कोकण पर्यटनातलं नवं आकर्षण पितांबरी ऍग्रोटूरिझम!

24 Dec 2019 15:38:55

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात नोकरी-व्यवसाय असो की रोजच्या सांसारिक जबाबदाऱ्या, या सगळयांमधून सतत अनेक प्रकारच्या समस्या, ताणतणाव यांना प्रत्येक जण सामोरा जात असतो. कवी संदीप खरे यांच्या गाजलेल्या गीताप्रमाणेच 'दमलेल्या बापाची कहाणी' घरोघरी चालू असते. यामुळे थकलेल्या शरीराला आणि मनालाही हवा असतो थोडासा विरंगुळा. शहरातल्या गजबजाटात आपण इतरांचंच इतकं ऐकतो की आपल्याला स्वत:शी संवाद साधायलाच वेळ मिळत नाही. त्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे निसर्गसान्निध्य. तुकाराम महाराजही म्हणतात की 'तुका म्हणे होय, मनाशी संवाद आपुलाची वाद आपणांसि। वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरी॥'.


pitambari agro tourism_1& 

पण यासाठी प्रसिध्द असणारी पर्यटन स्थळेदेखील गर्दीने गजबजून गेलेली दिसतात. हेच ओळखून पितांबरीने ऍग्रोटूरिझम डिव्हिजनच्या रूपाने पर्यटन क्षेत्रात प्रवेश केला. या अंतर्गत कोकणातलं महाबळेश्वर अशी ख्याती असलेल्या दापोलीजवळच्या साखळोली इथे 55 एकराहून अधिक विस्तीर्ण जागेवर पितांबरीने 500हून अधिक दुर्मीळ औषधी वनस्पतींची, अन्य 10 हजार झाडांची आणि सुगंधी फुलांची अत्यंत सुनियोजित लागवड केली आहे. या फुलांपासूनच पितांबरीची देवभक्ती अगरबत्ती तयार करण्याचा कारखानादेखील याच ठिकाणी आहे. हे सर्व पाहणं हा अत्यंत आनंददायक आणि ज्ञानात भर टाकणारा अनुभव आहे. त्यासाठी बैलगाडीची सफर, राहण्यासाठी सुसज्ज व्यवस्था, स्वादिष्ट शाकाहारी व मांसाहारी भोजनाची सोय, विरंगुळयासाठी खेळाचं मैदान, स्वीमिंग टँक अशी उत्तम सोय पितांबरी ऍग्रोटूरिझममार्फत करण्यात आाली आहे.

शहरातल्या बिल्डिंगच्या गर्दीत मोकळं आकाश बघायला मिळणंही कठीण आहे. अशा मंडळींकरिता आनंदाची बाब म्हणजे पितांबरी फार्म्सवर लवकरच ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा.कृ. सोमण यांच्या मार्गदर्शनाखाली खास दुर्बीण बसवण्यात येणार आहे, ज्यातून शनीचं कडंदेखील बघता येऊ शकेल.

सध्याच्या काळात वेळ हा खूप महत्त्वाचा घटक असल्याने सहलीसाठी जवळचं ठिकाण शोधलं जातं. त्या दृष्टीने पाहायला गेलं तर मुंबई-दापोली हे अंतर 225 कि.मी., तर पुणे-दापोली हे अंतर 190 कि.मी. आहे. म्हणजे काही तासांत तिथे पोहोचता येऊ शकतं. कोकण रेल्वेचा पर्याय निवडणाऱ्यांसाठी जवळचं स्टेशन म्हणजे खेड.

pitambari agro tourism_1&

ग्रूप टूर आयोजित करीत असाल तर तुमच्या ठिकाणापासून पितांबरी फार्म्सपर्यंत रास्त दरात वाहनव्यवस्थादेखील आम्ही करू शकतो. त्याशिवाय दापोलीच्या जवळपासची प्रेक्षणीय स्थळं, मंदिरं, स्वच्छ समुद्रकिनारे पाहण्यासाठी आवश्यक वाहन व्यवस्थादेखील पितांबरी ऍग्रोटूरिझममार्फत सशुल्क करण्यात येते.

इथली शुध्द हवा, निसर्गाशी जवळीक आपल्याला अनेक गोष्टी नव्याने शिकवते. मन प्रसन्न करते. हे विरंगुळयाचे क्षण मनाची बॅटरी रिचार्ज करतात. आपल्यापैकी प्रत्येकालाच अशा रिचार्जची आवश्यकता असते. त्यामुळे आपल्या परिवारासह, संस्थेच्या सदस्यांसह निसर्गसहवास अनुभवण्यासाठी पितांबरी ऍग्रोटूरिझम हा पर्याय आपण नक्कीच निवडाल, अशी खात्री आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशा प्रत्येक मौसमात कोकणचं सौंदर्य वेगळं आणि पाहण्यासारखं असतं. त्यामुळे वर्षभरात कधीही तुमच्या स्वागताकरिता, आदरातिथ्याकरिता आम्ही सदैव तत्पर आहोत.

- प्रतिनिधी 

बुकिंग करण्यासाठी आमचे क्रमांक नक्की लिहून घ्या.

रोहन आंब्रे (दापोली) - 9833650644, 8451907158

सुजीत गोसावी (पुणे) - 8657307254,

हेमंत देवधर (ठाणे) - 8657307202,

अजय महाजन (ठाणे) - 8657307252

Powered By Sangraha 9.0