आम्ही पुत्र अमृताचे

विवेक मराठी    07-Sep-2019
Total Views |


यश आणि बाधा यात अंतर किती असते. त्याचे उत्तर चहाचा कप आणि ओठ यांच्यातील अंतराइतके असते. ओठाला कप लागण्यापूर्वी काहीही घडू शकते. इस्त्रोच्या चांद्रयान मोहिमेचा हा अनुभव साऱ्या भारताने घेतला.

हे अपयश नाही. यशाच्या 95 पायऱ्या आपण पार केल्या, शेवटच्या टप्प्यात अडचणी आल्या. हरकत नाही शंभर टक्के यशासाठी थोडी प्रतिक्षा केली पाहिजे.

इस्त्रोच्या ज्या शास्त्रज्ञानी, वैज्ञानिकांनी अनेक महिने अविश्रांत मेहनत घेतली. त्यांचा आम्हाला अभिमान आणि गर्व आहे. एकाच वेळी शंभर उपग्रह सोडण्याचा पराक्रम करणारे आमचे वैज्ञानिक उद्या चंद्रावर एकच काय पण दहा अवकाशयाने उतरवतील.


 

अडचणी आम्हाला थांबवू शकत नाहीत. संकटे रोखू शकत नाहीत, कारण आमचा कणा ताठ आहे, आम्ही पुत्र अमृताचे आहोत.