दहशतवाद आणि भारत - ब

विवेक मराठी    24-Jun-2021
Total Views |

भारतात वेगवेगळ्या प्रांतातील फुटीरतावादी संघटना यादेखील दहशतवादी कारवाया आणि हिंसाचाराच्या घटनांसाठी कारणीभूत असल्याचे दिसते. पंजाबमधील खलिस्तानी आसाममधील उल्फा या फुटीरतावादी चळवळींविषयी सविस्तर माहिती देणारा लेख. .


khalistan_1  H

मागील भागात इस्लामी मूलतत्त्ववादी दहशतवादाची माहिती दिलेली होती. या भागात प्रामुख्याने पंजाब आणि आसाम ह्यातील दहशतवादी संघटनांचे विश्लेषण केलेले आहे. भारतासमोरील दहशतवादाचा अभ्यास करताना फुटीरतावादी संघटनांचा दहशतवाद ठळकपणे जाणवतो. देशाच्या विविध भागांत त्यामुळे अनेक निरपराध नागरिकांचा बळी गेलेला आहे. पंजाबच्या खलिस्तानवादी दहशतवादाने भारताबाहेरही आपले संधान साधलेले होते. विशेषत: कॅनडामध्ये यांनी पाय रोवलेले होते. आसाममध्ये आणि ईशान्येकडील राज्यांमध्येही अनेक दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. त्यांना पाकिस्तान, चीन तसेच बांगला देश ह्यांची मदत मिळत आहे. आपले राजकीय हेतू साध्य करण्यासाठीहिंसाहे साधन वापरणार्या अनेक फुटीरतावादी संघटना आहेत. त्यातील महत्त्वाच्या संघटनांचे विवेचन पुढीलप्रमाणे -

खलिस्तानी दहशतवाद

साधारणपणे 1980नंतर पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तानची मागणी आणि त्यासाठी दहशतवादी कारवाया ह्यांची सुरुवात झाली. ह्या खलिस्तानवादी चळवळीला पाकिस्तानची मदत होती. (‘संदर्भ - राय,जयंतकुमार, ॅस्पेक्टस ऑफ इंडियाज इंटरनॅशनल रिलेशन्स, 1700 ते 2000, साउथ एशिया अँड वर्ल्ड, पियरसन एज्युकेशन, इंडिया, पृष्ठ 484.) खलिस्तानी दहशतवाद हा थेट शीख धर्माशी जोडला गेलेला आहे. शिरोमणी अकाली दल हा पक्ष 1972ला विधानसभा निवडणुकीत पराभूत होऊन काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. पंजाबातच शिखांचा पक्ष पराभूत झाला हे शल्य मोठे होतेच आणि यातूनचधार्मिक आणि राजकीयस्थान डळमळीत झाल्याची भावना होती. शिखांची अस्मिता जागृत करून आपले राजकीय हेतू साध्य करणे हा उपाय दिसत होता. मग ह्या राजकीय पक्षाने 1973लाआनंदपूर साहेब ठरावकरून पंजाबला देशांतर्गत जास्तीत जास्त राजकीय स्वायत्तता मिळावी ह्यासाठी प्रयत्न सुरू केले. तसेच शीख धर्माला हिंदू धर्मापासून स्वतंत्र मानावे हे ह्या ठरावात मुख्यत: होते. ह्यांना जर्नेलसिंग भिंद्रेनवाले हे शिखांचे चौदावे जथेदार किंवा प्रमुख होते, ते येऊन मिळाले. यामुळे शिखांचे ऐक्य प्रभावीपणे साधले गेले. अकाली दल आणि भिंद्रेनवाले त्यांनी 1982ला संयुक्तपणेधरम युद्ध मोर्चाचा प्रारंभ केला. ह्याने 410 जणांचा बळी घेतलेला आहे. (संदर्भ - टुली मार्क, सतीश जॅकब, 1985, अम्रीतसर - इंदिरा गांधीज लास्ट बॅटल, 5 एडिशन, लंडन, जोनाथान केप, पृष्ठ 147.)

