जित जायेंगे हम... सब अगर संग है

विवेक मराठी    20-May-2021
Total Views |

संघटन मे शक्ती हैहा मंत्र जपत आणि जगत शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या देशव्यापीच नाही, तर विश्वव्यापी होऊ पाहणार्या संघटनेच्या शीर्षस्थ नेत्याने सामूहिक प्रयत्नांचं महत्त्व सांगणं याला वेगळा अर्थ आहे. समूहाची सुनियोजित ताकद कोरोनासारखं अभूतपूर्व संकटही परतवून लावू शकते, हा विश्वास मोहनजींनी सर्वांच्या मनात निर्माण केला.

 
RSS_1  H x W: 0

कोरोना महामारीने वर्षभराहून अधिक काळ अवघ्या विश्वाला विळखा घातला आहे. जेव्हा हे संकट आलं, तेव्हा 120 कोटींचा आणि भौगोलिक वैविध्य असलेला भारत त्याच्याशी कसा सामना करेल याविषयी जगभरात औत्सुक्य होतं. भारत हे आव्हान पेलू शकणार नाही, अशी अनेक विकसित देशांची अटकळ होती. मात्र ही अटकळ खोटी ठरवत महामारीच्या पहिल्या लाटेशी भारताने समर्थपणे मुकाबला केला. याचं सर्वाधिक श्रेय जातं ते अर्थातच केंद्र सरकारला आणि काही अपवाद वगळता केंद्र-राज्यांमधल्या समन्वयाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झालेलं चोख नियोजन, लसनिर्मितीसाठी विविध कंपन्यांना दिलेलं प्रोत्साहन, प्रभावी ठरू शकेल अशी लसनिर्मिती करण्यात आलेलं यश, त्यातून अनेक देशांना केलेला लस पुरवठा, या दरम्यान देशाचं आर्थिक गाडं रुळावर राहण्यासाठी आणलेल्या विविध योजना, ‘आत्मनिर्भर भारत’ ही मांडलेली संकल्पना - तिला मिळालेला प्रतिसाद... हे सारंच आपण एक देश म्हणून हे आव्हान पेलायला, परतवून लावायला किती समर्थ आहोत याची झलक होती. ही झलक अन्य देशांना अस्वस्थ करणारी न ठरती तरच नवल!

यानंतर आलेली दुसरी लाट... जिची पूर्वसूचना वारंवार देण्यात येऊनही जनतेने ती गांभीर्याने घेणं, मधल्या काळात स्थानिक शासन-प्रशासनाला आलेली ढिलाई, कोरोना विषाणूने बदललेलं स्वरूप आणि त्यामुळे उपचारांना मिळणारा अपेक्षित प्रतिसाद.. यामुळे पहिल्या लाटेपेक्षा ही लाट अधिक हानी पोहोचवून गेली. होणार्या आकस्मिक मृत्यूंनी सर्वसामान्य जनतेचं धाबं दणाणलं. आणि हे सगळं कमी म्हणून की काय, आता तिसर्या लाटेची पूर्वसूचना देण्यात आली आहे. ही लाट मुलांसाठी धोकादायक असेल अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अस्वस्थतेत वाढ झाली आहे. अशा वातावरणात लोकांची सकारात्मकता टिकून राहण्यासाठी, वाढण्यासाठी काहीतरी करण्याची गरज होती.


ही गरज भागवलीहम जितेंगे - पॉझिटिव्हिटी अनलिमिटेडया ऑनलाइन व्याख्यानमालेने. रा.स्व. संघाच्या प्रेरणेने, समाजातल्या विविध सामाजिक तसंच धार्मिक संघटनांनी आणि नागरिकांनी एकत्र येत सर्व भारतवासीयांसाठी या व्याख्यानमालेचं आयोजन केलं होतं, हे विशेष.

या व्याख्यानमालेचा समारोप झाला तो रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या प्रेरक आणि दिशादर्शक व्याख्यानाने. धीराचे दोन शब्द बोलतानाच सौम्य शब्दांत का होईना, जनतेला तिच्या जबाबदारीची जाणीवही करून देणारं आणि सकारात्मकतेचे विविध पैलू समोर ठेवणारं हे व्याख्यान होतं.

संघटन मे शक्ती हैहा मंत्र जपत आणि जगत शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या देशव्यापीच नाही, तर विश्वव्यापी होऊ पाहणार्या संघटनेच्या शीर्षस्थ नेत्याने सामूहिक प्रयत्नांचं महत्त्व सांगणं याला वेगळा अर्थ आहे. समूहाची सुनियोजित ताकद कोरोनासारखं अभूतपूर्व संकटही परतवून लावू शकते, हा विश्वास मोहनजींनी सर्वांच्या मनात निर्माण केला.

