वसंतवैभव

विवेक मराठी    01-Jul-2022   
Total Views |
महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक हे सलग ११ वर्षे राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविणारे एकमेव मुख्यमंत्री होते. एका सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यामुळे त्यांना शेतीमातीविषयी कळवळा होता. धरणीच्या कणाकणातून समृद्धी फुलली पाहिजे हा त्यांचा उत्कट ध्यास होता. या निष्ठेतून त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात असंख्य लोकाभिमुख योजना आखल्या, कार्यान्वित केल्या आणि महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेण्याचा प्रयत्न केला. आज त्यांचा जन्मदिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने केलेले हे स्मरण.
  
krushi
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली या छोट्याशा गावात फुलसिंग नाईक यांच्या पोटी १ जुलै १९३३ रोजी वसंतराव नाईक यांचा जन्म झाला. वसंतरावांच्या आईचे नाव 'हुणकाबाई'. शेती आणि शेतमजुरी हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय. मध्यमवर्गीय-गरीब परिस्थितीला तोंड देत वसंतरावांनी उच्च शिक्षण घेतले. नागपूर विद्यापीठातून एलएल.बी.ची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यासमवेत अमरावती व पुढे पुसद येथे त्यांनी वकिलीच्या व्यवसायाला आरंभ केला. पंजाबरावांच्या सहवासाने वसंतरावांना कृषीविषयी आस्था निर्माण झाली. दरम्यान, त्यांनी 'चले जाव' आंदोलनात सहभाग नोंदवला.
१९४६ साली पुसद नगर परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आणि वसंतरावांच्या सार्वजनिक कार्याला खर्याच अर्थाने येथूनच सुरुवात झाली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५२ सालच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून ते पुसद मतदारसंघातून निवडून आले. १९५६ साली पुसद तालुक्यात भीषण दुष्काळ पडला होता. या काळात त्यांनी जलसिंचनाची योजना आखली. पुढे त्यांच्या कार्यातून पांढरकवडा तालुक्यातील सायरखेडा व पुसद तालुक्यातील पूस नदीवर धरणे उभारण्यात आली. १ नोव्हेंबर १९५६ रोजी द्विभाषिक महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. १९५७ साली सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि पुसद मतदारसंघातून वसंतराव द्विभाषिक मुंबई विधानसभेवर निवडून आले. ११ एप्रिल १९५७ ते १९६०पर्यंत ते कृषिमंत्री होते. आपल्या स्वभावधर्माला अनुरूप असे आवडीचे कृषी खाते वसंतरावांना मिळाले. या काळात त्यांनी चीन व जपान या देशांचा दौरा केला. या सर्व दौर्यारत त्यांनी कृषीविषयक कामाचा सूक्ष्मपणे अभ्यास व पाहणी केली. याच काळात 'इंडिया काउन्सिल फायनान्स सोसायटी'चे सभासद म्हणून त्यांची निवड झाली.
१ मे १९६० रोजी मराठी भाषकांचे स्वतंत्र राज्य स्थापन झाले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पहिल्या मंत्रीमंडळात महसूल मंत्री म्हणून वसंतरावांचा समावेश होता. महसूल मंत्री म्हणून वसंतरावांनी पंचायत राज कायद्याची मुहूर्तमेढ रोवली. यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण करून जिल्हा परिषद व पंचायत समिती यांना व्यापक अधिकार दिले.