नंतर 1983ला भिंद्रेनवाले ह्यांनी स्वत:ची अटक टाळण्यासाठी अकाल तख्तचा आधार घेतला. त्यांनी सुवर्णमंदिरात आश्रय घेतला. 1984 जूनमध्ये त्याच्यासाठीऑपरेशन ब्लू स्टारझाले. भिंद्रेनवाले भारतीय सैन्याकडून ठार मारले गेले. परिणामी 1984 ऑक्टोबर अखेरीस तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांची हत्या शीख असणार्या त्यांच्याच सुरक्षा रक्षकांनी केली. नंतर शीखविरोधी दंगली उसळल्या. काँग्रेस समर्थक आणि शीख ह्यांच्यात हिंसक चकमकी झाल्या. त्यानंतर स्वतंत्र खलिस्तानची मागणी जास्त तीव्र झाली. भारतात शीख सुरक्षित नाहीत ह्या भावनेला पाठिंबा मिळू लागला. शीख धर्माच्या लोकांसाठी स्वायत्त अशा खालसा लँडची निर्मिती व्हावी ही मागणी होऊ लागली. यानंतर फुटीरतावादी गटाला आर्थिक आणि राजकीय आधार काही घटक देऊ लागले. (संदर्भ - फ्लेयर, डीयासपोरा इनव्हॉलमेंट इन इनसर्जन्सीज, 2005, पृष्ठ 128.) काही अशिक्षित तरुण तर केवळमजाम्हणूनसुद्धा ह्या खलिस्तानवादी चळवळीला येऊन मिळाले होते. (संदर्भ -पुरी, हरीष के., परमीतसिंग जज आणि जगरूपसिंग सेखॉ, 1999, टेररिझम इन पंजाब - अंडरस्टँडिंग ग्रासरूट रियालिटी, न्यू दिल्ली, हरआनंद पब्लिकेशन, पृष्ठ 68-71.) खलिस्तानसाठी भारत आणि पाकिस्तानमधील पंजाब आणि काही प्रदेश अपेक्षित होता. विशेष म्हणजे आता भारतापासून स्वतंत्र खलिस्तानची मागणी जोर पकडू लागली. खलिस्तानच्या निर्मितीसाठी अनेक संघटना सक्रिय होत्या.

 

बब्बर खालसा, भिंद्रेनवाला टायगर फोर्स ऑफ खलिस्तान, खलिस्तान कमांडो फोर्स, खलिस्तान लिबरेशन आर्मी, खलिस्तान लिबरेशन फोर्स, खलिस्तान झिंदाबाद फोर्स, इंटरनॅशनल सिख यूथ फेडरेशन, ऑल इंडिया सिख स्टुडंट फेडरेशन, दशमेश रेजिमेंट आणि शहीद खालसा फोर्स ही काही नावे आहेत.

बब्बर खालसा - ह्यावर भारतात बंदी आहे. (संदर्भ - लिस्ट ऑफ बॅन ऑर्गनायझेशन, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गव्हर्मेंट ऑफ इंडिया, अर्काइव्ह, 3 मे 2018.) ह्या संघटनेने 23 जून 1985ला कॅनडाच्या माँट्रियलहून दिल्लीला येणारे एयर इंडिया फ्लाइट 182 बाँबने उडवले. त्याच दिवशी न्यू तोक्यो नारिता इंटरनॅशनल एयरपोर्टवर एका बॅगेमध्ये बाँबस्फोट घडवून आणला गेला. 2007ला लुधियाना तेथे सिंगार सिनेमा कॉम्प्लेक्स त्यांनी उडवले. विशेष म्हणजे त्यासाठी पाकिस्तानात तीर्थयात्रेसाठी जाऊन शस्त्रे आणि प्रशिक्षण मिळवून बिकानेरहून सीमा ओलांडून आले होते. (संदर्भ - 4 - बब्बर खालसा मेन हेल्ड फॉर लुधियाना सिनेमा ब्लास्ट, टाइम्स ऑफ इंडिया, 31 डिसेंबर 2007.)

खलिस्तान कमांडो फोर्स - स्वतंत्र खलिस्तानचे ध्येय बाळगणार्या ह्या संघटनेने पंजाबचे माजी मुख्यमंत्री बियंतसिंग ह्यांची हत्या केली. भारताने ह्या संघटनेवर बंदी घातली.(संदर्भ - लिस्ट ऑफ बॅन ऑर्गनायझेशन, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गव्हर्मेंट ऑफ इंडिया, अर्काइव्ह.)

खलिस्तान लिबरेशन फोर्स - स्वतंत्र खलिस्तानसाठी सशस्त्र कारवायांसाठी 1986ला स्थापन केली गेली. ह्यांनी काश्मीरच्या दहशतवाद्यांशी हातमिळवणी करून भारतातील लष्करी ठिकाणांवर हल्ले केले होते. (‘संदर्भ- ऑफिस ऑफ कोऑर्डिनेटर फॉर काउंटर टेररिझम, एप्रिल 1996, पॅटर्न ऑफ ग्लोबल टेररिझम, रिट्रीव्ह 30 मे 2009.)

