श्रीगणेशाचे नैवेद्य
नारळ मावा रवा लाडू
साहित्य : एक वाटी ओल्या नारळाचा कीस, एक वाटी बारीक रवा, पाऊण वाटी मावा, एक वाटी पिठी साखर, एक चमचा वेलची पूड, आवश्यकतेनुसार सुका मेवा.
कृती : किसलेले खोबरे, रवा, मावा एका भांड्यात घेऊन, कुकरमध्ये ह्या मिश्रणात पाणी न घालता तीन शिट्या घ्याव्यात, कारण मावा आणि किसलेले खोबरे पाणी सोडेल.
आता हे मिश्रण चांगले थंड झाल्यावर एकजीव करून मळून घ्यावे, त्यात पिठी साखर, वेलदोडा पूड, सुका मेवा टाकून परत एकदा छान मळून घ्यावे. हे सर्व मिश्रण छान घट्ट मळून झाल्यावर आपल्याला पाहिजे त्या आकाराचे लाडू वळावे, हे लाडू दोन दिवस छान राहतात आणि झटपट बनतात, त्यामुळे लागेल तसे बनवावेत. नारळ वडी, रवा लाडू यांची छान अशी मिश्र चव चाखता येईल.
हेरंब मारुती प्रधान