शाश्वत सुगंधातून शाश्वत उत्पन्न!

विवेक मराठी    19-Aug-2023   
Total Views |
सोनचाफा म्हटलं की समोर येते पिवळे जर्द सुगंधित फुल. अशा या सोनचाफ्याची विविध गुणवैशिष्ट्ये व व्यावसायिक फुलशेतीत पुढे जाण्याची क्षमता ओळखून ’पितांबरी’ कंपनीने तळवडे व ताम्हाणे विभागात प्रायोगिक व व्यापारी तत्वावर 7 एकर क्षेत्रात सोनचाफा झाडांची लागवड केली आहे. पितांबरीने सोनचाफ्यातून यशस्वी उत्पादन घेण्यापासून स्थानिकांना या माध्यमातून रोजगारही उपलब्ध केला आहे. पितांबरीच्या या दर्जेदार चाफ्याच्या फुलांना तसेच चाफ्याच्या अर्काला बाजारपेठेत मोठी मागणी आहे.

Plantation of Sonchafa trees
 
महाराष्ट्रात सोनचाफा लागवडीचे क्षेत्र आता वाढू लागले आहे. कर्नाळा, वसई, विरार ते पालघरपर्यंत सोनचाफ्याची लागवड केलेली दिसून येते. सोनचाफा फुलांची मागणी लक्षात घेता सध्याचे लागवडीचे क्षेत्र फार थोडे आहे, ही गरज लक्षात घेऊन ’पितांबरी’ कंपनीने कोकणातील आपल्या दापोली, तळवडे, ताम्हाणे विभागात एकूण 7 एकर क्षेत्रावर सुमारे 2200 सोनचाफा झाडांची यशस्वी लागवड केली आहे. सोनचाफा हे जंगली सुगंधित फूलझाड असून व्यावसायिक दृष्टीकोनातून पितांबरी कंपनीने आपल्या प्रक्षेत्रावर लागवडीकरिता पिवळ्या रंगाच्या ‘सौंदर्या’ जातीच्या सोनचाफ्याची निवड केली. लागवडीचे अंतर 1012 फूट एवढे ठेवण्यात आले आहे.
 
 
सौंदर्या जातीच्या सोनचाफ्याचे वैशिष्ट्य म्हणजे यास वर्षभर फुले येतात. फुले आकर्षक व सुगंधी आहेत. फुलांचा रंग चमकदार पिवळा आहे. फुलांची लांबी 6 ते 7 सेमी. व फुलांचे सरासरी वजन 2 ते 3 ग्रॅम आहे. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे 100 से. तापमानापासून ते 400 से. तापमानातदेखील झाडांची चांगली वाढ होते. झाडांची उंची सर्वसाधारणपणे 5 ते 8 फुटांपर्यंत नियंत्रित ठेवण्यात पितांबरीला यश आले आहे. झाडांची छाटणी केल्यामुळे जास्त प्रमाणात फांद्या फुटल्या आहेत. परिणामी फुलांच्या संख्येत वाढ झाली असून प्रत्येक झाडापासून सरासरी दर दिवशी 3 ते 4 फुले मिळत आहेत. फुलांचा अर्क काढण्यासाठी ही उत्तम जात आहे. बाजारात फुलाला मिळणार्‍या दरात चढ-उतार होत असतो. कधी हे फूल तीन रुपयेप्रमाणे मिळते, तर कधी सणासुदीच्या काळात 10 रुपयांनीही फुलाची विक्री होते. परंतु फुलाची शेल्फ लाइफ कमी असल्यामुळे पितांबरीकडून फुलांचा अर्क काढला जातो. या अर्काची विक्री करण्याबरोबरच पितांबरीच्या विविध उत्पादनांमध्ये - उदाहरणार्थ शायनिंग पावडरमध्ये असलेला चाफ्याचा मंद सुगंध, पितांबरीच्या चाफ्याच्या सुगंधातील देवभक्ती अगरबत्ती अशा विविध उत्पादनांत या अर्काचा उपयोग केला जातो. 1 किलो अर्कामागे लाखोंची मिळकत मिळते.
 
 
पितांबरीच्या प्रक्षेत्रात सोनचाफ्याची लागवड करताना 1012 फूट अंतरावर झाडांची आखणी केली गेली. त्यानुसार 22 फूट खोलीचे खड्डे करून त्यामध्ये 5 किलो कंपोस्ट खत, 100 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट घालून खड्डे भरून घेण्यात आले व त्यात एकरी 350 झाडांची लागवड करण्यात आली. सोनचाफा लागवड केल्यावर पाणी व्यवस्थापन करताना ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला गेला. या पद्धतीचा वापर करून उन्हाळ्यात सोनचाफ्याच्या झाडांना पाण्यात मिसळणारी खते दिली जातात. त्यामुळे खते टाकण्यासाठी लागणार्‍या माणसांची बचत होते, तसेच पाणीसुद्धा सम प्रमाणात मिळते.
 
