भारतीय स्त्री एक विहंगम अवलोकन

विवेक मराठी    24-Oct-2019
Total Views |

***रंगा हरी****

आदिचैतन्यशक्तीने जेव्हा सृष्टिनिर्माणाचा विचार केला, तेव्हा स्त्री आणि पुरुष जन्माला आले. त्यांचे नाते पति-पत्नीचे झाले आणि मनुष्यजातीचा जन्म झाला. त्यामुळे इथे पुरुष आधी जन्मला की स्त्री? हा प्रश्नच निर्माण झाला नाही. माणसाच्या हातांपैकी कोणता डावा, कोणता उजवा हे सांगता येईल, पण एका दाण्यातून उमललेल्या दोन दलांपैकी कोणते दल आधी उमलले, कोणते डावे, कोणते उजवे हे कसे सांगता येईल? ‘बीजोद्मवी समदले’ - किती समर्पक, अचूक, अर्थपूर्ण सारगर्भित उदाहरण आहे हे! या दृष्टीने पाहिले की स्त्री पुरुष यांत कोण डावे, कोण उजवे? आपण नि:शंकपणे म्हणू शकतो की दोन्हीही त्या बीजाची अर्धांगे आहेत. एकाशिवाय दुसरे अपूर्ण आहे. द्रष्ट्या लोकांनी पुरुषास अर्धांगी स्त्रीला अर्धांगिनी म्हटले, आणि दोन्ही मिळून पूर्णता प्राप्त होते असे हे विवेचन केलेले आहे. भारतीय स्त्रीविषयीच्या अवलोकनाचे नयना सहस्रबुद्धे यांनी केलेला मराठी भावानुवाद.


एकविसाव्या शतकातला बहुचर्चित विषय जर कोणता असेल, तर तो आहे स्त्री-पुरुष संबंधाचा! स्त्री पुरुष हे मानवी जीवनाचे दोन अभिन्न घटक आहेत. त्यांच्या सुसंयोगाशिवाय सृष्टिनिर्माण अशक्य आहे, असंभव आहे. जसा विद्युत शक्तीच्या दोन ध्रुवांचा - धन ऋण ध्रुवांचा संगम झाल्याशिवाय ऊर्जेचा प्रवाह निर्माण होणे अशक्य आहे, तसेच मानव प्राण्याच्या निरंतर जीवन प्रवाहासाठी आवश्यक अपरिहार्य आहे स्त्री-पुरुष युगुलाचा संगम! हे अत्यंत नैसर्गिक आहे. तरीही गेल्या शतकात काही वेळा प्रासंगिक, तर काही वेळा अप्रासंगिक अप्रस्तुत कारणांनी जगभर स्त्री-पुरुष संबंधांची चर्चा होते आहे. त्या चर्चेचे पैलूही अनेक आहेत. या चर्चेने अवघे विश्व व्यापून टाकले असताना भारत तरी त्यापासून दूर कसा राहू शकेल? ते स्वाभाविकच आहे. म्हणून आयोजकांनी विचारपूर्वक मलाराष्ट्रजीवनात स्त्रीची भूमिकाअसा विषय दिला आहे.

या विषयाचा प्रारंभ करण्यापूर्वी आपल्या राष्ट्राची विशेष पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे, आपला विशेष दृष्टीकोन लक्षात घेतला पाहिजे.

1. भारत देशाची प्राचीनता : जगभरातल्या 200 देशांची सूची आपण पाहिली, तर गेल्या 200 वर्षांत आकाराला आलेले, जन्माला आलेले ते अर्वाचीन देश आहेत. आपल्या भारताचे वय कोण नक्की सांगू शकेल? कोण जाणे किती सहस्राब्द वर्षे हा संस्कृतीचा, सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाचा प्रवाह अखंडपणे सुरू आहे!

2. लोकव्यवहारांची विविधता : या देशाचे दुसरे वैशिष्ट्य आहे ते विविधता! जगातल्या छोट्या छोट्या राष्ट्रांत, भूखंडात जी विविधता दिसते, ती आपल्या एका देशात आहे. प्राचीन ऋषी-महर्षींनीभिन्न भिन्न स्वभाव-प्रकृतीचा, वेगवेगळ्या भाषा बोलणारा जनसमूह’ - ‘नाना धर्माण बहुधा विवाचसं’ - असे या देशाचे वर्णन केले आहे. त्याप्रमाणेच या विद्वानांनीयत्र भवति विश्व एक नींडं’ - इथले विविधतेने नटलेले सामाजिक जीवन हे चिमणीच्या घरट्यासारखे आहे, असेही भारतवर्षाचे वर्णन केलेले आहे.

3. चढ-उतारांचे अनुभव : लौकिक जीवनात इतके चढ-उतार पाहिलेला, पचवलेला दुसरा देश नाही. इथे महान साम्राज्ये उदयाला आली, तसेच शतकानुशतकांचे दास्यही या देशाने अनुभवले. हे तिसरे वैशिष्ट्य आहे.

 

4. सात्मीकरण : या देशाचे चौथे वैशिष्ट्य आहे सात्मीकरण! या देशाने आगंतुकांना, आक्रमणकर्त्यांनाही या देशात सामावून घेतले. अंतरिक्ष जसे हळूहळू पृथ्वीवरच्या सर्वांना कवेत घेते, तसेच परकीय आक्रमणकर्तेही या संस्कृतीच्या कवेत विलीन झाले, सामावले गेले. मानव समुदायाच्या इतिहासात भारताची ही पाचन क्षमता, सामावून घेण्याची शक्ती हा एक अद्वितीय चमत्कार आहे.

5. दार्शनिक : भारताचा धार्मिक दृष्टीकोन हेही एक विलक्षण वैशिष्ट्य आहे. तुलनाच करायची झाली, तर अन्य बहुतेक देशांची धर्मदृष्टीसेमेटिकधर्मातून आलेली आहे. भारतीय दार्शनिक हे वेदांच्या चिंतन-मननातून, वैचारिक मंथनातून तयार झालेले आहे. त्या मंथनाने भारताला अनुपम, अपूर्व असा दृष्टीकोन दिला आहे.

भारताची ही वैशिष्ट्ये लक्षात घेतली नाहीत, तर माणसांसंबधीच्या कोणत्याही समस्येचे नीट आकलनच होणार नाही. ती समजून घेणे हे अशास्त्रीय, विकल विकट ठरेल. स्त्री-पुरुष संबंधाचा विषयही त्याला अपवाद नाही. विश्वातल्या सर्व विचारधारा मान्य करूनही भारताला आपल्या अस्सल स्वत्वाच्या प्रकाशात या विषयाचे विवेचन मूल्यमापन करायला हवे.


2. श्रुतींच्या कालखंडातली स्त्री :

या विश्वाचे आदिम अस्तित्व म्हणजे ब्रह्म, असे भारतातले ऋषी, महर्षी मानतात. ‘ब्रह्मम्हणजे चैतन्य, ते निर्लिंगी, लिंगभेदरहित परमचैतन्य! ब्रह्म म्हणजे पुरुष नाही की स्त्री नाही. ब्रह्म म्हणजे विशाल, अनंत, अखंड सत्. त्या परमचैतन्यात विचारांचे एक स्पंदन उगम पावले - मला अनेक बनायचे आहे. परिणामत: त्यासत्चे दोन भाग झाले. एका दाण्यातून दोन दले उमलून यावीत तशी ती दोन दले म्हणजे स्त्री-पुरुष, किंवा पती-पत्नी, त्यातून मनुष्याचा जन्म झाला असा उल्लेख बृहदारण्यक उपनिषदाच्या द्रष्ट्या ऋषिमुनी रचनाकारांनी केला आहे.

 

तस्मात इदं अर्ध वृगलं इव’, ‘पति: पत्नीच अभवतां तत: मनुष्या: अजायन्तबृहदारण्यक उपनिषदात मनुष्यजन्माचा असा उल्लेख केलेला आढळतो. (बृ. -1-ब्र 4-3)

आदिचैतन्यशक्तीने जेव्हा सृष्टिनिर्माणाचा विचार केला, तेव्हा स्त्री आणि पुरुष जन्माला आले. त्यांचे नाते पति-पत्नीचे झाले आणि मनुष्यजातीचा जन्म झाला. त्यामुळे इथे पुरुष आधी जन्मला की स्त्री? हा प्रश्नच निर्माण झाला नाही. माणसाच्या हातांपैकी कोणता डावा, कोणता उजवा हे सांगता येईल, पण एका दाण्यातून उमललेल्या दोन दलांपैकी कोणते दल आधी उमलले, कोणते डावे, कोणते उजवे हे कसे सांगता येईल? ‘बीजोद्मवी समदले’ - किती समर्पक, अचूक, अर्थपूर्ण सारगर्भित उदाहरण आहे हे! या दृष्टीने पाहिले की स्त्री पुरुष यांत कोण डावे, कोण उजवे? आपण नि:शंकपणे म्हणू शकतो की दोन्हीही त्या बीजाची अर्धांगे आहेत. एकाशिवाय दुसरे अपूर्ण आहे. द्रष्ट्या लोकांनी पुरुषास अर्धांगी स्त्रीला अर्धांगिनी म्हटले, आणि दोन्ही मिळून पूर्णता प्राप्त होते असे हे विवेचन केलेले आहे.

 

पुढे जाऊन, संस्कृतीच्या प्रवाहातही स्त्री-पुरुष उत्पत्तीबाबतचा हाच दृष्टीकोन भारतात होता, असे आढळते. विशेष म्हणजे या प्रदीर्घ कालावधीत अनेक चढ-उतार आले, पण हा दृष्टीकोन कायम टिकून राहिला, स्थिर राहिला. स्मृतिकार मनूनेहीब्रह्मशरीराने विभाजित झाले, अर्धा भाग पुरुष, तर अर्धा भाग स्त्री झाला, असे म्हटले आहे.

 

अर्थात स्त्री आणि पुरुष हे समान, म्हणजेच समप्रधान आहेत असे भारतीय चिंतन दर्शन निश्चितच मानते. निसर्गाने दिलेल्या लिंगभेदाशिवाय दोहोंच्यात कोणताही भेद नाही. स्त्री-पुरुष संबंधित प्रश्न कोणताही असो, या मूळ सत्याचे, आधाराचे स्मरण आपण नेहमी ठेवले पाहिजे आणि तरच राष्ट्रीय अस्मितेला पूरक असे उत्तर आपल्याला सापडेल. देवाचे मंदिर असो की राजभवन, जिथे पुरुष जाऊ शकतात तिथे स्त्रियाही जाऊ शकतात. ब्रह्मर्षी वसिष्ठ जिथे जाऊ शकत होते, तिथे अरुंधतीलाही संचारस्वातंत्र्य होते. भूमी असो की नभांगण, दोघेही विराजमान होऊ शकत होते. नैसर्गिक जबाबदार्या सोडून स्त्री आणि पुरुष दोघांची योग्यता समान आहे, हेच भारतीय दर्शन, भारतीय चिंतन!!

 

हे अधिक खोलात जाऊन समजण्यासाठी थोडे तारतम्य आवश्यक आहे. सेमेटिक धर्मांच्या दृष्टीकोनातून - ज्याला आपण सामान्यत: पश्चिमी दृष्टीकोन म्हणतो, त्यात मूलत: स्त्रीचे स्थान गौण आहे, दुय्यम आहे. त्या धर्मग्रंथांनुसार सृष्टिकर्त्याने आधी पुरुषाला घडवले, त्यानंतर त्याच्या म्हणजे पुरुषाच्या बरगडीतून स्त्रीला घडवले. वेगळ्या शब्दात सांगायचे झाले, तर स्त्रीला पुरुषापासून, पुरुषासाठी आणि पुरुषानंतर जन्माला घातले गेले. अशा त्या स्त्रीने ईश्वराने मनाई केलेले सफरचंद खाण्यास पुरुषाला भाग पाडले, प्रलोभित केले. परिणामत: स्त्री ही आदिम पापिणी झाली. म्हणूनच या कथनावर विश्वास ठेवणार्या लोकसमूहांचा द़ृष्टीकोन आणि भारतीय संस्कृतीचा लोकसमूहांचा दृष्टीकोन यांच्यात जमीनअस्मानाचे अंतर असणे अत्यंत स्वाभाविक आहे.

 

वैदिक संहितांचा अभ्यास करताना लक्षात येते की पुरुष ऋषी होते, तशा स्त्री ऋषीही होत्या. पवित्र मंत्रांची आत्मानुभूती दोघांनीही मिळवली, दोघांचीही गणना ऋषिगणांमध्ये केली गेली. यद्यपि संस्कृत भाषेतऋषिकाहा स्त्रीलिंगी शब्द आहे, तरीही स्त्रीसाठीहीऋषिया शब्दाचा वापर होत होता. आपल्या वैदिक पूर्वजांनी कधीही स्त्रीला हीन दृष्टीने पाहिले नाही. परमेश्वराने बहाल केलेले आध्यात्मिक अधिकार, त्याच प्रकारेअर्ध वृगल’ - बीजाचे अर्धे दल असलेल्या स्त्रीलाही होते, अशीच त्यांची श्रद्धा होती. म्हणूनच स्त्रीला वेदाध्ययनाचा अधिकारही होता. स्त्रीही वेदविद्वान मंत्रद्रष्टी होऊ शकत होती. ऋग्वेदात अशा 25-30 ऋषिकांचा - म्हणजे स्त्री-ऋषींचा उल्लेख आहे. अक्षरक्रमानुसार त्यांची नावे आहेत अगस्त्य-स्वसा, अदिती, अपाला, इंद्राणी, इन्द्रमातर:, इन्द्रस्नुषा, उर्वशी, कुशिका रात्रि, गोधा, घोषा-काक्षीवंती, जुहू, दक्षिणा-प्राजापत्या, यमी, यमी-वैवस्वती, रोमशा, लोपामुद्रा, वाक्-आम्मृपी, विश्वा वारात्रेयी, शची-पौलोमी, श्रद्धा-कामायनी, शश्वती-आंगिरले, सरमा-देवशुनी, सूर्या-सावित्री, सार्पराज्ञी, सिकता-निवावरी! या ऋषिकांनी एकूण 266 मंत्र रचलेले आहेत. सर्वच मंत्र श्रेष्ठ आहेत, पण सूर्या सावित्रीने रचलेल्या मंत्रांचे पठण विवाहाच्या शुभमुहूर्तावर केले जाते. आज एकविसाव्या शतकातही धार्मिक पद्धतीने होणार्या लग्नात सूर्या सावित्रीच्या वेदमंत्राचे उच्चारण होते. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलाच्या 85 व्या सूक्तात 47 मंत्र आहेत. त्यातला शेवटचा मंत्र आहे की, ‘हे समस्त देवांनो, आमच्या हृदयांना परस्परांमध्ये मिसळू दे, जल, वायू, धाता, सरस्वती आम्हा दोघांना एकरूप करू दे.’

