हिंदूंमध्ये फूट पाडणारी कपटनीती

विवेक मराठी    04-Jul-2024   
Total Views |
 
rahaul gandhiराहुल गांधींचे वक्तव्य विसरण्याजोगे नाही; हसण्यावारी नेण्याजोगे तर त्याहून नाही. पंतप्रधानांना आणि अन्य राजकीय धुरीणांना त्याचा गर्भितार्थ समजला आहे. आपण आपल्या डोळ्यावरचे कातडे दूर करणार का, हा प्रश्न आहे.
  
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्ताव संमत झाल्यावर अठराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचे सूप वाजले खरे; पण या अधिवेशनातील भाषणांमुळे पुढच्या अनेक संभाव्य वादळांचा अंदाज आला.
 
 
यंदाच्या निवडणुकीनेही काँग्रेसला सत्तेपासून लांब ठेवणारा जनादेश दिला असला तरी दहा वर्षांनंतर विरोधी पक्षनेतेपद मिळणे हीदेखील त्यांच्यासाठी मोठीच उपलब्धी होती. लोकसभेतले विरोधी पक्षनेतेपद हे पंतप्रधान पदाइतके मोलाचे असते. तसा मानसन्मान असतो आणि या पदावरील व्यक्तीकडून अपेक्षाही त्याच तोलाच्या असतात. विरोधी पक्षनेता हा सत्ताधार्‍यांपेक्षा वेगळ्या राजकीय विचारधारेचा पाईक असला तरी तो देशाच्या विरोधात नसतो, असा एक समज कालपर्यंत समाजात दृढ होता. तो आजवरच्या विरोधी पक्षनेत्यांच्या वर्तनातून अधोरेखितही झाला होता. मात्र इथून पुढे विरोधी पक्षनेत्याबाबत असा समज ठेवणे हे भाबडेपणाचे लक्षण ठरू शकते. विद्यमान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावावर केलेल्या भाषणाचा वरील विधानाला संदर्भ आहे. त्यांच्या त्या भाषणातून पराभवाचे खदखदत असलेले शल्य तर डोकावत होतेच; पण त्याचबरोबर त्यांच्या हिंदूविरोधी फूत्कारातून जे विष बाहेर पडत होते ते या देशाच्या एकसंधतेवर घाव घालणारे होते.
 
 
वेश आणि एकूण देहबोली यातून ते आजवर बालबुद्धी असल्याचे दाखवत आले आहेत; पण ते खरेच तसे आहेत का, की गेल्या 10 वर्षांतल्या सत्तेच्या राजकारणामुळे, त्यांनी काढलेल्या यात्रांमुळे बाह्य बावळेपण गेले नसले तरी ते शहाणे (धूर्त, कावेबाज) झाले आहेत? त्यांच्या या भाषणातल्या मांडणीतली आक्रमकता लक्षवेधी होती आणि ऐकणार्‍याचा बुद्धिभेद करू शकेल अशी होती.
 
 
भाजपाप्रणीत रालोआला सलग तिसर्‍यांदा मिळालेल्या सत्तेने जगभरातल्या भारतविरोधी, विशेषतः भाजपा व मोदीविरोधी शक्ती अस्वस्थ आहेत. पूर्ण बहुमत मिळाले नसले तरी भाजपा हा 18 व्या लोकसभेतला सर्वाधिक जागा मिळवलेला राजकीय पक्ष आहे. त्यामुळे पुढच्या पाच वर्षांच्या सरकारच्या कारभारावरही भाजपाची पकड असेल, हे वास्तव अनेकांना डाचते आहे. हिंदुत्वाचा उघड पुरस्कार करणारे आणि त्याच वेळी देशाला जागतिक स्तरावर नव्या उंचीवर नेणारे हे सरकार जगभरातल्या अनेक भारतविरोधी राष्ट्रांच्या आणि व्यक्तींच्या डोळ्यात येते आहे. त्यामुळे त्यांनी विद्यमान सरकारला नीटपणे कारभार करू न देण्याचा विडाच उचलला आहे.
 