 
Plantation of Sonchafa trees
पितांबरीने लागवड केलेल्या सौंदर्या जातीच्या सोनचाफ्याला वर्षभर फुले येतात. पावसाळ्यात ऑगस्ट-सप्टेंबर, हिवाळ्यात जानेवारी-फेब्रुवारी, तर उन्हाळ्यात मे-जून या तिन्ही हंगामांमध्ये फुलांची तोडणी केली जाते. प्रत्येक झाडाला 3 फुले याप्रमाणे 1500 झाडांपासून दररोज 4500 एवढी फुले मिळतात. म्हणजेच महिन्याला 1 लाख फुले मिळतात. त्याचे वजन 150 किलोपर्यंत होते व त्यापासून 15 किलोपर्यंत अर्क मिळतो. सोनचाफ्याच्या सुगंधी अर्काचे ’उेपलीशीं’ आणि ’अलीेर्श्रीींश’ असे दोन प्रकार पडतात. कंपनी या दोन्ही प्रकारचे उत्पादन घेते. अतिरिक्त उत्पन्नासाठी सोनचाफ्याच्या दोन ओळींमध्ये गवती चहाची (लेमन ग्रासची)सुद्धा आंतरपीक म्हणून लागवड केली आहे. दर वर्षी या पिकाची 3 वेळा कापणी करून 1.5 टन गवती चहा मिळतो. यावर प्रक्रिया करून त्यापासून 9 किलो लेमनग्रास ऑइल मिळते. या लेमनग्रास ऑइलचादेखील पितांबरी डिशवॉश बार, पितांबरी हँडवॉश आदी उत्पादनांमध्ये वापर केला जातो.
 
 
सोनचाफा फुलांची तोडणी पहाटे लवकर केली जाते. एक माणूस प्रतितास 400 ते 500 फुले काढतो. फुले काढल्यावर ती स्वच्छ केल्या जातात - म्हणजेच छोटी पाने व खराब पाकळ्या काढून टाकल्या जातात. या फुलांचा अर्क काढला जात असल्याने ती फुले पॅकिंग न करता विशिष्ट रसायनामध्ये बुडवली जातात. चाफ्याच्या फुलांचा अर्क काढण्यासाठी विशिष्ट पद्धतीचा वापर केला जातो. कंपनी मुलांना त्याबाबतचे प्रशिक्षण देते.
 
 
सोनचाफ्याच्या सुगंधी अर्काला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खूप मोठी मागणी आहे. त्यामुळे सोनचाफ्याचा अर्क काढण्यास मोठा वाव आहे. सोनचाफा रोपांना मार्केटमध्ये खूप चांगली मागणी आहे. त्यामध्ये रत्नागिरीतील सौंदर्या जातीला संपूर्ण भारतामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे, म्हणूनच पितांबरीच्या दापोली भागात याच जातीच्या मातृवृक्ष 739ची लागवड केली आहे व संपूर्ण महाराष्ट्रात याच जातिवंत 5 हजारांपेक्षा जास्त रोपांची विक्रीसुद्धा पितांबरीने केली आहे. याचबरोबर आंध्र प्रदेश व राजमंद्री नर्सरी केंद्र येथूनसुद्धा पितांबरीच्या रोपांना मागणी आहे.
 
 
पितांबरी कंपनीने सोनचाफा झाडांची लागवड केल्यामुळे गावातील बेरोजगार महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामध्ये सकाळी फुले काढण्यापासून ते फुलांचा अर्क काढण्यापर्यंतची सर्व कामे महिला व पुरुष करतात. तसेच तरुण मुलांना कलमे बांधण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यावर कलम बांधणीचे काम सोपवले जाते. कलमे बांधण्यासाठी लागणारी सोनचाफ्याची जंगली रोपे गावातील बचत गटांकडून तयार करून घेतली जातात. गावातील लोकांना सोनचाफ्याची लागवड करण्यासाठी सुरुवातीला पितांबरीकडूनच कलमे दिली जातात. फुलांचे उत्पादन सुरू झाल्यावर त्यातून झाडांचे पैसे ठरावीक पद्धतीने वजा केले जातात. पडीक जमिनीवर फूलझाडांची लागवड केल्यामुळे गावातील लोकांना वर्षभर रोजगार मिळण्यास सुरुवात झाली आहे.
 
 
चाफ्याच्या फुलांची व अर्काची मागणी लक्षात घेता पितांबरीकडे उपलब्ध असलेल्या प्रक्षेत्रात वाढ करून सोनचाफा फुलांच्या उत्पादनवाढीवर भर देण्यात येत आहे. तसेच लागवड केलेल्या झाडांपासून जास्तीची फुले मिळण्यासाठी त्यास कोणकोणत्या खतांच्या फवारण्या कराव्या लागतील, या नियोजनावरही लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.
 
 
पितांबरीच्या दापोली व तळवडे येथील नर्सरीत चाफ्याची 1 वर्षांची रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आपल्या ऑर्डरनुसार रोपे आपल्याला उपलब्ध करून दिली जातात. त्याचप्रमाणे सोनचाफ्याची शेती करायची असल्यास त्यासाठी पितांबरीच्या नर्सरीद्वारे रोपे व शेती-लागवडीचे प्रशिक्षणही देण्यात येते.
अधिक माहितीसाठी व चाफ्याची रोपे खरेदी करण्यासाठी संपर्क :
प्रसाद गोसावी : 9820979166
अदित्य गोळे : 9096442984

रवींद्र प्रभुदेसाई

पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.ची सुरुवात 1989 मध्ये श्री रवींद्र प्रभुदेसाई आणि त्यांचे वडील स्वर्गीय श्री वामनराव प्रभुदेसाई यांनी लहान घरगुती व्यवसाय म्हणून केली होती. ती हळूहळू एक आघाडीची उत्पादन आणि विपणन कंपनी बनली आहे. होमकेअर डिव्हिजनमध्ये एफएमसीजी उत्पादनांसह सुरुवात करून, आता संस्थेकडे एकाच छताखाली 10 विभाग आहेत उदा; होमकेअर, हेल्थकेअर, अॅग्रीकेअर, फूडकेअर, सौर, धूप, परफ्युमरी, डिजीकेअर, कृषी पर्यटन आणि निर्यात विभाग.