 

सूर्यासारखीच दुसरी ऋषिका आहे अदिती! तिचा गौरव, मान-सन्मानही श्रेष्ठ आहे. वेगवेगळ्या सूक्तांमध्ये तीसर्वताति (अर्थात सर्वग्राहिणी) विश्वजन्या (विश्वहितैषिणी) ज्योतिष्मती (प्रकाशवती) राजपुत्रा, यज्ञवर्धिका अशा वेगवेगळ्या उपाधींनी/नावांनी ओळखली जाते. ‘अदितीचा खरा अर्थ आहे बंधनमुक्त, स्वतंत्र स्वाधीन! काही संहितांमध्ये तिचे वर्णन पापांपासून वाचवणारी असेही केलेले आहे. एके ठिकाणी तिला सुंदर नौकेची उपमा दिली आहे. ही अदितीरूपी नौका आकाशरूपासारखी मंगलमय आहे. ती नौकेतल्या प्रवाशाला देवत्व प्राप्त करून देते. तिची यात्रा अत्यंत सुरक्षित आणि आनंददायक आहे. तिच्यात बसायला पुरेशी जागा आहे, ती छिद्ररहित आहे. सर्वांना कल्याणाप्रत घेऊन जाणारी ती कर्णधार आहे. तिच्या पायी शरण गेल्यास ती सर्वांना पापमुक्त करेल.

 

इतर मंत्रद्रष्ट्या ऋषिकाही अदितीसारख्याच आहेत. त्यातली प्रत्येक स्त्री ही सिद्ध साध्वी विभूती आहे, अनन्या आहे, एक दुसरीची सावली किंवा प्रतिकृती नाही. अपालाने तर तीअबलानव्हे, तर सबला आहे हेच सिद्ध केले आहे. तिच्या अखंड तप:साधनेने तिने स्वत:चे शरीर रोगमुक्त केले आणि ती पतीची स्वीकृता झाली. घोषा ही वेदप्रचार करणारी कन्या होती. जुहू ही ब्रह्मवादिनी होती. संसाराच्या भरती-ओहोटीतही ती बृहस्पतीची ब्रह्मजाया झाली. दक्षिणा तिच्या नावानुसार दानाचे प्रतिपादन करणारी ब्रह्मवादिनी होती. ती दानी व्यक्तीलाच राजासमान मानत असे. विश्वाला सेवाधर्माचा पवित्र मार्ग दाखवणारी आद्य महिला कदाचित दक्षिणा ही ब्रह्मवादिनीच असावी. विदर्भ राजाची एकुलती एक मुलगी आणि अगस्त्य ऋषींची पत्नी लोपामुद्रा हे आत्मसंयमाचे ज्वलंत उदाहरण आहे. अम्भृणी ऋषींची सुपुत्री वागाम्भृणी ही अद्वैत सिद्धान्ताची वैदिक उपज्ञाता म्हणजे निर्माती मानली जाते. ज्या श्रेष्ठ/महान ऋषींना राष्ट्रसिद्धान्ताचे ज्ञान झाले, अशाभ्रदेच्छु सर्विद महर्षिमध्ये वागाम्भृणीची गणना होते. ती म्हणते, ‘मी समस्त राष्ट्रीय संपदेची, राष्ट्र भांडाराची स्वामिनी आहे. यज्ञ करायला लायक अशा विभूतींमध्ये यज्ञ करण्याचा अधिकार असलेल्या विभूतींमध्ये पहिली ज्ञानवती मी आहे.’ केवढा हा आत्मविश्वास आणि आत्मसन्मानाची भावना!

माझ्या मते महान मंत्रद्रष्टह्मा, वेदविद्वान स्त्रियांची इतकी उदाहरणे पुरेशी आहेत. जिज्ञासू श्रोत्यांनी - वाचकांनी अधिक अध्ययन करून जिज्ञासूंच्या ज्ञानात भर घालावी. अशा संशोधनाची विमर्शाची आज गरज आहे, देश त्यांचा ऋणी राहील. अशा वेदवती स्त्रियांसारख्या अनेक व्यक्तिरेखा वैदिक, उपनिदेशिक साहित्यात पाहायला मिळतात. त्यांत वाचक्नवी गार्गीचे स्थान अद्वितीय आहे. याज्ञवल्क्य आणि गार्गी हेच बृहदारण्यक उपनिषदाचे मुख्य रचनाकार (कथापात्र) आहेत, हे नि:संशय म्हणता येते. गार्गी अडिग/अविचल आहे, अटल आहे. कोणत्याही लिंगीय भेद-भावाशिवाय, अदम्य अशा आत्मविश्वासाने, सात्त्विक अशा ज्ञाननिष्ठेने ती तर्कशुद्ध युक्तिवाद करते. प्रचंड मार्तंड अशी मान्यता असलेल्या याज्ञवल्क्यांबरोबर ती, दोन सबल तुल्यबळ युद्धवीरांनी एकमेकांसमोर उभे ठाकावे तसा शास्त्रार्थ युक्तिवाद करते. इतके तिचे ज्ञान आणि आत्मविश्वास आहे. महाराजा जनकासारखे बहुश्रुत श्रोतेगणसुद्धा अमृतानंदाच्या महासागरात मग्न झाले. भारताच्या आध्यात्मिक इतिहासातला हा सुवर्णक्षणच मानायला हवा.

आपण सगळ्यांनी देवऋण, पितृऋण आणि ऋषिऋण या तीन ऋणांबद्दल ऐकले असेल. भारतवर्षाच्या आध्यात्मिक इतिहासात मातृऋणाचेही विलक्षण उदाहरण आहे. मांडुकी नावाचे महान ऋषी होते. त्यांना तीन पत्नी होत्या. तिसरी पत्नी शूद्र कुलातली होती, तिचे नाव इतरा. इतराच्या मुलाचे नाव होते महिदास. जेव्हा मांडुकी पंडितांच्या विद्वत्सभेत जात, तेव्हा ते कधीही महिदासाला बरोबर नेत नसत. पण इतर दोन पत्नींपासून झालेल्या मुलांना नेत असत. एक दिवस सगळे भाऊ वडिलांबरोबर सभेमध्ये गेले. तिथे पोहोचताच वडिलांनी महिदासाला वेगळे, दुसरीकडे बसवले. महिदासाच्या मनावर उमटलेल्या ओरखड्याकडे मांडुकी ऋषींनी दुर्लक्ष केले. घरी परतल्यावर महिदासाने रडत रडत आईला सगळा प्रसंग सांगितला. इतरेला अक्षम्य दु: झाले. पतीच्या या वर्तनाचे दु: सहन होऊन तिने गृहत्याग केला वनाचा आश्रय घेतला. इतरा स्वत:ही शिकलेली होती. तिनेही ऋषिपतीकडून ज्ञान मिळवले होते. तिने आपल्या पुत्राला - महिदासाला ज्ञान दिले. तप:पूर्ण शिक्षण दिले. महिदास ज्ञानी पंडित झाला. पंडितांच्या सभांना त्याला निमंत्रणे येऊ लागली. शास्त्रार्थात तो तज्ज्ञ सर्वमान्य झाला. त्याचे लिखाणब्राह्मणवेद विद्वानांनी स्वीकारले. एकमताने त्याने लिहिलेल्या, ‘ब्राह्मणला महिदासाचे नाव देण्याचे निश्चित झाले. त्या भरलेल्या सभेत महिदास उभे राहिले आणि विनम्रतेने म्हणाले, ‘‘मी जे काही शिकलो, ज्ञान मिळवले, लिहिले, त्याचे संपूर्ण श्रेय माझ्या मातेचे आहे. म्हणून माझी तुमच्यासारख्या विद्वानांना नम्र विनंती आहे की याला माझ्या मातेचे नाव देण्यात यावे.’’ सर्वांनी ॐकार नाद करून महिदासाची ही प्रार्थना मान्य केली आणि ब्रह्मवेत्ता महिदासकृतब्राह्मणचे नाव इतरेवरून, म्हणजेचऐतरेय ब्राह्मणअसे ठेवले गेले. महिदासाने आपल्या ज्ञानी मातेचे ऋण चुकवले आणिऐतरेय ब्राह्मणहे नाव चिरंतन झाले, शाश्वत झाले.

अशा प्रकारचाच एक बोध प्रसंग केन उपनिषदात आहे. इंद्र, अग्नी आणि वायू यांना अनीश्वरीय शक्तींवर मिळालेल्या विजयामुळे ते गर्वाने उन्मत्त झाले. त्यांना योग्य ज्ञान आणि भान देण्यासाठी महाकाय यक्ष त्यांच्यासमोर उभा ठाकला. त्याने अग्नीची वायूची परीक्षा घेतली. ती परीक्षा दोघेही पूर्णपणे हरले. यक्षाने एक काडी दोघांसमोर ठेवली, पण अग्नी ती पेटवण्यात वायू ती उडवण्यास असमर्थ ठरले. दोघांची असाहाय्य स्थिती पाहून देवेंद्रही उद्विग्न झाले ते जेव्हा शरण आले, तेव्हा तो महाकाय यक्ष अदृश्य झाला आणि त्या जागी सर्वांगविभूषित तेजस्वी स्त्री अवतीर्ण झाली. तिची प्रार्थना केल्यावर ती म्हणाली, ‘‘मी हेमवती उमा आहे. तुम्हाला हे सांगायला आले आहे की तुमची शक्ती मर्यादित आहे, सीमित आहे, त्या अमर्याद, असीमित ब्रह्मशक्तीचा एक सहस्रांश मात्र!’’ अशा प्रकारे तिन्ही देवांचे गर्वहरण झाले. या कथेतल्या आध्यात्मिक तत्त्वबोधाइतकेच एक महत्त्वाचे तथ्य समोर येते, ते म्हणजे ईश्वरीय शक्ती स्त्रीरूपातही सामोरी येऊ शकते.


आपल्या
धार्मिक परंपरेत, वैदिक परंपरेत स्त्रीचे स्थान माहात्म्य सांगणारी अशा प्रकारची अनेक उदाहरणे वैदिक साहित्याच्या संहितांमध्ये आढळतात. त्यावरून हेच सिद्ध होते की, त्या (वैदिक) कालखंडात कुटुंब हेच आपल्या राष्ट्रीय समाजाचे सर्वात छोटे एकक होते. कुटुंब हेच वैयक्तिक मनुष्य जीवनाकडून सामाजिक, राष्ट्रीय जीवनाकडे जाणार्या मोठ्या पर्वतप्राय मार्गाची पहिली पायरी होती. व्यक्तीकडून समष्टीकडे जाणार्या वाटेची सुरुवात कुटुंबापासूनच होत होती. त्यात भारतीय समाजाने नर-नारी, स्त्री-पुरुष असा भेद केला नव्हता. एकाच एककाचे ते दोन घटक होते. म्हणूनच त्यांना कुटुंबरूपी रथाच्या दोन चाकांची यथार्थ उपमा दिलेली आढळते.

 

त्या काळात बालविवाहाची पद्धत नव्हती. विवाहाबद्दल पिता आपल्या कन्येचे मत विचारात घेत असे. इतकेच नव्हे, तर कन्येच्या मतानुसार पित्याला वागावेही लागत असे. उदाहरण म्हणून सूर्यपुत्री सूर्याचे पाणिग्रहण तिच्या इच्छेनुसार करावे लागल्याचे उदाहरण देता येईल. परंतु यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुटुंबाचे पावित्र्य आणि स्थिरता हा विवाहाचा आधार होता. ही भावना दृढ करणारा म्हणून सर्व वैदिक विवाहात सप्तपदीचा आग्रह होता. होमात अग्निदेवतेसमोर वधूने टाकलेल्या सात पावलांतून हेच अभिप्रेत होते. पहिल्या पावलात (अन्न) उदरनिर्वाह, दुसर्या पावलात शक्ती, तिसर्या पावलात (व्रत-विधान) अनुष्ठान, चौथ्या पावलात मैत्री, सामर्थ्य, पाचव्या पावलात गो संपदा, सहाव्या पावलात धनसंपदा आणि सातव्या पावलात पूर्वजांचा आशीर्वाद लाभो, अशी मंगलकामना या सप्तपदीच्या सात पावलांत केलेली आहे. थोडक्यात, या सप्तपदीतून नवपरिणिता सून गृहलक्ष्मी बनते. याच प्रकारे पत्नीसंबंधित शब्द, संकल्पना भावना विकसित झाल्या.


रोज
यज्ञकर्मात साथ संगत करणारी ती पत्नी! दुसर्या पिढीला जन्म देऊन वंशपरंपरा अखंडित ठेवणारी ती जाया! विवाह सोहळ्यात कन्यादान आणि पाणिग्रहणानंतर लाजाहोमाच्या वेळी प्रथमचकन्याया शब्दासाठी नारी म्हणजे स्त्री हा शब्द वापरलेला आढळतो. ‘नारीचा अर्थ नराच्या जोडीने, खांद्याला खांदा लावून गृहस्थाश्रमातली कामे करणारी, जोडीने यज्ञ करणारी, दान देणारी, अतिथी-साधू-भिक्षूंना दान सुभिक्षा देणारी! म्हणजेच गृहस्थधर्माचे पालन करणे नारी शब्दात अभिप्रेत होते आहे. तर भार्याचा अर्थ आहे घराचे भरण-पोषण करणारी. काही लोक चुकीचा अर्थ लावतात म्हणतात - जी भर्त्याच्या अधीन ती भार्या, परंतु पराशर स्मृतीत स्पष्ट उल्लेख आहे कीघर तेच जिथे भार्या राहते, गृहस्थही जेव्हा भार्येबरोबर राहतो, तेव्हाच खर्या अर्थाने गृहस्थ मानला जातो. गर्भाचे रोपण जिच्यामध्ये होते तीस्त्री’, तरदाराचा अर्थ असा आहे की विशेष लक्ष देण्याजोगी पण त्यात विसंगती दिसून येते. दारा शब्दाचा अर्थ आहे पत्नी. व्याकरणदृष्ट्या मात्र हा शब्द पुल्लिंगी आहे आणि नित्य बहुवचनही आहे. त्यामुळे शब्दाच्या व्युत्पत्ती किंवा व्याकरणापेक्षा व्यावहारिक तथ्य असावे, असा माझा अंदाज आहे. जसे मानव समाजाचे संघटित एकक जेगृह’, त्याचे द्वार म्हणजे दार संभाळणारी स्वाभाविक द्वारपालिका, ती बहुतेक दारा बनली असावी. प्राचीन मंदिरावर जसे दोन दोन द्वारपालक असायचे, तसे गृहमंदिराची कार्यदक्ष भार्या म्हणजे चतुरस्र पालिकाच की! परिणामत: तिला दारा: म्हटले गेले असले, तरी तिची जबाबदारी बहुमुखी होती. यावरून हे स्पष्ट होते की महिलांसंबंधीचा वैदिक दृष्टीकोन हा गृहकृत्यावर, गार्हिक दायित्वावर आधारलेला होता, तो वैषयिक नव्हता! याचा अर्थ असा नक्कीच नव्हे की त्या आपल्या पूर्वजांनी प्रजोत्पादनाचे कार्य गौण मानले होते. वर सांगितलेल्याजायाशब्दाच्या अर्थावरून हे स्पष्ट होते की गर्भाधानासाठी अक्षम असलेली स्त्री जाया मानली जात नसे. म्हणून संततीसाठी दुसरा विवाह मान्य होता. विधवा विवाहसुद्धा मान्य होता. विधवेचा परिणेतादिधिषुम्हणून ओळखला जायचा, स्त्रीपरपूर्वाम्हटली जायची, तर दोघांच्या पुत्रालापौनर्भवम्हटले जायचे. सामान्यत: समाजात एकपत्नीत्वाची पद्धत होती, पण आजच्यासारखे विवाहविषयक संकेत कडवे नव्हते. मात्र तरीही धार्मिक मूल्यांवरची श्रद्धा अविचल होती.



