श्रीगणेश विशेषांक - पाककृती स्पर्धा 2023

विवेक मराठी    04-Aug-2023
Total Views |
श्रीगणेश विशेषांक
 
पाककृती स्पर्धा - 2023
गौरी-गणपती म्हटले की गोडाधोडाच्या पदार्थांची रेलचेल. यंदा तर अधिक मास म्हटल्यावर नैवेद्याचे पदार्थही दुप्पट होणार. मोदक हा गणरायाचा आवडीचा पदार्थ असला, तरी माहेरवाशिणीचे कोडकौतुक त्याच उत्साहाने केले जाते. प्रांताप्रांतानुसार जसा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो, तसेच तिखटमीठाच्या पदार्थांचाही नैवेद्य दाखवला जातो. काही खास पारंपरिक पदार्थही या चतुर्मास्यात केले जातात.
 
 
vivek
‘सणासुदीचे दिवस आणि वैशिष्ट्यपूर्ण भारतीय मिठाई’ अशी यंदाच्या सा. विवेकच्या ‘श्रीगणेश विशेषांका’ची मध्यवर्ती संकल्पना असणार आहे. तुमच्या घरात असे काही खास पारंपरिक पदार्थ (मोदक सोडून) नैवेद्यासाठी केले जात असतील, तर त्या पदार्थातील पोषक घटकांसह व फोटोंसह त्याची कृती आम्हाला पाठवावी. त्यातील निवडक पाककृतींना साप्ताहिक विवेकच्या श्रीगणेश विशेषांकात स्थान दिले जाईल. आपल्या पाककृती दि. 13 ऑगस्ट 2023पर्यंत युनिकोडमध्ये vivekedit@gmail.com या मेलआयडीवर किंवा 9967570531 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठवाव्यात.
अधिक माहितीसाठी संपर्क - पूनम पवार
9594961859