खलिस्तान लिबरेशन आर्मी - ह्यांनी 12 डिसेंबर 1987ला 9 पंजाब पोलिसांना ठार केले. जुलै 1990ला चंदीगडला पोलीस स्टेशनचा भाग ह्यांनी उडवणे, पंजाब सरकारमधील मंत्री बलवंतसिंग ह्यांची 1990मध्ये हत्या, 8 रेल्वे पोलिसांची हत्या, डेरा सच्चा सौदाच्या प्रमुखांवर 2008 मध्ये हल्ला, पंजाबच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख रुल्डा सिंग ह्यांची हत्या, 1984च्या शीखविरोधी दंगलीतील मुख्य आरोपी डॉ. बुध प्रकाश कश्यप ह्यांची हत्या ह्या हिंसक कारवाया केल्या. तसेच पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिस इंटेलिजन्सने खलिस्तान लिबरेशन फोर्सच्या हरमिंदर सिंग मिंटोची मदत घेतली होती. (संदर्भ - आयएसआय, खलिस्तानी ग्रूप प्लॉटेड किलिंग्ज ऑफ आरएसएस मेन इन पंजाब, टाइम्स ऑफ इंडिया.) गृह मंत्रालयानुसार ही चाळिसावी संघटना आहे, ज्यावर बंदी घातली गेली. (संदर्भ - एनआयए आस्क होम मिनिस्ट्री टू बॅन खलिस्तान आउटफिट, टाइम्स ऑफ इंडिया, 1 ऑक्टोबर 2018.)


khalistan_2  H

पंजाबमधील दहशतवाद शीख धर्माच्या अस्मितेसाठी होता. शीखांचे वेगळे राष्ट्र हवे, कारण भारतात शीख सुरक्षित नाहीत अशी भावना तीव्र होत गेलेली होती. शीख आणि हिंदू वेगळे आहेत हे वारंवार पटवून देण्यात आले. त्यासाठी शिखांनी आपल्या धार्मिक चिन्हांचा, प्रतीकांचा मोठ्या प्रमाणात वापर केला. ‘शीख अस्मिताही देशापेक्षा वरचढ ठरवली. ह्यासारखी कारणे पाहता हा धार्मिक दहशतवाद होता, ह्यात शंका नाही. शिवाय त्याला पाकिस्तानची मदत होती. भारतापासून जितके घटक फुटून वेगळे होतील, तितके ते पाकिस्तानला स्वत:चे यश वाटते, कारणअखंड हिंदुस्तानतयार होऊ देणे हेच त्याचे ध्येय आहे. पाकिस्तानपासून बांगला देश वेगळा झाला. त्यासाठी भारताने मदत दिली होती. ह्याचा सूड घेण्याची एकही संधी पाकिस्तान अजूनही सोडत नाही. खलिस्तानच्या रूपात ही मोठी संधी दिसत होती. मात्र अजूनही हे गट सक्रिय आहेत. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने गुज्जरसिंग निज्जार ह्याला डिसेंबर 2020मध्ये अटक केली. खलिस्तानवादी संघटनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी तो सोशल मीडियावर सक्रिय झालेला होता. पण भारताने कठोरपणे खलिस्तानवादी गटांवर नियंत्रण आणलेले आहे.

आसाम

आसाममधील दहशतवाद हा फुटीरतावादामुळे निर्माण झाला. सुरुवातीला त्यांना आसाममधील जनतेचा पाठिंबा मिळाला. भारतातून बाहेर पडून आसामी लोकांसाठी स्वतंत्र आसाम तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवून युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम ही संघटना म्हणजेचउल्फा’ 1979ला स्थापन केली गेली. हिला 1990ला भारत सरकारने दहशतवादी संघटना म्हणून घोषित करून त्यावर बंदी घातलेली आहे. (संदर्भ - बॅन ऑर्गनायझेशन्स, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गव्हर्न्मेंट ऑफ इंडिया, रिट्रीव्ह- 28 डिसेंबर 2019.)