संपत्ती
आणि पारिवारिक क्रियाकर्मांच्या उत्तराधिकारांच्या दृष्टीने पुत्रप्राप्तीची कामना केली जायची, पण कन्या संतती तिरस्करणीय, गर्हणीय अपात्र मानली जात नव्हती. मुली विद्यार्जन करू शकत होत्या. तिलाही यज्ञोपवित धारण करण्याचा अधिकार होता. वेदाध्ययन करणार्या मुलींचे, स्त्रियांचे दोन प्रकार होते - सद्योद्वाहा आणि ब्रह्मवादिनी. वेदाध्ययन पूर्ण होईपर्यंत अविवाहित राहून शिक्षण घेणारी समर्पित विद्यार्थिनी म्हणजे सद्योद्वाहा आणि विद्याप्राप्तीनंतरही जीवनव्रती राहून एकनिष्ठ, ध्येयनिष्ठ जीवन घालवणारी ती ब्रह्मवादिनी - संन्याशाप्रमाणेच संन्यासिनी. भविष्यकाळात ही संन्यासिनी परंपरा भगवान बुद्धांनी पुढे चालवली.


पत्नी
शब्दाचा अर्थ आणि महत्त्व सांगताना यज्ञ साकारण्यातल्या तिच्या भूमिकेचा उल्लेख केलाच आहे. त्याबाबत थोडे अधिक इथे सांगतो. वैदिक काळात स्त्रीला स्वतंत्रपणे यज्ञ करण्याचाही अधिकार होता, याचे उल्लेख/दाखले आढळतात. स्त्रियांना स्वत: यज्ञ करण्याचा किंवा यज्ञ करवून घेण्याचाही अधिकार होता, हे ऋचांमधून कळते. ऋचांमध्येशुद्धा:, पूना:, यज्ञीयाअशी स्त्रीलिंगी बहुवचनी विशेषणे वापरलेली आढळतात. अथर्व(वेद) म्हणतो - या पूज्य, शुद्ध पवित्र स्त्रिया आहेत, त्यांना मी पृथक पृथक म्हणजे वेगवेगळ्या ज्ञात्यांच्या हाती सोपवतो. ज्या मनोकामेच्छेने मी यज्ञ करतो आहे, ती कामना सफल होवो. याशिवाय पती पत्नीने एकत्रित करावयाच्या अनुष्ठानांची वर्णने आहेत. पराशर ऋषी म्हणतात, ‘हे अग्नेया याजकांनी पंडितांनी सम्यक पद्धतीने आपल्या पत्नीसमवेत तुझ्यासमोर गुडघ्यांवर बसून पूजा केली आहे.याच प्रकारे व्रतनिष्ठ कन्येने एकटीने केलेल्या यज्ञ अनुष्ठानाचेही दाखले आढळतात. वर्णन आहे अपालाचे - एकदा नदीवर स्नानाला जात असताना आत्रेयी अपालाला वाटेमध्ये सोम मिळाला. ती तो घरी घेऊन गेली म्हणाली, मी इंद्रासाठी तुझा सोमरस तयार करीन.

 

ब्रह्मचर्य, वानप्रस्थ संन्यास या तिन्ही आश्रमांचा आधार गृहस्थाश्रम आहे. हा भारतवर्षाचा सामाजिक मूळ सिद्धान्त आहे. गृहस्थाश्रम व्यवस्थेचे केंद्र आहेगृह’. तेगृहसंभाळणारी ती गृहिणी, आणिगृहिणी गृहमुच्यते’- घर म्हणजे घरवाली. त्या घराची जबाबदारी समर्थपणे संभाळणारी तीदारा’, हे मी आधीच सांगितले आहे. हे गृहकृत्याचे, म्हणजेच घर सुव्यवस्थित संभाळण्याचे शिक्षण घरातून मिळत असे. त्या शाळेची संचालिका होती आई! म्हणून पश्चिमेकडेहाउसवाइफसंकल्पना मानली जात होती, तर त्या ठिकाणी भारतातगृहलक्ष्मीकिंवागृहमाताही संकल्पना होती. नव्या सुनेलाही व्यवहारातून हे ज्ञान, हे प्रशिक्षण मिळत असे. आई-वडिलांच्या संस्कारांतून घरातून त्याची सुरुवात होत असे. जेव्हा गोपालन हा आपल्या सामाजिक जीवनाचा अपरिहार्य भाग होता, तेव्हा गोदोहन म्हणजे गायीचे दूध काढण्याला पर्याय नव्हता आणि ती जबाबदारी घरच्या मुलींची, म्हणून मुलीला दुहिता - दोहन करणारी, असेही म्हटले जायचे. घराची दुधाची गरज भागवून दुधाचे कामकाज मुली पाहायच्या. तप-अनुष्ठानांसाठी त्या पंचगव्य तयार करायच्या. अतिथी सत्कार, पाहुण्यांचे आगतस्वागत हेही मुली पाहायच्या. त्यात पारंगत झाल्यावर त्यांचा विवाह होत असे. ती वधू होत असे. वधूचा अर्थ आहे सासरघरच्या जबाबदार्या पार पाडणे. ‘वहति श्वशुरगृहभारं या सा वधू’, त्याचा प्रारंभ होत असे माहेराहून, म्हणून विवाहाच्या मंगलवेळी तिला आशीर्वाद दिला जायचा, ‘हे वधू, तू सासू, सासरे, नणंदा दीर यांची सम्राज्ञी बन! महाराणीप्रमाणे सर्वांचा संभाळ, प्रतिपाळ देखभाल कर.’ अशा प्रकारे सुसंस्कारित, प्रशिक्षित जबाबदार स्त्रियांच्या भरवशावर आणि कर्तृत्वावरच जगप्रसिद्ध हिंदू एकत्र कुटुंबपद्धती अखंड सुव्यवस्थितपणे चालत आली.


वेदकाळात
मात्र स्त्रीची जबाबदारी घरापुरती, कुटुंबापुरती मर्यादित नव्हती. ती गाव-शहरापर्यंत विस्तृत होती. त्यात यशस्वी होणार्याकुटुंबिनीला पुरंध्री असे सार्थ नाव दिले गेले. आपला पती, पुत्र, पुत्री या स्वजनांच्या जोडीने जी आपल्या पुराची देखभाल करत असे, तिला पुरंध्री म्हटले जायचे. यजुर्वेदाच्या 22व्या अध्यायात 22वा मंत्र आहे. त्यात आलेल्यापुरन्धिर्योषाशब्दाचा पं. सातवळेकरांनी सांगितलेला अर्थ, ‘सर्वगुणसंपन्न नगराचे नेतृत्व करणारी स्त्रीअसा आहे. (यजुर्वेदावरील सुबोध भाष्य-2-पृष्ठ 386) यावरून वेदकाळात स्त्रीचे कार्यक्षेत्र केवळ घर नव्हे, तर गाव, नगर हेही होते हे सिद्ध होते.

 

वेदकाळात सभा, समिती, परिषद, राष्ट्र अशा सामूहिक सामाजिक रचना होत्या. त्यात महिलांचीही निवड होऊ शकत असे. अथर्ववेदातल्या ऋषिकांचे संवाद आहेत. ‘मी बोलते, तू बोलू नकोस, सभेमध्ये तू निश्चयपूर्वक बोल, तू केवळ माझा होऊन रहा, दुसर्या कुणाचे नावही घेऊ नकोस!’ याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे गार्गी याज्ञवल्क्य यांचा संवाद.


संकटाच्या
काळात मुली-महिला स्वराज्याच्या रक्षणासाठी पुढे येत असत, याचे दाखले उदाहरणे संहितांमध्ये मिळतात. विश्पला ही खेल नावाच्या राजाची मुलगी होती. ती युद्धविद्येत निपुण होती. शत्रूने तिच्या राज्यावर हल्ला केला, तेव्हा ती रणांगणात उतरली, समरात तिचा एक पाय कापला गेला. परंतु हिम्मत सोडता तिने ऋषी अश्विनीकुमारांकडून लोखंडाचा पाय लावून घेतला पुन्हा लढली आणि ती जिंकली. संपूर्ण राज्यात तीसर्वादृतअर्थ पाहून लिहावा बनली. आणखी एका वेगळ्या प्रकारच्या प्रसंगाचे वर्णन आढळते. महर्षी मुद्गलांच्या आश्रमातल्या गोधनाची चोरी झाली. हे पाहणार्या ऋषिपत्नी मुद्गलानी रथावर आरूढ झाल्या, त्यांनी चोरांचा पाठलाग केला. राज्याच्या सेनेने या युद्धप्रसंगात मदत केली आणि मुद्गलानी गोधन परत मिळवण्यात यशस्वी झाली.

 

संक्षेपाने सांगायचे झाले, तर स्त्री-पुरुषांच्या उत्पत्तीसंबंधातली महान ऋषींची, द्रष्टह्मा विभूतींची जी संकल्पना होती, त्याच प्रकारे विशेषत: स्त्रियांची समाजात भूमिका होती. स्त्री आणि पुरुष सृष्टीचे समान घटक होते, दोनीही समान ध्रुव होते आहेत. दोन्हींच्या संयोगाशिवाय सृष्टिकार्य असंभव होते आहे. त्यांच्यात कोण उच्च, कोण नीच हा प्रश्न असयुक्तिक होता आहे. तरीही दोघांमध्ये जो नैसर्गिक फरक आहे, त्याकडे आपल्या व्यावहारिक पूर्वजांनी डोळेझाक केली नव्हती. त्यालाही सृष्टीसाठी उपयोगी आवश्यक मानले होते. त्या नैसर्गिक फरकांबरोबर सृष्टिचक्र फिरत राहिले, त्यातून लिंगोचित लिंगाधारित भाव-भावना गुण विकसित झाले. शारीरिक क्षमतेनुसार पुरुष प्रबळ होता तर स्त्री कोमल. म्हणून शेती, सैन्य संचालन, शासन हे विषय स्वभावानुसार पुरुषांकडे, तर शिशुपालन, गृह व्यवस्थापन हे सहृदयतेचे विषय स्त्रियांकडे गेले. तरीही दोघांचे जीवन हा घराच्या, समाजाच्या समग्रतेचा सहज भावच होता. पुरुषामध्ये जर साहस अधिक असेल, तर स्त्रीमध्ये क्षमा! बहुधा हेच कारण असावे की विश्वाचे आधिष्ठान असलेलाधर्महा शब्द पुल्लिंगी झाला, तर त्याच्या तेरा पत्नी - म्हणजे श्रद्धा, मैत्री, दया, शांती, तुष्टि, पुष्टि, क्रिया, उन्नति, बुद्धि, मेधा, तितिक्षा, लज्जा आणि मूर्ती - स्त्रीलिंगी बनल्या. जरी कर्मेंद्रियांमध्ये स्त्री मागे होती असली, तरी ज्ञानेंद्रियांमध्ये समशीर्ष म्हणजेच समान होती. मन-बुद्धी-अहंकार-चित्त यामध्ये ती समान होती. ही वास्तविकता वेदकालीन समाजाने नेहमी लक्षात घेतली. जिथपर्यंत पुरुष जाऊ शकत होता, तिथपर्यंत स्त्रीही जाऊ शकत होती. तिने विद्या प्राप्त केली, ती उपनीता अर्थ पाहून लिहावा झाली, ती ब्रह्मवादिनी झाली, ती अमरत्वाची दीक्षा देणारी उमा हेमवती झाली, ती मंत्रदृष्टी म्हणजे मंत्र रचणारी झाली, राष्ट्ररक्षिता (संगमनी राष्ट्री) अर्थ पाहून लिहावा झाली, ती यज्ञकर्ती झाली, नगराचे रक्षण करणारी, नगर समितीची सभासद झाली, संधी आणि गरज निर्माण होताच रणरागिणी झाली, वीरांगना झाली. रडणारी वेदकालीन कन्या कोणी पाहिली आहे का? वेदकालीन स्त्री सुरक्षेसाठी अवलंबून नव्हती, तीस्वरक्षिताहोती.

 

3) इतिहासकालीन स्त्री :

रामायण आणि महाभारत हे भारताचे दोन इतिहास आहेत. यांचे मूळ ग्रंथकार आहेत महर्षी वाल्मिकी आणि भगवान व्यास! रामायणातील स्त्रिया तीन प्रकारच्या आहेत. एक म्हणजे महालात राहणार्या राजघराण्यातल्या स्त्रिया - त्यात महाराणी, कौसल्या, कैकेयी, सुमित्रा, तारा, शूर्पणखा, मंदोदरी, सीता, सुलोचना . महिला आहेत. दुसर्या प्रकारच्या म्हणजे अहिल्या, शबरी . तिसर्या प्रकारच्या म्हणजे मंथरेसारख्या अशोकवनातल्या पहारेकरी महिला. यांच्या व्यक्तित्वाचे विश्लेषण केले, तर अनेक गोष्टी सिद्ध होतात. राजघराण्यातल्या सर्व स्त्रिया सुशिक्षित होत्या. दैवी संकटांचा लोप व्हावा म्हणून पूजा, होमहवन करणार्या या महिला आहेत. राजा दशरथाच्या निधनानंतर त्याच्या तीन राण्यांनी त्याचे अंत्यसंस्कार केले. यावरून निष्कर्ष काढता येतो की तेव्हा महिलांना अंत्यविधी, श्राद्ध करण्याचे अधिकार होते. वर्तमानकाळात ही पद्धत फक्त केरळमधल्या काही समूहातल्या महिलांमध्ये टिकून आहे नव्याने काही मुली-महिला ती रूढ करत आहेत.