krushi 
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा समतोल पाया रचला. सहकाराचे जाळे विणले. मूलभूत सोयीसुविधांचा विकास सुरू केला. शिक्षणाच्या सुविधा सुरू केल्या. पंचायत राजची अंमलबजावणी करून समाजातील अगदी शेवटच्या घटकाला लोकशाहीतील त्याच्या ताकदीची जाणीव करून दिली. पुढे यशवंतरावांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्यात वसंतरावांनी मोलाचा वाटा उचलला. ५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५ - म्हणजे तब्बल अकरा वर्षांहून अधिक काळ वसंतराव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी राहिले.
हरित क्रांती
वसंतरावांच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्रात हरित क्रांती घडली. 'अन्नधान्यात दोन वर्षांत महाराष्ट्र स्वयंपूर्ण झाला नाही, तर मला फाशी द्या' अशी जाहीर व धाडसी घोषणा करून त्यांनी इथल्या काळ्या मातीत चमत्कार घडवून दाखविला. त्यांच्याच कार्यकाळात धवल क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. वि.स. पागे यांच्या संकल्पनेतील रोजगार हमी योजना प्रत्यक्षात आणून त्यांनी महाराष्ट्रालाच नव्हे, तर देशाला मोठी देणगी दिली. एकाधिकार कापूस खरेदी, धान्य खरेदी असो की कृषी विद्यापीठाची स्थापना, अशा अनेक योजना त्यांच्या काळात निर्माण झाल्या. 'शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे' हे वसंतरावांनी पाहिलेले सुंदर स्वप्न होते. हरित क्रांती जर यशस्वी करावयाची असेल, तर कृषीविषयक अवजारांच्या माध्यमातून, त्याच्या परिवर्तनातून ती केली पाहिजे, विज्ञानाची कास धरली पाहिजे, असे त्यांचे विचार होते. शेती-शेतकरी, पावसाचे पाणी आणि शेतात निर्माण होणारे धन्नधान्य याचा एकमेकांशी अनन्यसाधारण संबंध आहे, हे सर्व शेतीचे अविभाज्य घटक आहेत याचा त्यांनी सातत्याने विचार केला.
धवल क्रांती
महाराष्ट्रातील दूध समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि शेतकर्यांयचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी संकरित गायीची योजना राबविली. प्रगत तंत्रज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांच्या साहाय्याने ज्याप्रमाणे उद्योग आणि संरक्षण क्षेत्राने सुनियोजित प्रगती केली आहे, त्याचप्रमाणे पशुसंवर्धन विकासातही याचा उपयोग करता आला पाहिजे, अशी वसंतरावांची भूमिका होती. त्यांच्या दृष्टीकोनातून पुढे महाराष्ट्रात धवल क्रांती घडून आली.
एकाधिकार कापूस योजना
विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या भागांत कापूस हे नगदी पीक मानले जाते. कापसाचे पीक चांगले आले की व्यापारी भाव पाडत. त्यामुळे दलालांच्या व आडत्यांच्या जाचातून शेतकर्यांूची मुक्तता करण्यासाठी वसंतरावांनी १९७१ साली 'एकाधिकार कापूस योजना' ही क्रांतिकारक योजना आणली. यामुळे कापसाला हमीभाव मिळाला. आज वसंतराव नाईक यांच्या दृष्टीकोनातून ही योजना राबविली गेली असती, तर शेतकर्यांुना आणखी फायदा झाला असता.
'शेतकरी समाज हितदर्शन' योजना कार्यान्वित करण्यासाठी वसंतराव नाईक सदैव तत्पर असत. त्यांनी महाराष्ट्राच्या मातीत फलोत्पादन योजना सुरू केली. पुसदसारख्या आडभागात द्राक्षाची बाग फुलविण्यासाठी शेतकर्यांतना प्रोत्साहन दिले.
रोजगार हमी योजना
१९७० ते १९७३ या काळात महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. खायला अन्नाचा कण नाही, हाताला काम नाही अशी भयावह स्थिती निर्माण झाली होती. खंबीर मनाचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक तसूभरही डगमगले नाहीत. त्यांनी राज्यभर दौरे केले. लोकांना धीर दिला. महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याची भीष्मप्रतिज्ञा केली. त्याच वेळी मजुरांच्या हातांना काम देण्यासाठी रोजगार हमी योजना सर्व शक्तीने राबविली. या योजनेतून रोजगार तर मिळालाच, त्याचबरोबर विकासकामांना चालना मिळाली. पुढे ही योजना केंद्राने स्वीकारली. आज ती 'मनरेगा' स्वरूपात देशातील रोजगाराची वाहिनी बनली आहे.
रोजगाराची हमी देणार्याच या योजनेची कल्पना वसंतरावांचे सहकारी वि.स. पागे यांनी प्रथम मांडली होती. त्यांच्या कार्यकाळात दररोज ५० लाख लोक काम करत होते. त्यातून ७३ हजार विहिरी, ८६० तलाव, ६ लाख किलोमीटर रस्ता, ३० लाख एकर शेतीमध्ये बांधबंदिस्ती घालण्यात आली होती. या आकडेवारीवरून योजनेचे फलित लक्षात येते.
कृषी विद्यापीठांची निर्मिती
राज्याितील कृषी क्षेत्रात संशोधनात वाढ होण्यातच्याक व शेतीत तंत्रज्ञानाचा वापर होण्याघच्या दृष्टीने त्यांाच्याृच मुख्यसमंत्रिपदाच्यार कार्यकाळात चार कृषी विद्यापीठांची स्थाचपना करण्याचत आली आहे.
आज पश्चिम महाराष्ट्रातील राहुरी येथील महात्मार फुले कृषी विद्यापीठाने फळ पिकांसाठी उपयुक्त असे संशोधन केले आहे. याच विद्यापीठाने डाळिंब पिकाचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. असंख्य शेतकर्यांलना याचा फायदा झाला आहे. विदर्भातील अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, मराठवाड्यातील परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि कोकणातील दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या विद्यापीठांनी आज संशोधनाच्याप आधारे विविध पिकांच्यास शेकडो वाणांची व शेती अवजारांची निर्मिती केली आहे. त्याचबरोबर राज्याातील शेतकर्यां ना अनेक तंत्रज्ञान शिफारशी दिल्याा आहेत.
ग्रामीण विद्युतीकरण
वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात ग्रामीण भागात वीजपुरवठा सुरू झाला. विशेष म्हणजे खापरखेडा, पारस, भुसावळ येथील औष्णिक, तर पाफळी येलदरी जलविद्युत प्रकल्प त्यांच्याच कार्यकाळात उभारले गेले. ग्रामीण विद्युतीकरणामुळे शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळाली.
हरित क्रांती, धवल क्रांती, रोजगार हमी योजना, कृषी विद्यापीठ, पंचायत राज हे महाराष्ट्राच्या प्रगतीचे मापदंड आहेत. या सर्वांच्या पाठीमागे वसंतराव नाईक यांचे महत्त्वपूर्ण योगदान दिसून येते. त्यामुळे ते खर्यार अर्थाने महाराष्ट्राचे शिल्पकार ठरतात.
 
विकास पांढरे
९९७०४५२७६७

विकास पांढरे

सध्या सा.विवेकमध्ये उपसंपादक, एम.ए.बीएड पर्यंतचे शिक्षण. वयाच्या १६ व्या वर्षापासून सोलापूर 'तरुण भारत' मध्ये वार्ताहर म्हणून कामास प्रारंभ. पुढे दैनिक तरूण भारत, सुराज्य,पुढारीमध्ये वार्ताहर व उपसंपादक. कृषी,साहित्य, व वंचित समाजाविषयी सातत्याने लिखाण.