गेल्या पन्नास वर्षांच्या वाटचालीत भाजपाने अनेक चढउतार पाहिले आहेत आणि ते यशस्वीरीत्या पारही केले आहेत. तेव्हा संसदेत राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेने ते अस्वस्थ झाले तरी डगमगणार नक्की नाहीत; पण विरोधी पक्षनेत्याचे भाषण त्यांच्यापुरते सीमित नव्हते, तर ते त्यापलीकडे आघात करणारे होते. ज्या सहिष्णू धर्माची पताका खांद्यावर घेऊन या देशातील कोट्यवधी हिंदू मार्गक्रमण करत आहेत, त्यांना विचलित करणारे हे भाषण होते. 
 
त्याची सुरुवात खरे तर निवडणूक निकालानंतरच झाली. सर्वाधिक जागा जिंकणार्‍या भाजपाला आणि त्याच्या मतदारांना निकाल जाहीर झाल्यापासूनच पराभूताच्या मानसिकतेत जखडण्याचे प्रयत्न या शक्तींनी चालू केले आहेत आणि त्याच वेळी जागांची शंभरीही न गाठलेले काँग्रेसचे कार्यकर्ते जणू सत्ताच प्राप्त झाली आहे अशा उन्मादात वावरत आहेत. अशा वेळी काँग्रेसच्या हाती लागलेले विरोधी पक्षनेतेपद म्हणजे कोलीत मिळाल्यासारखेच. त्याची झलक पहिल्याच अधिवेशनाने दाखवली आणि धोक्याची घंटीही वाजवली आहे. हा धोका केवळ विद्यमान सरकारपुरता मर्यादित नाही. तसा असता तर फार चिंता करण्याचे कारण नव्हते, कारण निवडणुकीतील हार-जीत ही सर्वच राजकीय पक्षांसाठी अटळ, अपरिहार्य असते. गेल्या पन्नास वर्षांच्या वाटचालीत भाजपाने अनेक चढउतार पाहिले आहेत आणि ते यशस्वीरीत्या पारही केले आहेत. तेव्हा संसदेत राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेने ते अस्वस्थ झाले तरी डगमगणार नक्की नाहीत; पण विरोधी पक्षनेत्याचे भाषण त्यांच्यापुरते सीमित नव्हते, तर ते त्यापलीकडे आघात करणारे होते. या हिंदूबहुल राष्ट्रातील हिंदूंवर, त्यांच्या मानसिकतेवर आघात करणारे होते. ज्या सहिष्णू धर्माची पताका खांद्यावर घेऊन या देशातील कोट्यवधी हिंदू मार्गक्रमण करत आहेत, त्यांना विचलित करणारे हे भाषण होते. सेक्युलर असण्याचे ढोंग रचत ज्या काँग्रेसची उभी हयात अल्पसंख्याकांचे चोचले पुरवण्यात गेली त्याच काँग्रेसचे सध्याचे सूत्रधार हिंदूंमध्ये उभी फूट पाडण्याचा कट रचत आहेत. संघ, भाजपाचे हिंदुत्व वेगळे (पक्षी : हिंसक) आणि या दोघांचे समर्थक, अनुयायी नसणार्‍या हिंदूंचे हिंदुत्व वेगळे (पक्षी : अहिंसक) अशी मांडणी करत हिंदूंमध्येच भिंती उभ्या करण्याचे हे षड्यंत्र आहे. या कटामागे फक्त राहुल गांधी वा त्यांचा काँग्रेस पक्ष नाही, तर त्यांच्याबरोबर जगभरातल्या भारतविरोधी शक्ती एकवटल्या आहेत. आपला हा नवा फासा टाकण्यासाठी त्यांना राहुल गांधी यांचे व्यक्तिमत्त्व फार सोयीचे ठरले आहे. ज्यांना खिल्ली उडवायची ते चार दिवस खिल्ली उडवतील आणि गप्प बसतील; पण हे भेदाचं स्लो पॉयझन हिंदूंमध्ये एकदा खोलवर झिरपलं, की मग या देशाभोवती फास आवळणे कठीण नसेल, असा विचार या सगळ्या गँगचा आहे.
 