किष्किंधा नगरीची तारा लंकेची शूर्पणखा या राजनीतीमध्ये तज्ज्ञ स्त्रिया होत्या, असे दिसून येते. राज्याच्या वेशीच्या आसपास दोन धनुर्धारी व्यक्ती वावरताना आढळल्या अशी माहिती गुप्तचरांकडून मिळाली आहे, असे सांगून तारा वालीला सचेत करते. पहिल्या दिवशी सुग्रीव आपल्या हरण्याने संतप्त होऊन पेटून उठून पुन्हा सामना करायला दुसर्या दिवशी येतो, तेव्हाही ती शंका व्यक्त करते की पुन्हा इथे सुग्रीवाचे येणे थोडे विचित्र वाटते, भीती वाटते की त्याच्या मागे कोणा अज्ञात शक्तीचा आशीर्वाद आहे. पुढे हा इशारा खरा ठरला हा इतिहास आहे. नंतर अत्यंत दु:खमय, दुर्धर अवस्थेतही तिने राजा बाली आणि निग्रही श्रीरामांशी चर्चा, संवाद करून पुत्र अंगदाचे भविष्य सुनिश्चित केले. त्याला किष्किंधेचा युवराज बनवले.

शूर्पणखेची गोष्ट त्याहून वेगळी आहे. जनस्थान लंकेमध्ये ती राजकन्या म्हणून (विचरण) विहार करत असे. परंतु तिच्यावर झालेल्या अत्याचाराच्या प्रसंगानंतर ती सरळ लंकेच्या राजदरबारात जाते. तिथे विराजित लंकेश्वराला खुले आव्हान देते, रागावणे आरंभ करते. तिच्या मोठ्या विस्तृत वक्तव्यात ती एकदाही तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगाचा वा अत्याचाराचा उल्लेख करत नाही. तिचा भर हा जनस्थान लंकेच्या विशाल क्षेत्रात अस्ताव्यस्त अकार्यक्षम ठरलेल्या गुप्तचर व्यवस्थेवर होता. राजकर्तव्य बजावू शकलेल्या रावणाला ती दोष देते. कुशल राजनीतिज्ञाप्रमाणे ती रावणाला इशारा देते की राजन, दुसर्यांनी दिलेला हितोपदेश/सदुपदेश नाकारणे ही तुझी प्रकृती आहे. देशातल्या अंतर्गत बाह्य घडामोडींबद्दल तू अनभिज्ञ आहेस. अंधाप्रमाणे तू त्याकडे दुर्लक्ष करत आहेस, त्यांचे अवडंबर माजवले आहेस. विचार करून विवेकाने निर्णय घेण्यात तू अपयशी, अयशस्वी ठरत आहेस. लवकरच या राज्याचा सत्यानाश होईल. हे राजा! तू आणि हे राज्य विनाशाच्या कड्यावर उभे आहे,’ (वाल्मिकी रामायण-आरण्य-33संक्षेपन-23)

लक्ष्मणाने अपमानित केलेली शूर्पणखा राजसभेत एकदाहीहे माझ्या भावाअसे मदतीसाठी संबोधन करत नाही. पण तळपत्या शब्दात ती मांडते ती मनूचे राजसदस्यांना केलेले मार्गदर्शन अपेक्षा! ती म्हणते, ‘राजसभेत (लायक नसलेल्यांनी) प्रवेश करू नये, प्रवेश केला तर तर्कसंगत, युक्तिसंगत, योग्य तेच बोलावे. सभेत प्रवेश करून असभ्य, असयुक्तिक (अनर्गल) बोलणे किंवा आवश्यक तेथे बोलणे दोन्हीही अपेक्षित नाही. असे करणारे गुन्हेगार आहेत.’ मनूच्या मापदंडानुसार शूर्पणखेचे हे शब्द तिची राजनीतीबद्दलची जाण, त्वेष दर्शवणारे आहेत.

याचप्रमाणे राणी कौसल्येने दिलेला इशाराही स्पष्टवक्तेपणाचा नमुना आहे. पण त्यातला भाव त्वेषाचा, आत्मसन्मानाचा नव्हे, तर दीन, दयनीय होता. राजा दशरथाने रामाला वनवासात पाठवण्याचा निर्णय ऐकून एका क्षणात ती म्हणते, हे राजन! तुमच्याकडून या राष्ट्राचा घात झाला आहे, स्वराज्याचा घात झाला आहे, मंत्रीमंडळासमवेत सर्व प्रजाजनांचा घात झाला आहे.

रामायणकाळात विशाल भारतवर्षात तीन साम्राज्ये नांदत होती - एक लंकेचे साम्राज्य, दुसरे किष्किंधेचे, तर तिसरे अयोध्येचे साम्राज्य. या तीन साम्राज्यातल्या तीन धुरीण सशक्त महिलांचे वर्णन मी वर केले आहे - तारा, शूर्पणखा कौसल्या. यांच्या राजकीय जाणिवेबद्दलही मी वर वर्णन केले आहे. यावरून हे स्पष्ट होते की रामायणकालीन स्त्री शिक्षित होती. ती गृहकार्य, लोककार्य आणि राजकार्य या तिन्ही गोष्टींमध्ये निपुण होती.

स्त्रिया आध्यात्मिक साधनेतही मग्न होत्या. अहल्या तपस्विनी होती. ती ज्ञानयोगिनी होती, तर शबरी भक्तियोगिनी होती! अनेक रामायणांमध्येही रावणाची धर्मपत्नी मंदोदरी अखंड साधिका होती असे वर्णन आहे. थोडक्यात असे म्हणता येईल की रामायणकालीन स्त्रिया जनता वेदकालीन या परंपरा पुढे नेत होत्या.

महाभारत काळातल्या महिलांचे मूल्यमापन थोडेसे कठीण आहे. महाभारत कथेचा रंगमंच पट फार मोठा आणि विस्तृत आहे. त्याचे न्यायोचित प्रतिपादन हा दोन-तीन व्याख्यानांचा विषय आहे. तरीही या विषयाची, मर्यादित वेळेत दोन-तीन उदाहरणे समोर ठेवण्याचे धाडस करतो.

प्रसंग फार महत्त्वाचा आहे. नखशिखांत अपमानित झालेली द्रौपदी भरल्या राजसभेला प्रश्न करते - ‘‘अशा प्रकारे मला जुगाराच्या डावावर लावणे योग्य आहे की अयोग्य? उपस्थित सार्या सदस्यांनी उत्तर द्यावे.’’ यावर स्वयं भीष्म पितामह उत्तरले, ‘‘या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी असमर्थ आहे. (तस्मात् शक्नोमि विवक्तुं एतत्)’’ दोन्ही बाजूंचे दिग्गज मूक मूढ बसलेले पाहून, जीवनाच्या (अन्धातामिश्र) आकांतिक क्षणी द्रौपदी उद्गारते, ‘‘ती सभा नाही, जिथे वृद्ध नाही। ते वृद्ध नाहीत, जे धर्माबाबत मौन बाळगतात। तो धर्म नाही, जेथे सत्य नाही जे कपटाने, छलाने बाधित आहे, ते सत्य नाही।

आज हा चरण सुभाषितासारखा वापरला जातो, पण हे विसरू नका, हे उद्गार म्हणजे अकलंकित तेजस्वी कुलांगनेच्या दग्ध अंत:करणातल्या आगीतून निघालेला अग्निबाण आहे. या अग्निबाणाने जखमी झाला नाही असा एकही पुरुष त्या सभेत नव्हता. अशा अध:पतनाच्या अंधकारमय वेळी तिच्या हृदयात धगधगणारी संस्कृती किती उच्चतम आहे? ती याज्ञसेनी यज्ञातून तावून सुलाखून निघालेली सेनानी होती. धृतराष्ट्राने तिला सांत्वन देण्यासाठी वर मागायला सांगितले. त्या मानिनीने, तेजस्विनीने धर्मपुत्राला दास्यमुक्त करण्याचा वर मागितला. दुसरा वर मागताना उर्वरित चार पतींनाही मुक्त केले. त्या अंध राजाने कृतकृत्य होऊन म्हटले, आणखी एक वर माग, त्यावर ती केशमुक्ता कृष्णा बाणेदारपणे उत्तरली, ‘‘हे भगवन्, लोभ धर्माचाही विनाश करतो; तिसरा वर मागण्याचा मला अधिकार नाही. वैश्याला एक वर मागण्याचा अधिकार आहे, क्षत्रिय स्त्रीला दोन वर मागण्याचा, क्षत्रिय पुरुषाला तीन, तर विप्रजनांना शंभर वर मागण्याचा अधिकार आहे. तुम्ही दिलेल्या दोन वरांनी माझे सारे पतिदेव, पंच पती मुक्त होतील. त्यांच्या कर्तृत्वाने सारे यश मला मिळेल.’’

लोभो धर्मस्य नाशायहे वाक्य त्या सभेत किती तरी वेळ गुंजत राहिले असेल, या वाक्याचा प्रतिध्वनी उमटत राहिला असेल. परंतु दुर्दैव हे की त्या कालबाधित वेळी द्रौपदीचा तो कालजयी, दिव्य, चिरंतन संदेश कोणी लक्षात घेतला नाही. द्रौपदी शास्त्रवेत्ती होती. तिचा व्यवहार अष्टौप्रहर शास्त्रोक्त, धर्मपरायण होता. म्हणूनच अत्यंत विकट स्थितीतही ती एका सिंहासनस्थ राजाला असा शास्त्रोक्त संदेश देऊ शकली.

दुसरे उदाहरण आहे राजमाता कुंतीचे! महात्मा विदुराच्या घरी कुंती भेटताच कृष्ण दूताने तिला विचारले, ‘‘पुत्रांना कोणता संदेश देऊ? दुर्योधनाने तर माझे सांगणे मानले नाही.’’ त्यावर ती धीरोदात्त स्वाभिमानी स्त्री कुंती उत्तरली, ‘‘माझ्या मुलांना सांग, ‘हे पुत्रांनो, ज्या सत्कार्यासाठी क्षत्रिया संतानांना जन्म देते, ती वेळ आता आली आहे.’’ पुढे जाऊन जेव्हा महायुद्ध जिंकलेल्या पांडवांचा प्रमुख युधिष्ठिर जेव्हा राजाधिराज झाला, तेव्हा धृतराष्ट्र गांधारी यांच्याबरोबर राजमाता कुंती वानप्रस्थासाठी निघाली. पुत्रांनी फार आग्रह केल्यावर ती म्हणाली, ‘‘पुत्रांनो, यापूर्वी माझ्या पतीने मिळवलेले वैभव मी उपभोगले, आता पुत्रांनी मिळवलेल्या वैभवाचा मी उपभोग घेऊ इच्छित नाही. वानप्रस्थाकडे निघालेल्या माझ्या सासूसासर्यांची सेवा हेच माझे तप आहे. त्यानेच मला पुण्य लाभेल त्यांच्या सेवेतच माझा देहत्याग होईल.’’

साम, दाम, दंड, भेदाने अधिकारांच्या पदांवर, खुर्चीला चिकटून बसणार्या आजच्या काही नेत्यांकडे पाहिले की माता कुंतीची महानता लक्षात येते. ऋषिमुनींची, आध्यात्मिक संतांची जी शिकवण - ‘सत्संगातून नि:संग, नि:संगातून निर्मोहीपण, निर्मोहीपणातून निर्मलत्व आणि निर्मलत्वातून निर्वाण’ - त्या स्तरापर्यंत माता कुंती पोहोचली होती. त्या आत्मसंयमी योगिनी राजमातेने राजवैभवाला सहज तिलांजली दिली.

आणखी एक उदाहरण देता येईल, शकुंतलेचे. ही कालिदासाची शकुंतला नव्हे, तर महर्षी व्यासांची शकुंतला! राजा दुष्यंताने तिच्यावर घोर अन्याय केला. तिच्याशी गांधर्व विवाह केला, पण वचनभंग केला आणि तिला कण्व मुनींच्या आश्रमातून राजमहालात मात्र नेले नाही. आश्रमातच शकुंतलेने पुत्राला जन्म दिला. आश्रमातच पुत्रावर शिशुसंस्कार झाले. छोट्या पुत्राला घेऊन जेव्हा माता शकुंतला राजमहालात पोहोचली, तेव्हा तिला ओळखूनही राजा दुष्यंताने तिला धिक्कारले. आदिपर्वातले मूळ शब्द आहेत, ‘राजा स्मरन् अपि स्मरामि अब्रवीत्’ (आदिपर्व - 74-19) राजाने तिला दुष्ट तापसी म्हटले. राजाचे हे शब्द ऐकताच ती कण्वकन्या शकुंतला रागाने हिरवी-पिवळी झाली, अतीव दु:खी झाली, खांबासारखी निश्चल झाली. तिचे ओठ थरथरू लागले, डोळे लाल झाले, तिच्या कटाक्षातून इतका अंगार बरसू लागला की समोरचा जळून भस्म व्हावा. परंतु क्षणभरात तप:सामर्थ्याने मिळवलेले तेज स्वत:च्या ठायी एकवटून ती ध्यानमग्न झाली! स्वत:वर संयमाने ताबा मिळवून सात्त्विक संतापाने पतीला म्हणाली, ‘‘महाराज, समजून, उमजून, लोकनिंदेच्या भयास्तव का खोटे बोलत आहात? तुमच्या अंत:करणाच्या आवाजाचा अनमान करू नका. तुम्ही काय विचार करता, मी एकटी आहे? जगत्साक्षी, साक्षात देव माझ्यात वास करत आहेत. तुम्ही करत असलेल्या पापावर त्यांची नजर आहे. देवगण सत्य जाणतात. सूर्य, चंद्र, अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी, जल, यम, प्राण, दिवसरात्र हे सर्व धर्माच्या दृष्टीतून पुरुषाची कृती पाहतात. महाराज ऐका, पुत्राच्या रूपाने पतीच, पत्नीमधून जन्म घेतो. हा बालक म्हणजे तुम्हीच आहात, पुम नावाच्या नरकातून तुम्हाला तारणारा हा पुत्रच आहे. हे भूपाल, तुम्ही भार्येला काय समजता? भार्या ही गृहकृत्यदक्ष आहे, ती प्रजावती - नवप्रजेला जन्म देणारी आहे, ती पतीचा प्राण आहे, पतिव्रता आहे, पुरुषाचे अर्धे अंग आहे, पुरुषाची श्रेष्ठतम अशी सखी आहे. भार्या धर्म-अर्थ-काम यांचे मूळ आहे, भार्या तारिणी - तारणारी आहे. भार्या असलेला पुरुष क्रियावान आहे, सफल गृहस्थ आहे. श्रेयाचे मूळ भार्या आहे, नि:श्रेयाची नौका भार्या आहे. भार्येविना ऋषीसुद्धा प्रजावान होऊ शकत नाहीत, अपत्य जन्माला घालू शकत नाही.’’ (आदिपर्व - 74-संक्षेप)

शकुंतला दुष्यंतला इतके सारे निर्भीडपणे ऐकवतेच, तसेच आणखी एक मर्माघात करते - ‘‘महाराज, मातीत खेळून, लोळूनही छोटे बालक बापाच्या कडेवर चढते, त्या स्पर्शाने, अभूतपूर्व आनंदाने कोणता बाप पुलकित होत नाही? या जीवनचक्रात अत्यंत क्षुद्र असलेल्या मुंग्या स्वत:ची अंडी तुडवतात का? चिरडतात का? तुम्ही माझी उपेक्षा केली तर मी आश्रमात परत जाईन, पण तुमच्या आत्मजाताचा, मुलाचा त्याग करू नका, हीच माझी विनंती आहे.’’ तिचे हे तेजस्वी शब्द आकाशातून अचानक सत्त्ववापी व्हावे तसे बरसले आणि संपूर्ण चित्रच बदलले. शोकांतिका सुखांतिका झाली.


