मातीचे परीक्षण हे ‘मातीचा प्रकार’ आणि ‘उत्पादन क्षमता’ ओळखण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. कोणत्याही ऋतूमधील पिकांची उत्पादकता ही मातीच्या सुपीकतेवर अवलंबून असते. माती परीक्षणाशिवाय अयोग्य प्रकारची व अयोग्य प्रमाणात खते दिल्यास पिकांचे फार मोठे नुकसान शेतकर्यांना सहन करावे लागू शकते. म्हणूनच अशा समस्यांवर मात करून शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी ‘पितांबरीच्या अॅग्रिकेअर’ विभागाने आपल्या विविध सेवांसोबतच शेतकर्यांना ‘माती परीक्षण’ सेवा देण्यास सुरुवात केली आहे.
व्यावसायिकदृष्ट्या शेती करायची असेल तर त्याला तंत्रज्ञानाची जोड देणे खूप महत्त्वाचे असते. शेतीसाठी लागणार्या विविध संसाधनांचा म्हणजेच माती, जमीन, पाणी, बियाणे, हवामान, इतर निविष्ठा यांचा योग्य अभ्यास करून त्यानुसार शेतीचे नियोजन केल्यास शेती नक्कीच फायदेशीर ठरू शकते. ‘पितांबरी अॅग्रिकेअर’ विभागाने शेती उद्योगात उतरण्यावेळीच आपल्या शेतीतज्ज्ञांच्या मदतीने या संसाधनांचा काटेकोर अभ्यास केला. शेतीच्या कोणत्याही कामात या गोष्टींचे अद्ययावत पद्धतीने परीक्षण करून त्यानुसार पिकांची निवड, लागवडीचे वेळापत्रक ठरवले जाते. याच पद्धतीने राज्यातील सर्व शेतकर्यांनी नियोजन करावे यासाठी ’पितांबरी अॅग्रिकेअर’ विभाग शेतकर्यांसाठी विविध उत्पादने व सेवा आणत आहे. यातीलच एक महत्त्वपूर्ण सेवा म्हणजे ’माती परीक्षण’.
’माती’ हा शेतीमधील सर्वात महत्त्वाचा घटक अर्थात 'Raw Material' आहे, असं म्हणता येईल. मातीमधील आवश्यक अन्नद्रव्ये, मातीचा सामू, मातीतील सेंद्रिय कर्ब या घटकांचा प्रत्यक्ष परिणाम शेती उत्पादकतेवर होत असतो. म्हणूनच या मातीतील प्रमाणके प्रत्येक शेतकर्याला माहीत असणे व त्यांची नियमित तपासणी करणे खूप महत्त्वाचे असते; परंतु अनेकदा माती परीक्षणाच्या बाबतीत शेतकरी उदासीन असल्याचे जाणवते. याची कारणेही समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. माती परीक्षण करणार्या प्रयोगशाळा (लॅब) या गावापासून लांबच्या अंतरावर असतात. त्यामुळे माती परीक्षणासाठी त्यांना खूप दूरपर्यंत प्रवास करावा लागतो तसेच काही प्रयोगशाळा शेतकर्यांकडून मातीचा नमुना मागवून घेतात; परंतु हा नमुना लॅबपर्यंत पोहोचून परीक्षण होईपर्यंत 15 दिवस किंवा महिन्याभराचा कालावधी उलटून गेलेला असतो व हीच वेळ शेतीतील नियोजनात अडथळा आणणारी ठरते. अशा मातीच्या नमुन्याचा चाचणीनंतर आलेला अहवाल खात्रीशीर आणि अचूक असेलच याची बरेचदा शाश्वती देता येत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पीकनिहाय नियोजन कसे करावे, खत व्यवस्थापन काय करावे याविषयी या माती परीक्षण अहवालात माहिती दिली जात नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास जमिनीचा सामू 8.0 म्हणजेच अधिक आहे हे आपणास समजते; परंतु हा सामू कमी करण्यासाठी उपाययोजना काय कराव्यात याचे मार्गदर्शन यात नसते. तसेच अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते; पण त्यानुसार खतांचा वापर कसा व किती करावा याची माहितीसुद्धा या अहवालात नमूद नसते. परिणामी माती परीक्षणाचा मूळ हेतूच साध्य होत नाही.