 
म्हणूनच राहुलची केवळ ‘बालबुद्धी’ म्हणून संभावना करत त्याच्याकडे दुर्लक्ष करणे देशाला परवडणारे नाही. त्या भोळसट मुखवट्यामागच्या लबाड, धूर्त, घातकी चेहर्‍याची सगळी कटकारस्थाने उधळून लावावी लागतील.
 
 
संसदेचे सगळे शिष्टाचार धाब्यावर बसवत त्यांनी ज्या आक्रमकपणे मांडणी केली, ती समाजातल्या काही घटकांवर प्रभाव पाडण्याइतकी लक्षवेधी होती हे मान्य करावे लागेल आणि मग त्याचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी तातडीने काही पावले उचलावी लागतील.
 
 काँग्रेस आणि त्यांच्यासोबतचे ब्रेकिंग इंडिया फोर्सेस आता हुशारीने कामाला लागले आहेत. अशा वेळी अन्यांचे कट्टर हिंदुत्व आणि काँग्रेसचे उदार हिंदुत्व अशा कोणत्याही तराजूत स्वतःला न घालता, केवळ हिंदू धर्माचा सच्चा पाईक म्हणून एकत्र येण्याची वेळ आली आहे.
 
काँग्रेस आणि त्यांच्यासोबतचे ब्रेकिंग इंडिया फोर्सेस आता हुशारीने कामाला लागले आहेत. अशा वेळी अन्यांचे कट्टर हिंदुत्व आणि काँग्रेसचे उदार हिंदुत्व अशा कोणत्याही तराजूत स्वतःला न घालता, केवळ हिंदू धर्माचा सच्चा पाईक म्हणून एकत्र येण्याची वेळ आली आहे. जाती, पंथ, राजकीय पक्ष, संघटना या आपापल्या वेगळ्या असतीलही; पण त्याच्याही वर ‘हिंदू म्हणून’ आपण सगळे एक आहोत हे कृतीतून मांडण्याची आज गरज आहे. केवळ मतपेढी म्हणून नाही, तर त्याही पलीकडे समाज म्हणून आमची ताकद अफाट आहे. ते सामर्थ्य दाखवणे, ही आज काळाची गरज आहे. ती ओळखणे आणि त्यासाठी स्वतःला तयार करणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे.
 
 
राहुल गांधी यांच्या फूत्काराने गलितगात्र व्हायचे नाही, तर सर्वसामर्थ्यानिशी प्रतिहल्ला करण्यासाठी सज्ज व्हायचे. या देशविघातक शक्तींना नमविणे, परतवून लावणे, हा या देशातल्या सर्व हिंदूंचा एककलमी आणि अग्रक्रमाने करण्याचा कार्यक्रम असायला हवा. हा विषय कोण्या एका सरकारचा नाही, तर संपूर्ण समाजाच्या डिवचलेल्या आत्मभानाशी तो जोडलेला आहे. त्यासाठी आपल्यातले औदासीन्य झटकावे लागेल. शरीरमनाची मरगळ, सुस्ती दूर करावी लागेल. या सगळ्या दोषांखाली निद्रिस्त असलेल्या हिंदुतेजाला जागे करावे लागेल.
 
 
राहुल गांधींचे वक्तव्य विसरण्याजोगे नाही; हसण्यावारी नेण्याजोगे तर त्याहून नाही. पंतप्रधानांना आणि अन्य राजकीय धुरीणांना त्याचा गर्भितार्थ समजला आहे. आपण आपल्या डोळ्यावरचे कातडे दूर करणार का, हा प्रश्न आहे.