 

आदिपर्वात वर्णन केलेली ही शकुंतला म्हणजे एक तेजस्वी, जाज्वल्यमान व्यक्तिमत्त्व आहे. यात विशेष लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे कण्वमुनींच्या आश्रमात झालेल्या संस्कारांमुळे एका विस्फोटक क्षणी शकुंतला संयमाने वागू शकली, बोलू शकली. आधी मी म्हटल्याप्रमाणे तीजायाहोती. म्हणजे पुढच्या पिढीला जन्म देऊन वंशपरंपरा अक्षुण्ण, अखंड ठेवणारी, परंतु इथे ती पुल्लिंगी बहुवचनीदाराआहे - दाराचा अर्थ पत्नी, तरीही पुल्लिंगी बहुवचनीदाराम्हणजे द्वाराचे रक्षण करणारी कार्यदक्ष दारा! एक सामाजिक वास्तव यातून सामोरे येते, ते म्हणजे त्या काळात मुलींना आश्रमात प्रवेश होता. त्यांना आश्रमाच्या देखभालीची, आश्रम संभाळण्याची जबाबदारीही दिली जायची. कन्याही वेदांच्या, ऋचांच्या जाणकार होत्या. शास्त्र काय सांगते हे त्यांना ज्ञात होते. त्या अतिथींचे आगतस्वागत करण्यात वाकबगार होत्या. न्यायसंगत युक्तिसंगत बोलण्यात त्यांना संकोच नव्हता. त्यांचा स्वभाव आर्जवी होता. थोडक्यात, वेदकालीन परंपरा इतिहास काळापर्यंत अतूट, अभंगपणे चालत आल्या होत्या.

द्वारिकेच्या द्वारपालिका - मगध देशाचा राजा जरासंधाच्या संभाव्य आक्रमणांपासून बचाव करण्यासाठी, सुख-शांतीने जीवन व्यतीत करण्यासाठी श्रीकृष्णाच्या नेतृत्वाखाली यादवांनी भारतवर्षाच्या पश्चिम सीमेला द्वारिका स्थापन केली. सैनिकी दृष्टीने ती अप्रतिहत म्हणजे समुद्राने वेढलेली सुरक्षित नगरी आहे. तिथल्या मुली-स्त्रियाही धनुर्वेदविद्यापारंगत होत्या. आपल्या गणराज्याचे वर्णन करताना योजक श्रीकृष्ण पांडवांना सांगतात, इथे स्त्रियांनाही युद्धात लढणे माहीत आहे, तर महारथींची काय कथा? म्हणूनच आम्ही इथे भयमुक्त - अकुतोभय अर्थ पाहून लिहावा राहू शकतो. वेदकालीन संदर्भ शब्दावली पाहिली तर द्वारिकेतल्या सर्व स्त्रियापुरंध्रीकिंवाविश्पलाहोत्या. ‘पुरंध्रीम्हणजे यशस्वी कुटुंबिनी, जिचे कार्यक्षेत्र घरापुरते सीमित नव्हते, तर ग्राम-नगर हेही तिच्या कार्यक्षेत्राचा भाग होते.

व्यासाचे महाभारत हा मनुस्मृतीसारखा ग्रंथ नाही. तो तर जीवनकथांचा महासागर. त्या कथा प्रसंगांतून निवडून त्यांचे मूल्यमापन करणे बोधप्रद आहे. महाभारतात दोन पर्व आहेत - शांतिपर्व आणि अनुशासन पर्व - ज्यामध्ये भीष्म पितामह युधिष्ठिराचे शंकासमाधान करतात. दोन्ही पर्वांत युधिष्ठिरस्त्रीसंबंधी प्रश्नही विचारतो आणि पितामह नातवाला उत्तर देत जातात. त्या प्रश्नोत्तरांचे संकलन केले, तर एक उत्तम सुभाषितांचा संग्रह होईल, तो एक उत्तम संदर्भग्रंथही होईल. परंतु मी इथे त्यातली वानगीदाखल उदाहरणे देतो.

स्त्रीकोण आहे? स्त्री ऐश्वर्याकांक्षी आराध्या आहे. प्रामाणिकपणे तिचे पालनपोषण/निर्वाहन केले, तर स्त्रीश्रीम्हणजे देवी बनते. ‘पुत्रीकोण आहे? पुत्री साक्षात लक्ष्मी आहे. ती शुभदा-शोभना आहे. मंगल कार्यांमध्ये पूजनीय आहे. भार्या किंवा पत्नी कोण आहे? वर वर्णन केलेल्या शकुंतलेचे संवाद पहा. माता कोण आहे? वनपर्वाच्या शेवटी यक्ष युधिष्ठिराला प्रश्न विचारतो - भूमीपेक्षा, या जमिनीपेक्षा जड, वजनदार काय आहे? तो उत्तरतो - ‘‘माता गुरुतरा भुमे:दहा आचार्याइतके गुरू वजनदार आहेत, श्रेष्ठ आहेत, एक उपाध्याय दहा उपाध्यायांसमान आहेत, पिताश्री दहा पित्यांच्या समान आहे आणि माता ही भूमीपेक्षाही गुरुतरा/भारी/वजनदार अर्थ पाहून लिहावा आहे.’’

संक्षेपाने सांगायचे झाले, तर वेदकाळातील इतिहासकाळातली सभ्यता संस्कृती वेगळी होती तरी समान होती, भिन्न तरीही अभिन्न होती. शेकडो वर्षांच्या संस्कृतीच्या प्रवाहावरही शाश्वत मूल्यांची पकड घट्ट होती. इथे राष्ट्रजीवनाचा प्रवाह अखंड, अनवरत चालू राहिला.

4) बौद्ध, जैन धर्मांमधल्या साध्वी स्त्रिया -

इतिहास कालखंडानंतर मी एक मोठी उडी घेऊन आध्यात्मिक काळात येतो. या मोठ्या कालखंडात आध्यात्मिक विकास झाला, बौद्ध जैन . धर्मपंथांचा उदय झाला, विकास झाला. मौर्य, गुप्त, चोल, पांड्य . साम्राज्यांचा उदय अस्त झाला. अनेक शास्त्रांचा कलांचा विकास झाला. सुप्रसिद्ध वैज्ञानिक जन्माला आले. आधीचे राष्ट्रजीवन पुढे विकसित होत राहिले. या प्रदीर्घ कालखंडात या विशाल भारतवर्षात स्वतंत्र, स्वायत्त परंतु एकात्म अशा राष्ट्रजीवनाचा विकास झाला. अर्थातच स्त्रीजीवनही त्या समग्र जीवनाचा स्वाभाविक भाग होता. विविधता (नानात्व) अनेकता (बहुधात्व) हे त्या समग्रतेचे अपरिहार्य वैशिष्टह्म होते. वेगवेगवेळे ऋतू असावेत, त्याप्रमाणे वेगवेगळे रितीरिवाजही आढळून येत होते.

वेदकाळात ब्रह्मवादिनी निर्माण झाल्या, तशा बौद्ध संप्रदायात थेरींचा उद्गम झाला, बौद्ध भिक्षुणी साध्वी तयार झाल्या. थेरी म्हणजे बौद्ध साध्वी! आधी बौद्धसंघांमध्ये पुरुषच होते. भगवान बुद्धांनी त्यात स्त्रियांचा समावेशही लगेचच केला. त्यातली पहिली सुदैवी, भाग्यवान सदस्य होती त्यांची धात्री म्हणजे बहीण गौतमी, ती पहिली थेरी-साध्वी होती.

पाली भाषेत ज्ञानसंपन्न बौद्ध भिक्षूंनास्थविरम्हटले जायचे भिक्षुणींनास्थविराकिंवास्थविरिणीम्हटले जायचे. त्याचा अपभ्रंश होऊनथेरीहे नाव पडले असावे. यावरून ज्ञानसंपन्न बौद्ध भिक्षुणी म्हणजे थेरी हे स्पष्ट होते. बौद्ध इतिहासकारांनी 73 भिक्षुणींचा नावासहित उल्लेख केला आहे.

या भिक्षुणी सर्व वर्णांच्या होत्या, इतकेच काय, गणिकाही आपल्या जीवनात परिवर्तन आणून साध्वी झाल्या होत्या. श्रीकृष्णाचे एक गीतावचन आहे - ‘जर एखादी दुराचारी व्यक्तीही अनन्य भावाने माझी भक्ती करेल, तर तीही साधू समजण्यायोग्य आहे’, त्यांचे प्रत्यक्ष क्रियान्वयन भगवान बुद्धांनी केले. जशा महाभारतात व्याधगीता, उद्धवगीता आहेत, तशा बौद्ध साहित्यात अनेकथेरीगाथाआहेत. सर्वांचा मुख्य विचार आध्यात्मिक आहे. वेदसंहितांमध्ये सूर्यासारख्या ऋषिकेच्या मंत्रांचे जे स्थान आहे, तेच स्थान बौद्ध धर्मपंथामध्ये साध्वींच्या गाथांचे आहे.

सर्वात मोठी गाथा आहे साध्वी सुमेधाची! ती राजकुमारी होती. परंतु तिला गृहस्थी जीवनात रस नव्हता. राजा अनिकर्त तिचे पाणिग्रहण करू इच्छित होता. पण आईवडिलांचा आग्रह दूर सारून ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली. माता, पिता राजा अनिकर्ता यांच्यासमोर तिने आपला निर्णय निग्रहाने मांडला. ‘‘महाराज, सांसारिक जीवनात मला काहीही रस नाही. जन्मापेक्षाही किंवा जन्माइतकेच मरणही सुनिश्चित आहे. त्यापासून कोणाचीही सुटका नाही. धन, मान, प्रतिष्ठा हे सारे क्षणिक आहे. तापलेले लोखंड हे चटका दु:खच देईल. कृपया तुम्ही तुमच्या महालात परत जा. माझ्या हृदयात जणू एक प्रखर आग धगधगते आहे.’’ राजकुमारी सुमेधाने कठीण मार्गाची निवड आणि स्वीकार केला. तपोमय जीवन जगून तिने मोक्ष प्राप्त केला.

ऋषिदासी नावाची आणखी एक साध्वी होती. आपल्या गाथेत ती स्वत:ची कथा सांगते - पाटलीपुत्र नगरीत दोन भिक्षुणी होत्या. त्यांनी विचारले, ऋषिदासी, तुला भिक्षुणी का बनायचे आहे? आम्हाला मोकळेपणाने सांग, तू एक सुंदर युवती आहेस, तुझ्यात क्षमता आहे. त्या बुद्धी-सौंदर्याची उपेक्षा करून तुला ब्रह्मचारिणी का बनायचे आहे?

ऋषिदासीने त्यांच्याजवळ आपले मन मोकळे केले.

‘‘असे पाहा, मी उज्जयिनीच्या श्रीमंत दांपत्यांचे एकुलते एक अपत्य आहे. माझ्या आईवडिलांनी अयोध्येच्या प्रमुख व्यापार्याशी माझे लग्न लावून दिले. पहिल्या दिवसापासून मी माझ्या घरच्यांची मनोभावे प्रामाणिकपणे सेवा केली. तरीही माझ्या पतीने सासूसासर्यांना सांगितले की माझे माझ्या पत्नीबरोबर पटत नाही, तिचा दोष काय आहे? ती तर शीलवती आहे असे सांगूनही पतीला ते पटले नाही. निरुपायाने मला माहेरी यावे लागले. माझ्या वडिलांनी माझे पुन्हा एका धनिकाशी लग्न लावून दिले. पुन्हा तीच अवस्था! माझे तिसर्यांदा लग्न झाले, त्याची कथा न्यारीच! दारावर भिक्षा मागायला भिक्षू आला होता. त्याचे तारुण्य बघून माझ्या वडिलांनी त्याला माझा स्वीकार करण्याची विनंती केली. त्याने संमती दिली. आम्ही दोघांनी विवाह केला. थोडे दिवस उलटताच पती पुन्हा संन्यासी झाला. जीवनाचे चक्र कसे फिरते ते मी खूप जवळून पाहिले. मी आईवडिलांना स्पष्ट सांगितले, मी खूप जग पाहिले, त्यातून थोडा फार धडा घेतला, शिकले, आता मी विरक्त होऊ इच्छिते. दोघेही संतापले, पण मी माझ्या म्हणण्यावर ठाम राहिले. शेवटी नाइलाजाने आईवडिलांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलीला संमती दिली आणि ही मी समोर उभी आहे तीब्रह्मचर्यव्रताच्या अदम्य इच्छेने!’’ आज ऋषिदासीच्या गाथेत 46 गीते उपलब्ध आहेत.