माती परीक्षणातील याच त्रुटींचा विचार करून, त्यावर संशोधन करून अद्ययावत अशा तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘पितांबरी अॅग्रिकेअर’ विभागाने माती परीक्षणाची सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी ’न्यूट्रिसेन्स’ नामक संस्थेसोबत पितांबरीने करार केला असून यामुळे शेतकर्यांना जलद, अचूक व वाजवी दरात माती परीक्षणाची सेवा उपलब्ध करून दिली जाते. पितांबरीकडून करण्यात येणार्या माती परीक्षणात शेतकर्यांना केवळ माती परीक्षणाचा अहवाल मिळणार नाही, तर या अहवालात जमिनीत खतवापराची सविस्तर माहितीदेखील देण्यात येणार आहे, जेणेकरून शेतकर्यांना खताची मात्रा तर समजेल, शिवाय त्यांचा अतिरिक्त खत वापरण्याचा खर्च वाचून शेतीची उत्पादकता व कार्यक्षमता वाढण्यासही मदत होऊ शकेल.
माती परीक्षण संयंत्र माती परीक्षणांतील सर्वात लहान संयंत्र आहे व याद्वारे पिकांसाठी आवश्यक अशा नत्र, स्फुरद, पालाश, ई.सी. सामू व सेंद्रिय कर्ब (NPK, pH, EC आणि OC) अशा सहा घटकांचे परीक्षण केले जाणार आहे.
माती परीक्षणाचे हे तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी या उपकरणाची तपासणी विविध अधिकृत कृषी तंत्रज्ञान संस्था व कृषी विद्यापीठांकडून करण्यात आली असून आय.सी.ए.आर. (भारतीय कृषी अनुसंधान संस्था) यांच्या शिफारशीनुसार अग्रगण्य अशा तमिळनाडू अॅग्री युनिव्हर्सिटी, कोईम्बतूरकडून प्रमाणित करण्यात आले आहे. या संस्थेच्या अहवालानुसार 90% पर्यंत अचूकता या माती परीक्षण संयंत्राकडून मिळाली आहे. आतापर्यंत 10,000 हून अधिक माती परीक्षण अहवाल या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात आले असून यांच्या अहवालानुसार शेतात खताचा वापर केल्यामुळे सरासरी 28 ते 40 टक्क्यांपर्यंत शेती उत्पादन खर्चात बचत झाल्याचे तसेच त्यांची उत्पादकता कायम राहिल्याचे आढळले आहे. त्या शेतकर्यांनी नियमित वापरापेक्षा 40% खत कमी प्रमाणात वापरल्याचे अनेक शेतकरी सांगतात. यामुळे खर्च कमी होतोच; पण त्याबरोबरच अतिरिक्त खताच्या वापरामुळे होणारी मातीची हानीदेखील टळते. असेही निदर्शनास आले आहे.
ही माती परीक्षणाची सुविधा ‘पितांबरी अॅग्रिकेअर’ विभागामार्फत दोन पद्धतीने देण्यात येत असून प्रथम शेतकर्यांकडून नमुने मागवून माती परीक्षण केले जाते. तसेच पुढील काळात थेट शेतावर जाऊन माती परीक्षण करण्याचा ‘पितांबरी अॅग्रिकेअर’ विभागाचा मानस आहे. राजापूर तालुक्यातील शेतकरी तसेच पितांबरीचे ग्राहकवर्ग अशा जवळपास 50 हून अधिक लोकांना माती परीक्षणाची सेवा ‘पितांबरी अॅग्रिकेअर’ विभागाने पुरविली असून कृषितज्ज्ञांकडून त्यांना पीक उत्पादनवाढीसंदर्भात मार्गदर्शनही मिळाले आहे. शेतकर्यांकडून माती परीक्षणासाठी प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. पितांबरीची कृषी उत्पादने घेणार्या ग्राहकांसाठी तसेच शेतकर्यांसाठी माती परीक्षणासाठी विशेष सवलत दिली जाते. पुढील काळात यामध्ये इतर अहवाल म्हणजेच दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्य परीक्षण, पाणी परीक्षण, पिकातील पानांचे परीक्षण इ. सुविधाही शेतकर्यांसाठी पितांबरीतर्फे सुरू करण्यात येणार आहेत. भविष्यात पितांबरीचे डिस्ट्रिब्युटर्स आणि नर्सरी फ्रँचायसीधारक यांच्यामार्फतही माती परीक्षणाची सेवा पुरविण्यात येणार आहे.
‘पितांबरी अॅग्रिकेअर’ विभागाने शेतीसाठी उपयुक्त विविध उत्पादने बाजारात आणली आहेत. यामध्ये पितांबरीचे ’गोमय’ सेंद्रिय खत, नीम पावडर आणि ’सुबहर’ लिक्विड फर्टिलायझर ही उत्पादने मातीचे पोषण आणि संवर्धनासाठी उपयुक्त असून माती परीक्षणादरम्यान या उत्पादनांचा आपल्या शेतात प्रभावी वापर कशा प्रकारे करता येईल याचीही माहिती शेतीतज्ज्ञांमार्फत देण्यात येते.
माती परीक्षणासाठी संपर्क साधा
भ्रमणध्वनी - 9820979166, 8779858835.
वेबसाइट - www.pitambari.com