khalistan_4  H

 युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा)चा झेंडा
 

ह्या संघटनेने 1. नॅशनलिस्ट सोशल काउन्सिल ऑफ नागालँडशी 1983मध्ये आणि 2. बर्माच्या काचीन इन्डिपेंडन्ट आर्मीशी 1987मध्ये संधान साधलेले होते. त्याच्यामार्फत आपल्या सदस्यांना शस्त्र प्रशिक्षण मिळवणे चालू होते. 1990पासून उल्फाला आळा घालण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. उल्फाने मे 1990ला लॉर्ड स्वराज पॉल ह्यांचे बंधू सुरेंद्र पॉलची हत्या केली. तसेच 1991मध्ये एका रशियन अभियंत्याचे अपहरण, तर 1997मध्ये संजय घोष ह्या सामाजिक कार्यकर्त्याचे अपहरण करून त्याला ठार केले. 2000मध्ये आसाम गण परिषदेचे नागेन शर्मा ह्यांची हत्या केली. शिवाय उल्फाच्या लखीपठार ह्या ठिकाणी असंख्य मृतदेह सापडले होते. 16 मार्च 2003ला उल्फाने बसमध्ये स्फोटके पेरून हिंसाचार केला. आसाममध्ये बिहारी लोकांच्या विरोधात जनमत पसरवून त्यांची हत्या करण्याचे सत्र चालवले. यातून भारतद्वेष वाढवला. 2007लासुद्धा गुवाहाटीला उल्फाने स्फोट घडवून सहा जणांचा बळी घेऊन आपलाआर्मी डेसाजरा केला. उल्फाने स्वत:चे इनिग्मा फोर्स हे खास मारेकरी पथक तयार केलेले आहे. (संदर्भ -मेनन रमेश, 23 जानेवारी 2001, दी उल्फा गेम प्लॅन हॅज बॅकफायर, रेडीफ.कॉम. रिट्रीव्ह 10 डिसेंबर,2009.) उल्फाला चीनचे सहकार्य असून त्यांचा पार्थ ज्योथी गोगाई पन्नास दहशतवाद्यांसह चीनच्या युनान प्रांतात आश्रयाला असल्याच्या बातम्या आहेत. पण आसाममधील दहशतवाद इतकाच मर्यादित नाही. त्यात इस्लामी दहशतवादही सक्रिय आहे.


दि मुस्लीम युनायटेड लिबरेशन टायगर्स ऑफ आसामची - ‘मुल्टाची 1996मध्ये झालेली स्थापना महत्त्वाची होती. कारण आसामचे मुस्लीम आणि मूळचे बांगला देशी मुस्लीम यांनी एकत्र येऊन आसाम आणि भारतातइस्लामी राज्यस्थापन करण्यासाठी ह्याची निर्मिती केली. म्हणजेच देशाच्या सीमा ओलांडून धार्मिक ऐक्याच्या जोरावर नवे राज्य उभारण्याचा हा प्रयत्न होता. त्यांना भारताविरुद्ध जिहाद करायचा होता. विशेष म्हणजे माओवादी नॅशनल सोशालिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड - इसाक मुईवाह गटाने त्यांना प्रशिक्षण दिले आहे. पाकिस्तानने ऑल इंडिया मुस्लीम युनायटेड लिबरेशन टायगर्स ऑफ आसामला पाठिंबा दिला आणिमुल्टात्याचाच एक भाग आहे. जेव्हा 9/11च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानात अल कैदाच्या दहशतवाद्यांचा शोध सुरू केला, तेव्हा ह्यातील काहींनी आसाममध्येच सुरक्षित आश्रय घेतला असावा, असेही काही अहवाल सांगतात. मुल्टाला बांगला देशच्या जमात--इस्लामीची मदत आहे. (संदर्भ - साउथ एशिया टेररिझम पोर्टल.)


khalistan_3  H

काश्मीरमध्ये इस्लामचा प्रभाव, पंजाबमध्ये शिखांचा प्रभाव आणि ईशान्य भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रभाव दहशतवादी कारवायांवर जाणवतो. काश्मीरमध्ये इस्लाम धर्म स्वीकारण्याची सक्ती झाली, म्हणून काश्मिरी पंडित विस्थापित झाले, तर त्रिपुरामध्ये ख्रिश्चन धर्माच्या जोरावर नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा हिंदूंना आपले सण साजरे करू देत नाही. अनेकांचे धर्मांतर केले गेलेले आहे. धार्मिक उद्दिष्टे पूर्ण करणे, तसेच राजकीय हेतू साध्य करणे ह्यावर भारतातील दहशतवाद केंद्रित झालेला आहे.