विशेष मुलाखत : चंद्रकांतदादा पाटील
ही विधानसभा निवडणूक तुमच्या राजकीय कारकीर्दीतील एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे. तुम्हाला संघटनेत ‘बिनपत्त्याचं पाकीट’ म्हणतात. यंदा हे पाकीट पुण्यात कोथरूडमध्ये कसं काय पोहोचलं? पाकीटालाच यंदा पुण्यात जायचं होतं, अशीही कुजबूज आहे..
प्रश्न चांगला आहे. माझ्या गेल्या चाळीस वर्षांच्या सामाजिक जीवनात माझ्याकडे वेगवेगळ्या जबाबदार्या सोपवण्यात आल्या. परंतु, असा बदल माझ्यात कधी झाला नाही. आताही होणार नाही, याची खात्री बाळगा.
मुळीच नाही. कारण, लोकांमध्ये भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत प्रचंड सकारात्मकता आहे. त्यामुळे लोकांमध्येही हीच भावना आहे की, “पक्षात काही घडलं असेल, भविष्यात काही वेगळ्या योजना पक्षाने आखल्या असतील. त्याच्याशी आपला काय संबंध? आपल्याला गेल्या पाच वर्षांत सुख, आनंद, सुरक्षितता मिळाली.” राज्यात १ कोटी ७२ लाख लोकांना या पाच वर्षांच्या काळात कोणत्या ना कोणत्या शासकीय योजनांचा लाभ मिळाला. मग ती शेतकरी कर्जमाफी असेल किंवा मराठा आरक्षणाचे लाभ असतील, शेततळे असेल, शौचालय असेल, घर असेल.. त्यामुळे लोकांचं हेच म्हणणं आहे की तुमच्या संघटनेचे अंतर्गत विषय काहीही असतील, आम्ही कमळाच्या चिन्हालाच मतदान करणार.
भाजपमध्ये इतर पक्षातून आलेल्या नेत्यांबद्दल खूप चर्चा होते आहे. नेते बाहेरच्या पक्षातून येतात आणि तिकीट मिळवतात, निष्ठावंतांना डावललं जातं. लोकसभेला असंच काहीसं झालं, आता विधानसभेलाही. उदाहरणार्थ कुलाबा, नाशिक किंवा अन्य अनेक मतदारसंघ. प्रदेशाध्यक्ष म्हणून याबाबत काय सांगाल?
सार्वजनिक बांधकाम खातं आपण गेली पाच वर्षं सांभाळत आहात. राज्यात सर्वत्र रस्त्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, ग्रामीण रस्ते.. सर्वत्र अशीच परिस्थिती आहे. केंद्रात आणि राज्यात पाच वर्षं तुमचं सरकार असतानाही राज्यावर ही वेळ का यावी?
पाच वर्षं केंद्रात आणि राज्यात सरकार असल्यामुळेच इतकी सारी कामं मंजूर झाली. ती पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. केंद्राचे २२ हजार किमीचे राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाले जे आधी ५ हजार किमी होते. त्यातील ६ हजार किमी पूर्ण झाले. ७ हजार पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. राज्याचे समजा १ लाख किमी आपण राज्य महामार्ग मानले तर त्यातील १० हजार किमीसाठी आपण प्रत्येकी ३ कोटी याप्रमाणे ३० हजार कोटी रुपये दिले. निविदा, कार्यादेश निघाले आणि कामं होऊ लागली. ग्रामीण रस्त्यांसाठी कधीच इतके पैसे दिले गेले नव्हते. या सरकारच्या कार्यकाळात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ३० हजार किमीचे रस्ते घोषित केले आणि ते पूर्ण होत आले आहेत. हाती घेतलेल्या कामांची संख्याच इतकी आहे की त्यामुळे अनेक ठिकाणी काही ना काही समस्या उद्भवल्या आहेत. परंतु, दोन वर्षांनंतर राज्यात ही स्थिती असेल की, आपल्याकडे दहा-बारा वर्षं खराब न होऊ शकणारे रस्ते निर्माण झालेले असतील.
अत्यंत कमी वयातील प्रगल्भ नेतृत्व असं मी देवेंद्र फडणवीस यांचं वर्णन करेन. सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची त्यांची तयारी असते आणि हातोटीही असते. राज्याला आगामी काळात काय हवं आहे, याची दूरदृष्टी त्यांच्यापाशी आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर दर पाच-सहा महिन्यांनी मुख्यमंत्रीबदलाची चर्चा होत राहिली, अनेकदा ती यशस्वीही झाली. परंतु, भाजप सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या काळात एकदाही असा विषय आला नाही. मंत्रीमंडळ बैठकीत भांडणं नाहीत, पक्षांतर्गत भांडणं नाहीत. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन पुढे वाटचाल करणारा, दूरदृष्टी असणारा नेता असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केला. पुढेही ते जोपर्यंत केंद्रीय नेतृत्व म्हणेल तोपर्यंत मुख्यमंत्रीपदी राहतील.
मध्यंतरीच्या शरद पवार आणि ईडीच्या प्रकरणानंतर राष्ट्रवादी आणि पवार पुन्हा चर्चेत आले आहेत. आधी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी बिकट अवस्थेत असताना आता राष्ट्रवादीला या सर्व प्रकरणातून नवं बळ मिळाल्याचं दिसतंय. पवारांच्या सभांना गर्दी होते आहे. याचा निवडणुकीत किती परिणाम होईल असं वाटतं?
२४ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्र विधानसभेचं पक्षनिहाय चित्र काय असू शकेल, याबाबत तुमचं वैयक्तिक ‘प्रेडिक्शन’ काय?
माझा असा अंदाज आहे की, २२०-२२१ जागा भाजप-शिवसेना युतीला मिळतील. कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्षा मिळून जेमतेम चाळीस जागा मिळवू शकतील. अन्य छोट्या पक्षांना आणि अपक्षांना दोन-तीन जागा मिळतीलही. परंतु, भाजप-शिवसेना युती २२० च्या खाली येणार नाहीत, हे मात्र निश्चित..
मागे वळून पाहताना केवळ थक्क व्हायला होतं. माझे वडील बच्चू पाटील यांना केवळ ‘बच्चू अप्पा पाटील’ एवढंच लिहिता येत होतं. बाकी ते पूर्ण निरक्षर होते. अशा सामान्य घरात जन्मलेला मी, आज धडाधड वाटचाल करत इथपर्यंत येऊ शकला. हे सर्व पाहिल्यावर मलाच आश्चर्य वाटतं.. की हे सगळं कसं काय जमलं..??