रेडिओ ध्वनिलहरी - संशोधन आणि परिणाम

08 Dec 2017 12:50:00

 

 

 रेडिओ ध्वनिलहरी या विद्युत्चुंबकीय लहरींचा एक प्रकार आहे. विद्युत्चुंबकीय लहरींना एका विशिष्ट उपकरणाद्वारे उत्सर्जित केले जाते. त्यापासून रेडिओ ध्वनिलहरी तयार होऊन त्याचे तरंग (wavelengths ), असेच वारंवारिता (frequency) ठरवून त्याचे प्रक्षेपण केले जात असते, त्याला विद्युत्चुंबकीय स्पेक्ट्रम असे म्हणतात. रेडिओ ध्वनिलहरींचा वापर सर्वाधिक माहिती प्रसारणासाठी केला जातो. माहिती लहरींच्या स्वरूपात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहिली जाते.

  रेडिओ ध्वनिलहरी या शब्दांनी मानवी जीवनाचे एकूणच संभाषणाची आणि  संदेशवहनाची पध्दतीच बदलून टाकली आहे. पत्रव्यवहारापासून सुरू झालेले संदेशवहन आज एका वेगळया स्वरूपात बदलले आहे. अधिक गतिशील आणि जलद संवादी बनू शकले आहे. यात सर्वात मोठा वाटा आहे तो रेडिओ ध्वनिलहरींच्या संशोधनाचा.

अधिक तांत्रिक भाषेत सांगायचे म्हटल्यास जेव्हा वायरचा शोधदेखील अपूर्ण वाटू लागला, त्या वेळी वायरलेस तंत्रज्ञानाची सुरुवात झाली ती रेडिओ ध्वनिलहरींपासून. रेडिओ ध्वनिलहरींच्या शोधामुळे पुढे ब्लूटूथ, वाय-फाय यासारख्या संशोधनात मोठी मदत मिळू शकली आहे आणि त्यामुळे जग जलद तसेच गतिशील होण्यास मदत मिळाली आहे.

रेडिओ ध्वनिलहरी म्हणजे काय ?

रेडिओ ध्वनिलहरी या विद्युत्चुंबकीय लहरींचा एक प्रकार आहे. ज्याप्रमाणे वायरच्या माध्यमातून इलेक्ट्रॉन (अणूमधील एक घटक) प्रवाहित होतो, तेव्हा विद्युत (इलेक्ट्रिक) ऊर्जा निर्माण होते, त्याचप्रमाणे विद्युत्चुंबकीय लहरी प्रवाहित होण्याने रेडिओ ध्वनिलहरी तयार होत असतात.

मायक्रोवेव्ह, क्ष-किरणे, गॅमा किरणे हेदेखील रेडिओ ध्वनिलहरींप्रमाणे विद्युत्चुंबकीय लहरींचा उपप्रकार आहेत. मात्र या सर्वांचा उपयोग वेगवेगळया कारणांसाठी केला जातो. रेडिओ ध्वनिलहरींचा मुख्य उपयोग संभाषणासाठी केला जातो. आकाशवाणी, दूरचित्रवाणी, तसेच मोबाइल फोन यांसारख्या उपकरणात संभाषणासाठी केला जातो.

विद्युत्चुंबकीय लहरींना एका विशिष्ट उपकरणाद्वारे उत्सर्जित केले जाते. त्यापासून रेडिओ ध्वनिलहरी तयार होऊन त्याचे तरंग (wavelengths ), असेच वारंवारिता (frequency) ठरवून त्याचे प्रक्षेपण केले जात असते, त्याला विद्युत्चुंबकीय स्पेक्ट्रम असे म्हणतात. रेडिओ ध्वनिलहरी या विद्युत्चुंबकीय स्पेक्ट्रममधील सर्वात मोठे तरंग असतात. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने स्पष्ट केले आहे की, रेडिओ ध्वनिलहरी या किमान 1 मिलिमीटर ते 100 किलोमीटर एवढया लांब पल्ल्याच्या असू शकतात.


 कुणी लावला याचा शोध?

जेम्स क्लार्क मॅक्सवेल नावाच्या स्कॉटलंडच्या वैज्ञानिकाने 1870 साली विद्युत चुंबकाचा सिध्दान्त मांडला होता. त्यात रेडिओ ध्वनिलहरी असू शकतात याबद्दलदेखील त्यांनी भाकीत केले होते. त्यानंतर हेन्रिच हर्ट्झ या जर्मन वैज्ञानिकाने मॅक्सवेलचा सिध्दान्तावर अभ्यास करून त्याचे भाकीत खरे ठरविले. त्यामुळेच 'हर्ट्झ' या एककात रेडिओ ध्वनिलहरींचे मापन केले जाते. एका विद्युत्चुंबकीय लहरीने एका सेकंदात कापले जाणारे अंतर म्हणजे एक 'हर्ट्झ' एवढे असते.

रेडिओ ध्वनिलहरींचा वापर सर्वाधिक माहिती प्रसारणासाठी केला जातो. माहिती लहरींच्या स्वरूपात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहिली जाते. सेंडर आणि रिसीव्हर ही दोन उपकरणे यात महत्त्वाची भूमिका निभावतात. रिसीव्हरमध्ये असलेल्या स्पीकरमध्ये जेव्हा ही लहर प्रवेश करते, त्या वेळेला चुंबकीय ऊर्जा यांत्रिक ऊर्जेत रूपांतरित होऊन ती माहिती ऑॅडिओच्या स्वरूपात उपलब्ध होत असते.

रेडिओ ध्वनिलहरींमुळे संदेशवहनाची पध्दतीच बदलून गेली आहे. यामुळे संदेशवहनात जी गती प्राप्त झाली आहे, त्यामुळे मानवी जीवनाला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

9579559645

 

Powered By Sangraha 9.0