श्रीगणेशाचे नैवेद्य : केशरमोती

विवेक मराठी    15-Sep-2023
Total Views |
श्रीगणेशाचे नैवेद्य
केशरमोती
 
(पारंपरिक कोंकणी पदार्थ)
 

vivek 
साहित्य - तांदळाची पिठी, खोवलेला ओला नारळ, गूळ, कपभर दूध, 4 चमचे तूप, वेलदोडा पूड, काजू-बदामाचे काप, चिमूटभर मीठ, केशराच्या 5-6 काड्या.
 
कृती - प्रथम एका कढईत कपभर दूध घ्यावे. त्यात 2 चमचे तूप टाकावे. गुळाचा छोटासा खडा टाकावा. दुधाला उकळी फुटली की त्यात पिठी टाकून फेटावे, चिमूटभर मीठ टाकून पुन्हा सगळे मिश्रण एकसारखे करावे. दणदणीत वाफ काढावी. कोमट असतानाच ताटात काढून छान मळून छोटे छोटे गोळे (मोती) करावे. (वाफ छान आल्यास चिरा पडत नाहीत.)
 
आता कढई गॅसवर ठेवून त्यात 2 चमचे तूप टाकून तयार गोळे त्यात टाकावेत व वरून गूळ आणि खोवलेला नारळ टाकावे. गूळ मऊ झाल्यावर गोळे हलवावेत. वरून वेलदोडा पूड आणि काजू-बदामांचे काप घालावेत. बाप्पासाठी प्रसाद तयार!
 
अनघा अंधोरीकर
7507562153