घडता-घडविता
सध्याची पिढी टेक्नोसॅव्ही असल्याचं कौतुक आपल्याला वाटतं. मात्र किशोरवयीन मुलं ज्या प्रकारे मोबाइलच्या आहारी जात आहेत, त्यामुळे पालक चिंताग्रस्त झालेले दिसतात. मोबाइलच्या अतिवापराचा मुलांच्या मनावर आणि शरीरावरही गंभीर परिणाम होताना दिसतो. अशा वेळी पालकांनी टोकाची भूमिका न घेता, संयमाने परिस्थिती कशी हाताळावी याबाबत मार्गदर्शन करणारा लेख.
सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मागच्या आठवडयात शेजारी राहणाऱ्या काकू मला भेटायला आल्या. त्यांच्या मुलाबद्दल त्यांना बोलायचं होतं. त्या बोलायला लागल्या, ''अगं, मी खूप हैराण झाले आहे या मोबाइलपायी. अथर्वच्या हातात सतत मोबाइल असतो. एका क्षणासाठीही मोबाइलला लांब ठेवत नाही. रात्री झोपताना, उठल्यावर, जेवताना, अभ्यास करताना सतत मोबाइल हातात लागतो. बरं, विचारलं की काय सुरू आहे? तर उत्तर येतं की ''मी काहीतरी महत्त्वाचं करतोय.'' आता याचं इतकं महत्त्वाचं काय असतं ते नाही कळत. परवा तो आंघोळीला गेला होता, तेव्हा मी गुपचुप त्याचा मोबाइल चेक केला आणि या मुलांची भाषा वाचून मी हैराण झाले. एकमेकांना शिव्या देत बोलणं, नावं ठेवणं, आणि चर्चा कसली? तर पब्जी का काहीतरी गेम आहे म्हणे, त्याची. काय करायचं गं आता याचं? कशी सोडवायची याची मोबाइलची सवय? आमचंच चुकलं की काय की, आम्ही मोबाइल फोन घेऊन दिला...'' साठेकाकू अगदी पोटतिडकीने बोलत होत्या.
'मोबाइल' सध्या प्रत्येक घराला लागलेलं ग्रहणच म्हणता येईल. एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी वापरलं जाणारं साधन हे सध्या सगळयांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलं आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठयांपर्यंत सगळेच या मोबाइलच्या अधीन झालेले आपल्याला दिसतात. लहान मुलं जेवताना व्हिडिओज/गोष्टी बघण्यासाठी, कुमारवयीन/किशोरवयीन मुलं वेगवेगळे गेम्स खेळण्यासाठी, वेगवेगळया सोशल नेटवर्किंग साइट्सवर फोटोज अपलोड करण्यासाठी, चॅटिंग करण्यासाठी सररास मोबाइल वापरताना आपल्याला दिसतात.
फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, व्हॉट्स ऍप, यू टयूब या सोशल नेटवर्किंग साइट्स, तसंच पब्जी, कॅश ऑॅफ क्लॅन यासारखे गेम्स सध्या कुमारवयीन मुलं वापरताना आपल्याला दिसतात. आपले फोटोज, व्हिडिओज अपलोड करणं, स्टेटस अपडेट करणं, त्याला किती व्ह्यूज, लाइक्स मिळतायत, कॉमेंट्स मिळतायत हे सतत चेक करत राहणं, सतत गेम्स खेळत राहणं, त्यावर चर्चा करणं, त्यावरून एकमेकांमध्ये स्पर्धा करणं या गोष्टी मुलं सतत करताना दिसतात.
मुळातच या मुलांना अगदी लहानपणापासून या सगळया गोष्टींचं एक्स्पोजर मिळाल्यामुळे ते या सगळयाच्या अधीन कधी होऊन जातात, ते आपल्याला कळतदेखील नाही.
मी मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे या वयातील मुलांच्या मेंदूची अपूर्ण वाढ, विचारांची अस्पष्टता, भावनांवर नियंत्रण नसणं, निर्णय कौशल्य अविकसित असणं आणि कुठेतरी या वयात प्रत्येक नवीन गोष्ट करून बघण्याची आतुरता ही सर्व कारणं मोबाइलच्या आहारी जाण्यास कारणीभूत ठरू शकतात आणि मग या सगळयामुळे मुलांची वागणूक, त्यांचं रुटीन बदलत चाललंय, हे पालकांच्या हळूहळू लक्षात यायला लागतं.
तुमचं मूल मोबाइलच्या किंवा इंटरनेटच्या आहारी गेलं आहे, हे ओळखण्यासाठी तुम्ही पुढील लक्षणं तपासून पाहू शकता.
मोबाइलच्या, इंटरनेटच्या व्यसनामुळे अनेक भीषण परिणाम झालेले आपल्याला दिसतात. झोपेवर परिणाम होणं, एकाग्रता कमी होणं, विचार, कृती मंदावणं, चिडचिड होणं याबरोबरच काही आजार मुलांच्या मागे लागू शकतात. यामध्ये पुढील काही आजारांचा समावेश आहे -
आता या सगळयावर उपाय काय करू शकतो, मुलांना यातून बाहेर कसं काढू शकतो, हा प्रश्न पालकांना भेडसावत असतो. आणि मग पालक काही वेळा एकदम टोकाची भूमिका घेताना दिसतात - उदा., मोबाइल काढून घेणं, इंटरनेट बंद करणं वगैरे. परंतु अशाने मुलांच्या मनात तुमच्याबद्दल राग निर्माण होऊ शकतो. तुम्ही हे त्यांच्या भल्यासाठी करत आहात, हे लक्षात न घेता तुम्ही त्यांचे शत्रू आहात ही भावना त्यांच्या मनात निर्माण होऊ शकते. यावर एकच काय तो हा उपाय असं जरी सांगता नाही आलं, तरीही काळाप्रमाणे, परिस्थितीनुसार आपण खाली दिलेले काही उपाय, काही गोष्टी आचरणात आणल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
शेवटी एक लक्षात घ्यायला हवं की, मोबाइल हे एक साधन असून जीवन नाही आणि ही गोष्ट जेव्हा आपण स्वत:ला आणि मुलांना पटवून देऊ शकू, तेव्हाच यातून योग्य मार्ग शोधणं शक्य होईल. बदल हा एका रात्रीत होत नसतो, त्यामुळे त्यासाठी संयमाने प्रयत्न करत राहणं आवश्यक आहे.
लेखिका समुपदेशक आहेत.
सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/