संकटं येतात ती आपल्यातल्या सद्गुणांची परीक्षा पाहण्यासाठी आणि आपल्यातल्या मर्यादांची जाणीव करून देऊन त्यावर मात करायची इच्छा निर्माण करण्यासाठी. संकटांकडे आपण कसे पाहतो आणि त्याचीच शिडी करून नव्या संधीकडे कसे झेपावतो, हे सर्वस्वी व्यक्तीच्या मानसिकतेवर अवलंबून असतं. समूहाच्या बाबतीतही तेच म्हणता येईल. जेव्हा समूहावर संकट येतं, तेव्हा त्या संकटावर मात करण्याची समूहाची मानसिकता असावी लागते. नसेल तर ती प्रयत्नपूर्वक तयार करावी लागते. हे काम असतं नेतृत्व करणार्या नेत्याचं.

हा नेता कसा असतो, हे मोहनजींनी सोदाहरण स्पष्ट केलं ते सर विन्स्टन चर्चिल यांचं उदाहरण देऊन. दुसर्या महायुद्धाच्या काळात चर्चिल यांनी आपल्या कृतिशील उत्साहातून, प्रेरक वक्तृत्वातून संपूर्ण राष्ट्राला सतत प्रेरित केलं. ""Please understand that there is no pessimism in this office. We are not interested in the possibilities of defeat, they do not exist.'' आत्मविश्वासाने ओतप्रोत असं चर्चिल यांचं हे वाक्य त्या काळात इंग्लंडचं जणू ध्येयवाक्य झालं आणि त्यातून इतिहास घडला. ‘आपलंही एका अदृश्य शत्रूशी युद्ध चालू आहे आणि दृढनिश्चयाने, अथक प्रयत्नाने या लढाईत आपण जिंकणार आहोतहा विश्वास या गोष्टीतून मोहनजींनी ऐकणार्या प्रत्येकाच्या मनात निर्माण केला.

 

या महामारीत अनेकांनी जवळच्या आप्तमित्रांना गमावलं आहे. ही हानी कधी भरून येणारी असली, तरी आताचा काळ शोक करत बसण्याचा नाही, तर खचून जाता उभं राहण्याचा आणि आप-परभावापलीकडे सर्व विश्वालाच प्रेमभावनेने आपल्या कवेत घेण्याचा, आपल्यामीपणाचा परीघ विस्तारण्याचा आहे. हे उलगडून दाखवताना मोहनजींनी उदाहरण दिलं ते संघाचे आद्य सरसंघचालक पूजनीय डॉ. हेडगेवार यांचं. डॉ. हेडगेवार किशोरवयाचे असताना जन्मदात्यांना पारखे झाले, तेही एकाच दिवशी. जन्मदाते तरी कसे, तर प्लेगबाधितांची सेवा करताना मृत्यूला सामोरे गेलेले. तेव्हा त्यांच्या अकाली मृत्यूने खचून जाता, त्यांच्यामधल्या सेवाभावाने लहानग्या केशवाच्या मनात समाजातल्या सर्वांविषयी निरपेक्ष प्रेमाची जी ज्योत लावली, ती अखेरपर्यंत तेवत राहिली आणि अनेकांमध्ये तिचं तेज संक्रमित झालं. म्हणूनच असेल कदाचित, आपत्तिकाळात दिवसरात्र चालणारी मानवसेवा हा संघाचा सहजधर्म बनला आहे. त्याची प्रचिती आज महामारीच्या काळातही आपण घेत आहोत. मात्र हा सेवाभाव एका संघटनेचं वैशिष्ट्य राहता सर्वसामान्यांचा सहजभाव व्हावा ही काळाची गरज आहे, याची जाणीव मोहनजींनी करून दिली.

सर्व प्रकारचे मतभेद बाजूला ठेवून समाज म्हणून आपण एकत्र यायला हवं. कोरोनावर निर्णायक विजय मिळवण्यासाठी हर तर्हेचे प्रयत्न आणि आपल्याकडून जे जे योगदान अपेक्षित आहे ते देणं, हे आणखी काही काळ सर्वांचं सामायिक ध्येय असेल. सर्वसामान्यांची अशी ताकद शासन-प्रशासनाच्या मागे उभी राहिली, तर विजय आपलाच आहे याची खात्री देतानाच मोहनजींनी एक इशाराही दिला. तो ध्यानात ठेवून आचरणात आणण्याजोगा, तो म्हणजे समूहाने संकटाचा मुकाबला करताना स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत सजग- सावध असणं, वेळेत योग्य वैद्यकीय उपचार घेणं आणि कुटुंब म्हणून परस्परांमधले बंध मजबूत करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं. ही त्रिसूत्री कुटुंब आणि समाजाला अधिक उन्नत करेल.

तिसर्या लाटेचा इशारा भीती निर्माण करण्यासाठी नसून सावध-सजग करण्यासाठी, पूर्वतयारीसाठी आहे असा दृष्टीकोन ठेवून वाटचाल करावी, असा सल्ला देणारं हे व्याख्यान अनेकांना नवी ऊर्जा देईल. पाठीवरती हात ठेवून अदृश्य शत्रूशी लढायला बळ देईल. कधीकधी असे आश्वासक शब्दही संजीवक ठरतात. नवचेतना निर्माण करणारे ठरतात. देश म्हणून, समाज म्हणून आज त्याचीच गरज आहे.