इतिहास पुरुष

विवेक मराठी    24-Aug-2021
Total Views |
कल्याण सिंग ‘इतिहास पुरुष’ एवढ्यासाठी आहेत की, हा बाबरी ढाचा जमीनदोस्त झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला रामजन्मभूमी हिंदूंच्या ताब्यात देण्याचा निर्णय करावा लागला. गेल्या वर्षी 5 ऑगस्टला तेथे भूमिपूजन झाले. मंदिराचे बांधकाम सुरू झालेले आहे. गेल्या वर्षी हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत कल्याण सिंग म्हणाले, “अयोध्येत राममंदिर उभे राहिल्यानंतर मला मृत्यू यावा. माझी इच्छा पुन्हा अयोध्येत पुनर्जन्म घेण्याची आहे.” सनातन भारतीय अस्मितेचा हा प्रतिध्वनी आहे. मंदिरनिर्माणाचे काम ते पाहू शकले आणि पाहता पाहता त्यांनी डोळे मिटले. त्यांच्या अंतरात्म्याची इच्छा नक्कीच पूर्ण होईल, असा आपला आध्यात्मिक इतिहास आहे.

bjp_1  H x W: 0

इतिहासाला क्रांतिकारक वळण देणारे राजनेते हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असतात. कल्याण सिंग यांची गणना त्यात करावी लागते. ‘इतिहास पुरुष’ असेच त्यांचे वर्णन केले पाहिजे. 6 डिसेंबर 1992ला अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी स्थानावरील बाबरी ढाचा कारसेवकांनी पाडला. कल्याण सिंग तेव्हा मुख्यमंत्री होते. बाबरी ढाच्याच्या रक्षणाची जबाबदारी शासनावर होती. तिच्या रक्षणासाठी अयोध्येत पोलीस दल तैनात केले होते. कल्याण सिंग म्हणाले, “उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री म्हणून रामभक्तांवर पोलिसांनी गोळीबार करू नये, असे आदेश मी त्यांना दिले होते. अयोध्येतील 1992च्या कारसेवेत बाबरी ढाचा जमीनदोस्त झाला, मी त्याची पूर्ण जबाबदारी घेतो.” त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्रिपद मिळविण्यासाठी राजनेते काय काय उचापती करतात, हे महाराष्ट्राच्या राजकारणावरून लोकांच्या लक्षात येईल. कल्याण सिंग यांनी हे मुख्यमंत्रिपद रामाच्या चरणी समर्पित करून टाकले. बाबरी ढाचा जमीनदोस्त करण्याची जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेतली. “बाबरी ढाचा पाडण्यास मी जबाबदार नाही” असे ते म्हणाले नाहीत. नेतृत्वाची कसोटी, जबाबदारी डोक्यावर घेण्यात असते. जो नेता जबाबदारी स्वीकारीत नाही, निर्णय घेत नाही, कळसूत्री बाहुलीप्रमाणे वागतो, त्याला कोणत्या नावाने आपल्या देशात ओळखतात, हे सर्वांना माहीत आहे.

कल्याण सिंग ‘इतिहास पुरुष’ यासाठी आहेत की, जर 6 डिसेंबरला बाबरी ढाचा जमीनदोस्त झाला नसता, तर कोणी सांगावे.. अटलजींचे सरकारही आले नसते, नंतर नरेंद्र मोदी यांचे शासनही आले नसते, घटनेचे 370 कलम रद्द झाले नसते, विदेशी मुसलमानांना नागरिकत्व न देण्याचा कायदाही झाला नसता, पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइकही झाला नसता. दहशतवाद्यांना वेचून वेचून ठार मारण्याचे धोरणही अमलात आणले गेले नसते. 6 डिसेंबर 1992च्या बाबरी पतनाच्या अनेक प्रमुख सेनापतींत कल्याण सिंग येतात. त्यांनी इतिहास घडविला.

