रिओ ऑलिम्पिकच्या धमाकेदार अशा उद्घाटन सोहळयानंतर खऱ्या 'रिंग ऑफ ग्लोरी'च्या खेळांना सुरुवात झाली. भारतासाठी ऑलिम्पिकची सुरूवात ही सुखद ठरली. भारताच्या हॉकी संघाने आयर्लंड विरूध्दचा सामना जिंकून चांगली सुरुवात केली. रोटेशन पध्दतीचा वापर करून भारतीय पुरूष संघाने या सामन्यावर आपली पकड कायम ठेवली होती. 36 वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय महिला हॉकी संघानेदेखील 'चक दे इंडिया' म्हणत जपान संघासोबतचा सामना बरोबरीवर राखला. महिला हॉकी संघाचा पुढील सामना ग्रेट ब्रिटनसोबत तर भारतीय पुरूष हॉकी संघाचा पुढील सामना हा जर्मनीसोबत रंगणार आहे.
खेळाडूंना हॉकीमध्ये मिळालेले यश इतर खेळांमध्ये मात्र भारताला कायम राखता आलेले नाही. भारतीय नेमबाज हीना सिध्दू ही उपांत्य फेरी गाठू शकली नाही. पहिल्या फेरीत 380 गुणांनी ती 14व्या स्थान पटकवू शकली. त्याचप्रमाणे पुरूष एकेरी स्पर्धेत जितू रायचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले आहे. 10 मीटर एअर रायफलमध्ये त्याला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. जितू रायला 78.6 गुणांसह आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. महिला नेमबाज अपूर्वी चंदेला आणि अयोनिका पॉल यांचे 10 मी. एअर रायफलमधील आव्हान संपुष्टात आले. तिरदांजी स्पर्धेतीलसुध्दा भारतीय रिकर्व्ह महिला संघाचे आव्हानही संपुष्टात आले.भारताला टेनिस मधेही अपयशाला सामोरे जावे लागले. भारताची स्टारप्ल्येर सानिया मिर्झा आणि प्राथना ठोंबरे यांचे महिला मिश्र दुहेरीत पराभवा स्वीकाराव लागला. त्याचप्रमाणे पेस आणि बोप्पाना या जोडगोळीला आपली जादू दाखवता आली नाही. भारताचे टेनिसपटूकडून असलेल्या अपेक्षाभंग झाल्या. टेबलटेनीस मधेहि भारताला पराभव पत्करावा लागला.
दीपिका कुमारी, बोम्बायला देवी आणि लक्ष्मीराणी माझी यांची वैयक्तिक कामगिरी निराशाजनक होती. दीपिका कुमारीला शेवटपर्यंत फॉर्म गवसला नाही. भारतीय महिला तिरंदाजांनी रिकर्व्ह स्पर्धे कोलंबियाचा सेट्समध्ये 5-3 अशा गुणांनी पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. परंतू उपांत्यपूर्व फेरीत रशियन आव्हानासमोर भारतीय खेळाडू अयशस्वी ठरले .23-25 या गुणांनी रशियाने भारतीय खेळाडूंवर मात केली. त्यामुळे रिकर्व्ह सांघिक स्पर्धेतसुध्दा भारताच्या पदरी निराशाच आली.
दिग्गज खेळाडू मागच्या दारातून परत येत असताना भारताच्या नवोदित खेळाडूंनी आपल्या कामिगीरीने भारतीयांच्या अपेक्षा अजून कायम ठेवल्या आहेत.
दीपा पाठोपाठच महाराष्ट्राच्या दत्तू भोकनाल याने ऑलिम्पिकमध्ये आपली चमक दाखवली आहे. नौकानयन शर्यतीत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दत्तूने उपांत्य फेरी गाठली. 7:21:67 या वेळेत त्याने ही शर्यत पूर्ण केली. यापुढील फेरीत त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.