शुभा, भद्रकुंडलकेशी, उत्पलवर्णा, अंबापाली, तिस्सा, धीरा, मित्रा, भद्रा, उपसामा, मुक्ता, धर्मतृष्णा, धर्मशक्ती . अशाच प्रकारच्या साध्वी होत्या. यात गणिका आणि विधवांचाही समावेश होता. घोर तपस्या आणि जीवनशुचिता जगण्यातलं पावित्र्य यामुळे त्यांना समाजात परमश्रद्धेचे स्थान मिळाले. वेदकालीन ब्रह्मवादिनींपेक्षाही या दिव्यात्मा भिक्षुणीचे जीवन कठीण कष्टमय होते. या सार्या साध्वी किंवा भिक्षुणी बौद्धसंघाच्या योजनेनुसार अज्ञात सुदूर देश प्रदेशात धर्म प्रचारिका म्हणून गेल्या. भूतपूर्व सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा सागर पार करून श्रीलंकेत गेली होती, हे सर्वविदित आहेच. अर्वाचीन आध्यात्मिक विचारधारांच्या विश्वसंचाराचा इतिहास हे स्पष्टपणे सांगतो, की या बौद्धधर्मी विदुषी, पंडिता, ब्रह्मवादिनी साध्वी याच विश्वातल्या आद्य धर्मप्रसारक होत्या. त्या कर्मनिष्ठ, अनिकेत अभय अशा समर्पित साध्वींनीकृण्वन्तो विश्व आर्यहा ऋषिघोष प्रस्थापित केला होता.

बुद्धसंघांनी विश्वभर संचार करत असताना जागोजागी बुद्धमंदिरे म्हणजेच बौद्धविहार उभे केले. त्या मंदिरांचे अविभाज्य अंग होते विद्यालय! आजही मल्याळी भाषेत विद्यालयासाठी शब्द आहे, पल्तिकूडम, ज्याचा अर्थ आहे मंदिराचे अभिन्न अंग! बौद्ध धर्मप्रसाराच्या बरोबरीने या आनुषंगिक विद्यालयांमध्ये बौद्ध मुलींच्या शिक्षणाचाही श्रीगणेशा झाला होता. त्यामुळेच सनातन धर्म मानणार्या कन्यांपेक्षा बौद्धधर्मीय मुली शिकल्या. पुढे जाऊन या भिक्षुणींनी लिहिलेले साहित्य तयार झाले.

जैन धर्मातल्या साध्वींचे योगदानही असेच आहे. सर्वसंगपरित्याग करून संन्यास घेणे ही जैन धर्मात प्रथा झाली. स्त्रियाही त्यात मागे नव्हत्या. आजही ती प्रथा सुरूच आहे. अतिशय निष्ठेने तिचे पालन केले जाते. जैन साध्वींचा छोटासा समूह अनवाणी पायांनी मूकपणे एका गावाहून दुसर्या गावाला जाताना आपण आजही पाहतो. सूर्योदय होताच प्रस्थान करायचे आणि सूर्यास्ताला इच्छित स्थळी पोहोचायचे, ही त्यांची पद्धत आहे. आजच्या तथाकथित प्रगत काळातही या सात्त्विक, शुद्ध साध्वींकडे समाज आदराने पाहतो. थोडयाच दिवसांपूर्वी पश्चिम भारतातल्या एका सुसंपन्न घरच्या अतिउच्चशिक्षित कन्येने संन्यास घेतल्याच्या बातमीने लक्ष वेधून घेतले होते. अशा धन्य, पावन व्यक्तीसमोर कोणता कोणती सदाचारी, सज्जन व्यक्ती झुकणार नाही?

थोडक्यात, मोक्षाप्रत नेणार्या सर्वश्रेष्ठ तरीही कठीण, काटाकुट्यांनी भरलेल्या/कंटकाकीर्ण मार्गावर जाण्यासाठी जैन धर्माने जैन मुली-स्त्रियांना कोणतेही बंधन घातले नव्हते. वेदकाळातली ही परंपरा कायम टिकलेली आपल्याला दिसते. ‘आत्मदीपो भव’ - स्वत: स्वत:चे मार्गदर्शक बना, मार्ग दाखवणारा दिवा बना हे त्यांचे बोधवाक्य होते.

5) स्मृतींची भूमिका -

एका बाजूला या प्रकारे साध्वींचा संचार दिसत होता, तर दुसर्या बाजूला स्मृतींनी घातलेली प्रतिगामी बंधने समाजात प्रमाण मानली जात होती. स्मृतींनी प्राचीन परंपरागत सामाजिक जीवनाला विधिनिषेधांच्या कर्मठ चौकटीत बंदिस्त करून टाकले. या काळात समाजाचे प्रवाही रूप एक संस्थात्मक, यांत्रिक रूप घेऊ लागले होते. या यांत्रिक व्यवस्थेने वेदकाळातल्या स्वतंत्र स्त्री-जीवनचा घास घेतला. इथेएक बीजातून अंकुरलेली दोन दलेहे वेदांचे प्रतिपादन विस्मृतीत गेले. मनूने म्हटले, ‘पती दुराचारी, दुर्गुणी, परस्त्रीवर अनुरक्त झालेला असला तरी पतिव्रता स्त्रियांसाठी तो देवासमान पूजनीय असतो’.(30) वेदकाळात आढळून येणारी आध्यात्मिक, उच्च बौद्धिक समानता स्त्रियांना नाकारली जाऊ लागली. पुढे मनू म्हणतो, ‘स्त्रियांसाठी स्वतंत्र यज्ञ, स्वतंत्र तप किंवा उपवास नाही. पतीची सेवा हाच तिच्यासाठी यज्ञ आहे. ती केल्यानेच तिला स्वर्गप्राप्ती प्रतिष्ठा प्राप्त होईल. यापुढे जाऊन मनू धमकीच्या स्वरात म्हणतो, ‘जी स्त्री पती जिवंत असताना व्रत, उपवास किंवा तपाचरण करेल, ती पतीचे आयुष्य कमी करेल, परिणामत: नरकात जाईल.’ वैदिक काळात जिच्यावर गोसंवर्धनाची जबाबदारी होती, परिणामत: जिला दोहन करणारी म्हणून दुहिता म्हटले जायचे, तिचे स्थान स्मृतिकारांच्या दृष्टीने संकुचित झाले. त्यांनी आदेश दिला की, ‘लहानपणी, तरुणपणी अथवा म्हातारपणी, स्त्रीने आपल्या स्वतंत्र इच्छेने घरची कामे करायला मनाई आहे.’ यावरच जोर देऊन पुढे ते म्हणतात, ‘स्त्रीने लहानपणी वडिलांच्या, तरुणपणी पतीच्या तर म्हातारपणी मुलाच्या आज्ञेत राहावे. स्वतंत्र राहू नये. स्वतंत्र राहणारी स्त्री सासर-माहेरच्या, दोन्ही कुळांना बदनाम करेल.’

या ठिकाणी मनू स्त्रियांच्या दुराचाराबद्दल, दुर्वर्तनाबद्दल बोलत नाहीत, तर त्यांनी स्वतंत्र रहाण्यातल्या संभाव्य जोखमीकडे अंगुलिनिर्देश करतात. त्यांच्या म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की, व्यक्ती, कुटुंब समाज सर्वांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही पिता, पती पुत्र या पुरुषांची आहे. प्रमुख मुद्दा की सुसंस्कारित सामाजिक सदाचारी कौटुंबिक जीवन तेव्हा अस्तित्वात होते.

मात्र हे निर्विवाद सत्य आहे आपण मान्य केलेच पाहिजे की वेद उपनिषदांच्या काळापेक्षा स्मृतिकाळात स्त्रियांची स्थिती घसरली होती. परंपरेने चालत आलेले सोळा संस्कार स्त्रियांसाठीही अनिवार्य होते, पण त्यांना वेदमंत्रांचे गायन उच्चारण करण्यास मनाई केली गेली होती. अपवाद मात्र लग्नाचा होता. यावरून स्पष्ट होते की तेव्हापासून त्यांचे वेदपठण बंद झाले. जानवे धारण करणे, त्यांचे उपनयन किंवा मौंजीबंधन नाकारले गेले, ब्रह्मोपदेश म्हणजे शिक्षणात आडकाठी निर्माण झाली. त्यांनी मंत्रोच्चारणासह अनुष्ठान करण्यास मनाई झाली. होम-हवनापासून त्यांना दूर ठेवले गेले. पतिसेवा हाच धर्म झाला आणि घरकाम हेच अग्निहोत्र झाले. म्हणजेच स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व नष्ट होऊन ती पुरुषावर अवलंबून राहणारी, परावलंबी झाली.

या ठिकाणी एक स्पष्टीकरण मी देऊ इच्छितो. स्त्रियांच्या मानसन्मानद्भच्या आणि प्रतिष्ठेच्या संदर्भाने अनेक विद्वान मनूच्या एक श्लोकाच्या उल्लेख करतात, संदर्भ देतात. ज्याचा अर्थ सांगितला जातो, ‘जिथे स्त्री पूजनीय मानली जाते, तिथे देवही प्रसन्न होतात. जिथे स्त्रीचे पूजन केले जात नाही, तिथे सार्या क्रिया निष्फळ होतात.’ लक्षपूर्वक विश्लेषण, विवेचन केले तर लक्षात येते की हा श्लोक पुरुषांना उद्देशून आहे. जे वर्तन पुरुषाकडून अपेक्षित आहे, त्याचे हे वर्णन आहे. पुरुषाचा स्त्रीकडे पहाण्याचा दृष्टीकोन, तिच्यासंबंधी त्याचे वर्तन कसे असावे ते सांगितले आहे. यापूर्वीचे श्लोक या श्लोकाहून वेगळे आहेत. ते सामाजिक आदेश देणारे आहेत. स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवणे, वेदाध्ययनापासून दूर ठेवणे दुसर्या बाजूला तिला पूज्य मानणे, दोनात दिवस-रात्रीसारखा फरक आहे. शिक्षण नसलेली अशिक्षित स्त्री पूजनीय असू शकेल, पण सर्व पूजनीय स्त्रिया शिक्षाविभूषित असतीलच असे म्हणता येत नाही. ‘पूज्य मानणेहा भावनेचा विषय आहे, तर शिक्षण देणे ही सामाजिक प्रतिष्ठेची, सामाजिक दर्जाची गोष्ट आहे.

इथे स्पष्ट दिसते की, ‘वेदकालीन स्वतंत्र स्त्रीजीवनावर, स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर स्मृतिकाळात बंधने आली, बेड्या पडल्या. मनुस्मृती या बंधनांमागची कारणे मात्र सांगत नाही. त्याचा रोख कायद्याचा आदेश देण्याचा आहे. ‘स्वर्ग प्राप्त होणार नाही, नरकात जालअशा मृत्युपश्चात शक्यता तो कोणत्याही प्रमाणाशिवाय, तर्काशिवाय सांगतो.

मनुस्मृतीच्या रचनेचा काळ कोणता? त्या वेळचा इतिहास काय? राजकीय प्रभुत्व राज्य कोणाचे होते? त्याचा प्रजेवर काय परिणाम होता? याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही, त्यामुळे सामाजिक-राजकीय परिस्थितीबाबत निष्कर्ष काढता येत नाही. पुढे जाऊन मनुस्मृती ही मनूच्या कल्पनेचा विलास आहे की त्या वेळच्या लोकव्यवहारांचे त्याने संकलन केलेले आहे? मनू त्यांचा रचनाकार आहे की संकलनकर्ता, याचा खुलासा होत नाही. याज्ञवल्क्य, पराशर अशा अन्य स्मृतिकारांची स्थितीही मनूसारखीच आहे. शेवटी नि:संदेहपणे जे सत्य समोर येते ते म्हणजे, स्मृती कालखंडात स्त्रियांच्या वेदकालीन उच्चतम स्थितीचे अध:पतन झाले, क्षरण झाले. परिणामत: वेदमंत्र रचणार्या स्त्रियांचा प्रवाह आटला, स्त्रियांमधली ती उच्च ज्ञानपरंपरा आटली. सूर्या, अपाला, लोपामुद्रा यांच्यासारख्या ज्ञानी स्त्रिया निर्माण होण्याची शक्यताही आटली. जी पत्नी अग्निहोत्रात पुरुषाच्या बरोबरीने सहभागी असायची, ती केवळजायाम्हणजे प्रजा जन्माला घालणारी या भूमिकेत उरली. गार्गी, मैत्रेयी, इतरा यासारख्या विद्वान पंडिता अप्राप्य, अस्पर्श, वास्तवातल्या नव्हे, तर नभांगणातल्या तारकांसारख्या दूरस्थ ठरल्या. हळूहळू स्त्रियांसाठी संस्कृत भाषा शिकवणे, वापरणे बंद झाले. ‘नि:शेषजाड्या पहाअसे वर्णन केलेली भगवती देवी सरस्वती भारतातल्या स्त्रियांसाठी अनुकरणीय नव्हे, तर प्रार्थनेतली बनली. देवी भगवती सरस्वती वास्तवात नव्हे, तर प्रार्थनेत उरली.


 

संशोधन-अध्ययनातून हे समोर येते की क्षरणाची, स्त्रियांच्या शैक्षणिक सामाजिक स्खलनाची प्रक्रिया कालिदासाच्याही पूर्वी, महाकवी भासांपासून सुरू झाली. भासांनी तेरा नाटके लिहिली. त्यांच्या या नाटकांमधली स्त्रीपात्रे प्राकृत भाषा बोलतात. पुढे संस्कृत नाटकांमध्ये ही परंपराच झालेली दिसते. व्याकरणासंबंधी किंवा या साहित्यासंबंधी तर्क समीक्षा काहीही असो, जेव्हा महाकवी भासांच्या श्रीकृष्णावरीलबालचरितम्या नाटकात कृष्णपिता वसुदेव संस्कृतमध्ये बोलतो, पण माता देवकी प्राकृत भाषेत बोलते, हे पाहून सामान्य वाचक आश्चर्यचकित होतो! ‘मध्यमव्यायोगया नाटकात भीमाचा पुत्र घटोत्कच संस्कृतात बोलतो आणि त्याची आई हिडिंबी किंवा ब्राह्मणी दोघीही प्राकृत भाषा बोलतात. वसुदेव, देवकी, धृतराष्ट्र, गांधारी या सर्वांचा स्तर, सामाजिक स्थान, परिस्थिती, संस्कार सर्वच समान असतानाही, त्यांचे जगणे सारख्याच परिस्थितीत असूनही त्यांना समान भाषेचा अधिकार नाही! अशी उच्च-नीचता किती अस्वाभाविक. ‘दूत घटोत्कचम्मध्ये राजा धृतराष्ट्र संस्कृत भाषेत, तर सम्राज्ञी गांधारी प्राकृत भाषेमध्ये बोलते.