हा इतिहास एखादा बाबरी ढाचा पाडण्यापुरता मर्यादित नाही. तोडफोड करणे ही भारतीय संस्कृती नाही. बाबरी ढाचा हा हिंदू विरोधाचे, सनातन धर्मविरोधाचे, सनातन जीवनमूल्यांच्या विरोधाचे प्रतीक झाला. त्याची तेव्हा बाजू घेणारे आणि आज त्यासाठी अश्रू ढाळणारे जे काही लिहितात, ते जर आपण वाचले तर आपल्याच हाताने आपल्याच पोटात सुरा खुपसणारी ही तथाकथित वैचारिक, बुद्धिवादी मंडळी काय लायकीची आहेत, हे आपल्या लक्षात येते. जी निशाणी आमच्या अपमानाची, आमच्या अस्मितेवर घाव घालणारी आणि आम्हाला सदैव भयगंड मन:स्थितीत ठेवणारी होती, ती उद्ध्वस्त झाली. कल्याण सिंगांच्या जागी जर मुलायम सिंग असते, तर किती शेकडा कारसेवक मेले असते, हे सांगता येत नाही.
 
कल्याण सिंग ‘इतिहास पुरुष’ एवढ्यासाठी आहेत की, हा बाबरी ढाचा जमीनदोस्त झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला रामजन्मभूमी हिंदूंच्या ताब्यात देण्याचा निर्णय करावा लागला. गेल्या वर्षी 5 ऑगस्टला तेथे भूमिपूजन झाले. मंदिराचे बांधकाम सुरू झालेले आहे. गेल्या वर्षी हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत कल्याण सिंग म्हणाले, “अयोध्येत राममंदिर उभे राहिल्यानंतर मला मृत्यू यावा. माझी इच्छा पुन्हा अयोध्येत पुनर्जन्म घेण्याची आहे.” सनातन भारतीय अस्मितेचा हा प्रतिध्वनी आहे. मंदिरनिर्माणाचे काम ते पाहू शकले आणि पाहता पाहता त्यांनी डोळे मिटले. त्यांच्या अंतरात्म्याची इच्छा नक्कीच पूर्ण होईल, असा आपला आध्यात्मिक इतिहास आहे.

 
आणखी एका कारणासाठी कल्याण सिंगांना ‘इतिहास पुरुष’ म्हणावे लागते. जगाचा इतिहास उलटापालटा करणार्‍या काही घटना डोळ्यापुढे आणाव्या लागतात. अमेरिकन युवकांनी बोस्टन बंदरात ब्रिटिश जहाजावरील सर्व चहा समुद्रात फेकून दिला. त्याला ‘बोस्टन टी पार्टी’ म्हणतात. या टी पार्टीने अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध सुरू झाले आणि पुढील अडीचशे वर्षांमध्ये महासत्ता अमेरिका उभी राहिली. फ्रेंच जनतेने बास्टिल तुरुंग जमीनदोस्त केला. फ्रेंच क्रांतीला सुरुवात झाली. या फ्रेंच राज्यक्रांतीने युरोपातील सर्व राजघराण्यांच्या सिंहासनांखाली धगधगती आग निर्माण केली आणि एकापाठोपाठ एक सिंहासने भस्म झाली. बर्लिनची भिंत जर्मन युवकांनी तशीच जमीनदोस्त केली. कम्युनिझमचे साम्राज्य संपले. पूर्व युरोप आणि मध्य आशियातील देश रशियाच्या जोखडातून मुक्त झाले. 6 डिसेंबर 92ला बाबरी ढाचा कोसळला आणि भारत परकीय इस्लामी आक्रमकांच्या भयगंड मानसिकतेतून मुक्त झाला. हा देश आता आपल्या सनातन आणि शाश्वत विचारांच्या आधारावर उभा करायचा आहे, ही लाट निर्माण झाली. तिला हिंदुत्वाची लाट म्हणतात. कल्याण सिंग यांनी या लाटेला गतिमान करण्याचे काम केले, हा त्यांचा वारसा कधीही पुसला न जाणारा आहे.