेचा अभिमान असला पाहिजे, स्वभाषेत निर्माण होणाऱ्या साहित्याचा अभिमान असला पाहिजे. हिंदुत्वाच्या व्यापक कोंदणात 'मी मराठी' आपल्याला बसविता आले पाहिजे. असे करणे म्हणजे नरेंद्र मोदी देशपातळीवर जे व्यापक हिंदुत्वाचे राजकारण करीत आहेत, त्याला पूरक असे महाराष्ट्राचे राजकारण होईल. मोदी आपल्या कर्तृत्वाने लोकप्रिय आहेत. ते आज खऱ्या अर्थाने हिंदूंच्या भावविश्वात जाऊन बसलेले आहेत. महाराष्ट्रात आज त्यांच्या नावाने मतदारांना आवाहन करून मते मागितली जातात. आपली अस्मिता जर जागृत असेल आणि ती प्रकट करण्याचे मार्ग शोधले, तर मोदींच्या मार्गाने जाऊन आपल्यालादेखील हिंदूंच्या हृदयात जागा प्राप्त करता येऊ शकते. 2019च्या निवडणुकीत सर्वाधिक मते हिंदुत्वावादी पक्षांना मिळाली. याचा अर्थ मी हिंदू आहे आणि हिंदू म्हणून मला मतदान करायचे आहे, ही भावना मतदारांमध्ये जागी झाली आहे. त्यात आणखी 10%ची वाढ आपल्या कर्तृत्वाने करता आली पाहिजे.

vivekedit@gmail.com

Powered By Sangraha 9.0