महाकवी कालिदासही या विरोधाभासाच्या रस्त्यावरूनच वाटचाल करत होते, त्याच मार्गाचे पाईक होते असे म्हटले पाहिजे. त्यांच्याविक्रमोर्वशीयममध्ये देवकन्या उर्वशी प्राकृत भाषेत बोलते, तर तिचा पुत्र शुद्ध संस्कृत भाषा बोलतो. त्यांच्याशाकुंतलया लोकोत्तर कलाकृतीत अप्सरा मेनकेची सुपुत्री शकुंतला, जिचे पालनपोषणच महर्षी कण्वांच्या गुरुकुलात झाले होते, ती प्राकृतात बोलते आणि राजाचा सेनापती मात्र संस्कृत बोलतो. आणखी एक उदाहरण - शकुंतलाअन्यतो गमिष्यामिसाठीअण्णदो गिमिस्संअसे म्हणते. (संस्कृतचे भाषांतर करावे.) अर्थ पाहून लिहावा केवढी ही विटंबना? रासवट अशा पुरुषाच्या तोंडी संस्कृत आणि ऋषिकन्या स्त्रीच्या तोंडी प्राकृत! हे कोडे कसे सुटणार? मात्र निष्कर्ष नक्की काढला जाऊ शकतो - एका दाण्याची दोन दले हा वेदांचा सिद्धान्त विस्मरणात गेला होता. ते चक्र उलटे फिरले होते. ‘संस्कृत नाटकांतले पुरुष संस्कृत भाषेत बोलतील स्त्रियांच्या मुखी मात्र प्राकृत भाषाहा भेदभाव, हा तर्क अत्यंत धोकादायक होता. हा नियम नाट्यकथेतल्या पात्रांच्या स्तरावर आधारलेला नव्हता, तर मात्र आणि मात्र केवळ लिंगावर आधारित होता.

पुढे साहित्यातही पुरुषप्रधानतेची हीच भावना रूढ झाली. ‘मातृवत पर दारेषुअसा उपदेश केलेला होता, मात्र प्रचलित तत्कालीन साहित्यात स्त्रीला गौण स्थान दर्जा दिला गेला. स्त्रीला नगण्य दुय्यम दाखवले गेले. स्त्रीची निंदा अवहेलना करणे हे स्वाभाविक झाले, सहज झाले. या कालखंडातल्या साहित्यकृतींमध्ये - सत्यवान-सावित्री, नल-दमयंती, दुष्यंत-शकुंतला, अत्री-अनसूया यांच्या कथा, अशा व्यक्तिमत्त्वांचे चित्रण दिसेनासे झाले. त्याजागी बाईची अवहेलना, निंदानालस्ती हा कथेचा विषय झाला. याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजेकथा सरितसागरयात स्त्री-पुरुषांवरच्या शेकडो कथा आहेत. पण यातली एकही कथा समाजजीवनाला पोषक उपयुक्त कथा या श्रेणीची, या दर्जाची नाही.

जगप्रसिद्ध अशा पंचतंत्र या ग्रंथाचे उदाहरण या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यातल्या निवडक बोधकथा लहानमुलांना सुसंस्कार देणार्या आहेत. परंतु त्यात अशा अनेक कथा आहेत ज्या स्त्रीपुरुष परिवारांच्या दृष्टीने अयोग्य आहेत. असे वाटते की पंचतंत्राचे लेखक स्त्रीद्वेष्टे असावेत. त्यात सर्व स्त्रीवर्गाबद्दल अनुदार उद्गार आहेत आणि त्यांच्या समर्थनार्थ त्यात (अनर्गल) अश्लाघ्य कथाही लिहिल्या आहेत. उदाहरणे पाहा - ‘एकाबरोबर बकवाद करते, दुसर्याकडे प्रेमाने पाहते, तर तिसर्यावर मनापासून प्रेम करते, तिला खरा कोण प्रिय हे कसे समजावे?’

 

इतर मंत्रद्रष्ट्या ऋषिकाही अदितीसारख्याच आहेत. त्यातली प्रत्येक स्त्री ही सिद्ध साध्वी विभूती आहे, अनन्या आहे, एक दुसरीची सावली किंवा प्रतिकृती नाही. अपालाने तर ती ‘अबला’ नव्हे, तर सबला आहे हेच सिद्ध केले आहे. तिच्या अखंड तप:साधनेने तिने स्वत:चे शरीर रोगमुक्त केले आणि ती पतीची स्वीकृता झाली. घोषा ही वेदप्रचार करणारी कन्या होती. जुहू ही ब्रह्मवादिनी होती. संसाराच्या भरती-ओहोटीतही ती बृहस्पतीची ब्रह्मजाया झाली. दक्षिणा तिच्या नावानुसार दानाचे प्रतिपादन करणारी ब्रह्मवादिनी होती. ती दानी व्यक्तीलाच राजासमान मानत असे. विश्वाला सेवाधर्माचा पवित्र मार्ग दाखवणारी आद्य महिला कदाचित दक्षिणा ही ब्रह्मवादिनीच असावी. विदर्भ राजाची एकुलती एक मुलगी आणि अगस्त्य ऋषींची पत्नी लोपामुद्रा हे आत्मसंयमाचे ज्वलंत उदाहरण आहे. अम्भृणी ऋषींची सुपुत्री वागाम्भृणी ही अद्वैत सिद्धान्ताची वैदिक उपज्ञाता म्हणजे निर्माती मानली जाते. ज्या श्रेष्ठ/महान ऋषींना राष्ट्रसिद्धान्ताचे ज्ञान झाले, अशा ‘भ्रदेच्छु सर्विद महर्षि’मध्ये वागाम्भृणीची गणना होते. ती म्हणते, ‘मी समस्त राष्ट्रीय संपदेची, राष्ट्र भांडाराची स्वामिनी आहे. यज्ञ करायला लायक अशा विभूतींमध्ये व यज्ञ करण्याचा अधिकार असलेल्या विभूतींमध्ये पहिली ज्ञानवती मी आहे.’ केवढा हा आत्मविश्वास आणि आत्मसन्मानाची भावना!

भगवान कृष्णाने वर्णन केल्याप्रमाणे आर्जव हा दैवी गुण आहे. तो पुरुष किंवा स्त्री दोघांमध्येही असणे गरजेचे आहे. पण पंचतंत्रातल्या कथांचा लेखक म्हणतो, ‘स्त्रीच्या हृदयांत जे असते ते वाणीत नसते, जे मनात असते ते जिभेवर नसते, जे तिच्या जिभेवर असते ते बाहेर येत नाही. जे मनात येईल ते ते ती करते. तिचे वागणे अजब, अनाकलनीय असते. असे वर्णन स्त्रीमध्ये आर्जव हा गुण अजिबात नाही याचा निर्देश करते. पुढे जाऊन ते लिहितात - स्त्रीमध्ये असत्य, धाडस, माया, मूर्खपणा, अमर्यादित लोभ, निर्दयपणा अपावित्र्य हे दुर्गुण जन्मजातच असतात. स्त्रीमध्ये जन्मजात असुरी संपत्तीचा लोभ असतो, असा ते शिक्का मारतात.

कामवासना अनियंत्रित असेल तर ते सर्वांसाठीच विनाशकारक ठरते. पण पंचातंत्राचा ग्रंथलेखक स्त्रीसमूहासाठी वेगळेच मत प्रदर्शित करतो. ‘कोट्यवधी लाकडांनीही आग तृप्त होत नाही. सगळ्या नद्या येऊन मिळाल्या तरी समुद्र तृप्त होत नाही. अनेकांच्या मृत्यूनेही यमराज तृप्त होत नाही. त्याप्रमाणे सुंदर स्त्रीला कितीही पुरुष मिळाले तरी ती तृप्त होत नाही.’ यापुढे जाऊन स्त्रियांच्या स्वभावधर्माविषयी ते लिहितात, बाईसाठी कोणताही पुरुष अभोग्य नाही, वर्जित नाही. पुरुषाच्या वयाचा, रूप-गुणाचा त्याच्याशी काही संबंध नाही, सगळे पुरुष तिच्यासाठी संभोग्य आहेत.’

थोडक्यात, इतिहासोत्तर काळात स्त्रीची स्थिती स्थान आकुंचित होत गेले. पुरुषांचे वर्चस्व वाढले. सामाजिक स्थान वावर कमी होऊन तीअन्तर्जनम्म्हणजे अंत:पुरात राहणारी - याचा अर्थ चार भिंतींच्या आत राहणारी झाली. (केरळी ब्राह्मण आपल्या स्त्रियांसाठी या शब्दाचा वापर करतात.) म्हणजेच आपल्या कुलाची द्वारपालिका, रक्षणकर्ती म्हणूनदाराजिला म्हटले जायचे, अशी स्त्री दाराच्या आत बंदिनी झाली. स्त्री ही पुरुषासाठी उपहासाचा विषय झाली. पूजा-पठणातला तिचा सहभाग थांबला, ती नुसती प्रेक्षक झाली. एवढेच नाही, तर तिला पुरुषाच्या पतनाचे कारण मानून दोषी मानले जाऊ लागले.

उत्थान किंवा स्खलनहे स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या स्वभावावर अवलंबून आहे. प्रत्येकाचे वर्तन त्याला जबाबदार आहे. एकाच्या (पुरुषाच्या) पतनासाठी दुसर्याला (स्त्रीला) जबाबदार धरणे किंवा तसे मानणे हे चूक आहे. असा युक्तिवाद ग्राह्य धरता येणार नाही. उपनिषदकालीन राजाच्या सांगण्यावर इथे विचार केला पाहिजे. ते म्हणतात, ‘माझ्या राज्यात कोणीही स्वैर नाही, तर स्त्री स्वैराचारी कशी होईल, का होईल?’ ‘ स्वैरी, स्वैरिणी कुतु:’ (छांदोग्य 5-11.5.) तात्पर्य - स्त्री किंवा पुरुष मानसिक दौर्बल्यामुळे स्वैराचारी होतात आणि आपल्या व्यभिचाराला दुसर्याला दोष देणे हा अन्याय आहे. परंतु या चर्चित कालखंडात दुर्दैवाने असेच घडले.

असे असले, तरी तामिळ प्रदेशाचे सकारात्मक उदाहरणही समोर येते. जगातल्या अभिजात भाषांमध्ये आज तामिळ भाषा गणली जाते. त्या भाषेत शब्दसंपदेचे भांडार उपलब्ध आहे. उदा., त्या भाषेत धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार पुरुषार्थांसाठी स्वत:चे मौलिक शब्द आहेत - अरम्, पोरुल, इंपम्, वीडु. अन्यत्र संस्कृत-प्राकृत फरक केला गेला, स्त्रीसाठी संस्कृतचा वापर दुष्प्राय ठरला, पण तामिळ स्त्रिया कोणत्याही अडथळ्याशिवाय, प्रतिबंधाशिवाय आपल्या मातृभाषेचा उपयोग करू शकल्या. म्हणूनच आनंददायक गोष्ट अशी की या काळात तामिळ प्रांतात कण्णगी, औवैयार, आंडाल अशा संत-साध्वी स्त्रियांचा दिव्योदय झाला. आजही औवैयार, आंडाल यांनी लिहिलेले शेकडो अभंग तामिळनाडूच्या गल्लोगल्ली गायले जातात. यारामसेतूच्या प्रदेशात वेदकाळातली ब्रह्मवादिनी परंपरा या दिव्यात्मा संत स्त्रियांनी अक्षुण्ण, अखंडित ठेवली.

या काळातला दिव्य संत पुरुष तिरुवल्लुवर यांनी लिहिलेल्यातिरुक्कुरलम्हणजे संतवचनांमध्ये स्त्री-पुरुष दोघांच्या गुणधर्माबद्दल लिहिले आहे. पतीच्या कमाईत सुखाने संसार करणारी, घराची प्रतिष्ठा सांभाळणारी, परंपरेचे पालन करणारी, सत्याचे पालन करणारी, सत्याचरण करणारी, चारित्र्याला वैभवापेक्षा महत्त्व देणारी, स्वत:च्या सद्वर्तनाने दुराचार्यांच्या मनात भय निर्माण करणारी, कर्तव्यांचे पालन करून स्वत:ला सिद्ध करणारी स्त्री म्हणजेसुशीलाअसते स्त्री!

त्यांचे पुरुषांना सांगणे आहे, कीपरस्त्रीची अभिलाषा, परस्त्रीवर प्रेम हा मूर्खपणा आहे. परस्त्रीकडे डोळा वर करून पाहणे हेच खरे पौरुषाचे लक्षण आहे, तोच धर्म आहे, तोच सदाचार आहे. त्यातच कल्याण आहे.’ (तिरुक्कुरल - धर्मप्रकरण अधिकार 6:15 - संक्षेप.)

दक्षिणेत प्रकटलेल्या औवेयार अंडाल यांच्या भक्तीच्या झर्यांचे पुढे पारतंत्र्याच्या काळात देशभर भक्ती आंदोलनात रूपांतर झाले, याला इतिहास साक्ष आहे. राष्ट्रीय संस्कृतीची प्रवाह अक्षुण्ण, अखंड ठेवायला त्या कारणीभूत ठरल्या.

 

आपल्या धार्मिक परंपरेत, वैदिक परंपरेत स्त्रीचे स्थान व माहात्म्य सांगणारी अशा प्रकारची अनेक उदाहरणे वैदिक साहित्याच्या संहितांमध्ये आढळतात. त्यावरून हेच सिद्ध होते की, त्या (वैदिक) कालखंडात कुटुंब हेच आपल्या राष्ट्रीय समाजाचे सर्वात छोटे एकक होते. कुटुंब हेच वैयक्तिक मनुष्य जीवनाकडून सामाजिक, राष्ट्रीय जीवनाकडे जाणार्‍या मोठ्या पर्वतप्राय मार्गाची पहिली पायरी होती. व्यक्तीकडून समष्टीकडे जाणार्‍या वाटेची सुरुवात कुटुंबापासूनच होत होती. त्यात भारतीय समाजाने नर-नारी, स्त्री-पुरुष असा भेद केला नव्हता. एकाच एककाचे ते दोन घटक होते. म्हणूनच त्यांना कुटुंबरूपी रथाच्या दोन चाकांची यथार्थ उपमा दिलेली आढळते.



6) पारतंत्र्याच्या काळात स्त्रियांचे स्थान

 

हा काळ नीट समजून घेण्यासाठी आपण या पारतंत्र्याच्या काळाचे दोन भाग करू. पहिला नजीकचा आक्रमणकाळ दुसरा त्यापूर्वीचा! निकटच्या काळातले आक्रमक हे इस्लाम धर्मीय, मुस्लीम आक्रमक होते. त्यांचे आक्रमण हे राजकीय, भूभागावरचे नव्हते, तर धार्मिक होते. त्यांचा व्यवहार असहिष्णू, कर्मठ होता. जोरजबरदस्ती ही त्यांची रीत होती. त्यापूर्वीचे आक्रमणकारी इसाई धर्मीय होते. त्यांचे आक्रमण केवळ राजकीय नव्हते, तर सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि धार्मिकही होते. त्यांच्यापैकी पोर्तुगाली लोक असहिष्णू होते, तर उर्वरित कूटनीतिज्ञ होते. त्यांचीपूतनानीती होती. अंततोगत्वा, दोन्हीही धोकादायकच होते. या प्राचीन भारतवर्षातल्या समस्त स्त्रीजातीवर या दोन्ही आक्रमक राज्यकर्त्यांचा काय दुष्परिणाम झाला, याचा आपण विचार करू.

नजीकच्या इस्लामी आक्रमणकर्त्यांचा स्वभाव आणि वर्तन होते... स्त्रियांचे अपहरण, बलात्कार, स्त्रियांना गुलाम करणे, त्यांची विक्री करणे. त्यांच्या देशातल्या मुख्य शहरांमध्ये हिंदुस्थानी स्त्रियांच्या खरेदी-विक्रीचा बाजारही त्यांनी भरवला होता. छोट्या छोट्या मुलीही या घोर अन्यायातून वाचल्या नव्हत्या. इथला राष्ट्रीय समाज अशा अभूतपूर्व हैवानी कृत्यांना पहिल्यांदाच समोरा जात होता. बुद्धिमान पुरुषांची असाहाय्यताभार्या रूपवती शत्रूया सुभाषितातून व्यक्त होते. तत्कालीन समाजातही याच असाहाय्यतेचा विस्फोट झालेला दिसतो. त्यापूर्वीच्या काळात, रूपवती पत्नी ही पुरुषाची शान मानली जायची. परंतु सांप्रत काळातल्या यवनी आक्रमकांच्या वागणुकीमुळे रूपवान, सौंदर्यवती पत्नी ही जोखीम बनली, ओझे झाली. तिचे रक्षण कसे करायचे हाच प्रश्न समाजासमोर उभा ठाकला. आणि हिंदू समाजालाकूर्मन्यायाचेपालन करावे लागले. कासवाला जेव्हा घातक संकटाची चाहूल लागते, तेव्हा ते आपले तोंड हातपाय कडक पाठीच्या आत खेचून घेते स्वत:चे संरक्षण करते. त्यालाचकूर्मन्यायम्हटले जाते. तो कासवाचा संरक्षणाचा साधा, सोपा उपाय असतो. कामांध मतांध आक्रमकांपासून बचाव करण्यासाठी हिंदू समाजाला उपाय शोधावे लागले. पराभूत पराधीन झालेल्या समाजाला स्त्रियांना घरात लपवून ठेवावे लागले. पडदा, घुंघट घेण्याची पद्धत रूढ झाली. स्त्रियांचे मोकळेपणे फिरणे, एकत्र येणे, संवाद संपून गेला. मंगल विवाहाचा मुहूर्तही रात्रीचा ठेवला जाऊ लागला. शहरात फिरणे बंद झाले. मुलीला नहाण येण्यापूर्वीच वरनिश्चिती केली जाऊ लागली. वांङ्निश्चय गुप्तपणे केला जाऊ लागला. विवाहापूर्वी वधुवरांनी एकमेकांचे तोंड पाहणे अयोग्य ठरवले गेले. बालविवाहाची प्रथा रूढ झाली. या सार्यांचा परिणाम स्त्रियांच्या शिक्षणावर झाला. वाढीच्या वयाच्या मुलींना रंगमंचावर सादर करायच्या कलाविष्कारांपासून वंचित ठेवले जाऊ लागले. हळूहळू नृत्य-नाट्य यासारख्या कला घरंदाज मुली, स्त्रियांसाठी निषिद्ध मानल्या जाऊ लागल्या. मात्र यापासून संगीत कला वाचली. याचे कारण संगीत घराच्या चार भिंतीत सुरू राहिले. सार्वजनिक सादरीकरणाचा धोका संगीताला नव्हता. संगीत कलेचा सार्वजनिक आविष्कार बंद झाला, पण घरगुती संगीत सभा, बैठका कार्यक्रमांमधून संगीत परंपरा सुरू राहिली.

नाडलेला समाज, प्रतिकूल परिस्थितीत जिवंत राहण्यासाठी पूर्व परंपरांमध्ये काळानुकूल, समाजानुकूल बदल करतो. त्याचेच उदाहरण म्हणजे राखीबंधन! श्रावण पौर्णिमेला साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे राखीबंधन! या राखीच्या रक्षण क्षमतेवर जोर देणारा एक श्लोक म्हणतो, ‘या राखीने म्हणजे ज्या रक्षासूत्राने महाबली राजा दानवेंद्रही बांधला गेला होता, ते रक्षासूत्र, ती राखी मी आपल्याला बांधत आहे. ही राखी तुमचे नेहमी रक्षण करेल. ती सतत बांधलेली राहू द्या.’ व्रतस्थ महाराणी बळीराजाच्या मनगटावर अभिमंत्रित राखी बांधत असे. त्यातून त्या काळच्या सामाजिक आवश्यकतेतून राखीबंधन उत्सव सुरू झाला. सुरुवातीला पत्नीने पतीला बांधलेले सदिच्छा बंधन असे त्याचे स्वरूप होते. काळाच्या ओघात सामाजिक गरजेतून ते नातेबंधक-बंधितअसे झाले. काळानुरूप त्यात भ्रातृत्वभाव आला. तिचे रक्षण करावे या भावनेने स्त्री ज्याला राखी बांधेल, तो तिचा रक्षक बंधू झाला. पतिपत्नीचा उत्सव भावाबहिणीचा झाला. मगसमाजबंधूंनी स्त्रियांचे संरक्षण करणेयावर भर देणारा हा उत्सव अधिक व्यापक सार्वत्रिक बनला. केवळ कुटुंबाची सुरक्षा हा हेतू राहता तो समाजाची सुरक्षा असा झाला. राखीबंधन हा कौटुंबिक असलेला सण, सार्वजनिक उत्सव झाला.

तरीही या सार्वजनिक संकोचाच्या काळातही स्त्रिया उपेक्षित झाल्या नाहीत असे म्हणता येईल. त्यांच्यावर मर्यादा नक्कीच आल्या, पण त्यांचे जीवन एकाकी, वैराण किंवा बंदिवानासारखे झाले नाही, याचे मुख्य कारण इथली एकत्र कुटुंबपद्धत. बाह्य आक्रमणांच्या काळातही एकत्र कुटुंबपद्धत हीच इथली पद्धत होती. इथल्या घरांची पद्धत, राहण्याची व्यवस्थाही हवेली, कोठी, वाडा, महाल, (निमहला) (सातमहला), (तखाड), (चौखंड) अशी होती. आत्ताच्या फ्लॅट किंवा छोट्या सदनिकांपेक्षा ती संपूर्णपणे वेगळी होती. जसे आता आपण छोट्या कुटुंबालान्युक्लियरकुटुंब म्हणतो, तसे त्या वाड्यांमधल्या संयुक्त कुटुंबाला खरे म्हणजेन्युक्लियर रिपब्लिकम्हणजे छोटे गणराज्य आपण म्हणू शकतो. अशा मोठ्या कुटुंबात 100-150 सदस्यही असत. बाहेर जाण्यायेण्याच्या स्वातंत्र्यावर बंधने आली होती तरी, सामाजिक व्यवहारांपासून स्त्रिया तुटल्या होत्या तरी त्या अशा मोठ्या एकत्र कुटुंबात निर्भयपणे सहजतेने राहू शकत होत्या. त्यामुळे प्रत्येक जात-बिरादरीचे जीवन त्यांच्या त्यांच्या रितीरिवाजांप्रमाणे चालत होते. त्यातूनच या काळात जातिव्यवस्था रूढ ताठर होत गेली. सामाजिक जीवन छोट्या चौकटीत, वर्तुळात बंदिस्त झाले. समाज रूढीग्रस्त झाला, पण तरीही हिंदू समाज टिकून राहिला, सुरक्षित राहिला.

वेदकाळात मात्र स्त्रीची जबाबदारी घरापुरती, कुटुंबापुरती मर्यादित नव्हती. ती गाव-शहरापर्यंत विस्तृत होती. त्यात यशस्वी होणार्‍या ‘कुटुंबिनी’ला पुरंध्री असे सार्थ नाव दिले गेले. आपला पती, पुत्र, पुत्री या स्वजनांच्या जोडीने जी आपल्या पुराची देखभाल करत असे, तिला पुरंध्री म्हटले जायचे. यजुर्वेदाच्या 22व्या अध्यायात 22वा मंत्र आहे. त्यात आलेल्या ‘पुरन्धिर्योषा’ शब्दाचा पं. सातवळेकरांनी सांगितलेला अर्थ, ‘सर्वगुणसंपन्न व नगराचे नेतृत्व करणारी स्त्री’ असा आहे. (यजुर्वेदावरील सुबोध भाष्य-2-पृष्ठ 386) यावरून वेदकाळात स्त्रीचे कार्यक्षेत्र केवळ घर नव्हे, तर गाव, नगर हेही होते हे सिद्ध होते.

 

धार्मिक जीवन सुरळीत राखण्यासाठी सर्वसामान्य माणसांना भक्तिमार्गाचा आधार घ्यावा लागला. काळाच्या मागणीनुसार बदललेल्या कौटुंबिक-सामाजिक रचनेमुळे या काळात प्रादेशिक बोलींचा, भाषांचा विकास झाला. प्रत्येक समूहाचे आपले आपले साहित्य विकसित झाले. त्या त्या भाषेतली भक्तिगीते, अभंग, कीर्तन यांची परंपरा सुरू झाली. त्या त्या समाजाच्या हवेल्यांमध्ये महिलांनाही संधी मिळू लागली. महिलांचा सहभाग वाढला. त्या परवशतेच्या काळातही हिंदू समाजात अनेक साध्वी, स्त्रीसंत उदयाला आल्या. भक्तिपंथातल्या साधुसंतांच्या पंक्तीत त्यांनी स्थान मिळवले. काश्मिरी संत लल्लेश्वरी, राजस्थानची सोढीनार्था, सहजोबाई, दयाबाई, फूलीबाई, मीराबाई, गुजरातची लीरलबाई, महाराष्ट्रच्या जनाबाई, मुक्ताबाई, भक्त कान्होपात्रा, बहिणाबाई, वेणा बाई, कर्नाटकची अक्का महादेवी या महान संत स्त्रिया वेदकाळातल्या ऋषिकांची आठवण करून देतात. राजकीय परवशतेच्या, पराधीनतेच्या या कालखंडातही भारतवर्षातील आध्यात्मिकतेने लोकांना दिशा दिग्दर्शन केले. राजनैतिक नष्टाधिकार (संदर्भ तपासावा) बजावण्यासाठी राणी अहिल्या, दुर्गावती यासारख्या वीरांगना रणांगणात उतरल्या, धारातीर्थी पडल्या.

याच काळात कालडी येथे जन्माला आलेल्या आदिशंकराचार्यांनी सिद्धान्त दर्शन स्तरावर स्त्रियांसंबंधीच्या वैदिक तत्त्वांचा धारणांचा पुनरुच्चार केला. ‘सौंदर्य लहरीया ग्रंथात ते म्हणतात, ‘जेव्हा शिव आणि शक्ती एकत्र असतात तेव्हाच ते प्रभावी असतात. शक्तीबरोबर संयोग झाल्याशिवाय शिव हलूही शकत नाही, तो प्रभावहीन आहे.’ बृहदारण्यकात सांगितलेल्याअर्धवृगल’ - एक बीज दोन दले या संकल्पनेचीच ही पुनरुक्ती त्यांनी मांडली. हे प्राचीन, वैदिक सनातन ज्ञान हेच या राष्ट्राचे हृदय स्पंदन, वैचारिक मर्म आहे. म्हणूनच यातून प्रेरणा घेऊन इतक्या संत-साध्वी अनुकूल प्रतिकूल काळातही राष्ट्रीय नभांगणात उदयाला आल्या, कीर्तिमान झाल्या.

7. पुनर्जागरण -

त्याआधीच्या पाश्चात्त्य आक्रमकांची - इसाई आक्रमकांची पद्धत कूट, जटिल होती. त्यासाठी मी मायावी पूतनेचे उदाहरण दिले. शेक्सपियरने म्हटले आहे, ‘जशि लरि ीाळश्रश रवि ीाळश्रश रवि ीाळश्रश ूशीं लश र्ींळश्रश्रळरि.’ कोणी व्यक्ती सतत मंदस्मित करते आहे, तरी ती खलनायकअसू शकते’. पाश्चात्त्य आक्रमकांची तीच स्थिती होती. त्यांनी हसत हसत, भारताला आत्मविस्मृतीत ढकलले. सारा देश जणू कठपुतळी झाला. पण त्यांची खेळी जास्त काळ चालू शकली नाही. भारतवर्ष आत्मग्लानीतून जागा झाला त्याने कूस बदलली, त्याला स्वसाक्षात्काराची जाग आली. 19व्या शतकाने ज्या वर्षी उन्मत्त मेकॉलेने आपल्या वडिलांना पत्र लिहून सांगितले, ‘आजपासून 30 वर्षांनंतर तुम्ही पाहा, भारताचे रूपरंग तेच राहिले तरी, आचार विचारांनी तो ब्रिटिश होऊन जाईल.’ त्याच वर्षी वंगभूमीमध्ये गदाधराने जन्म घेतला, जो पुढे भगवान रामकृष्ण परमहंस म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यांना तंत्रविद्या पारंगत बनवण्यासाठी अवतरली साक्षात अंबा भैरवी! ती कोण, कोणत्या जातीची, काय वयाची, कुठच्या गावची होती कोण जाणे, जणू साक्षात कालीमातेने पाठवल्यासारखी ती अवतरली आणि श्रीरामकृष्णांची गुरू झाली. त्या नैष्ठिक ब्रह्मचार्याच्या आध्यात्मिक प्रशिक्षणासाठी येऊन पोहोचलेली यज्ञकन्याच जणू. योगायोग असा की रामकृष्णांसाठी तपोधाम उभे करणारी राणी रशमानी ही ब्राह्मणेतर समाजातली होती. आधुनिक भारताच्या राष्ट्रीय पुनर्जागृतीच्या काळाला इथे सुरुवात होते. ते एका स्त्रीचे योगदान आहे. अभिमानाची आनंदाची गोष्ट ही की रामकृष्णांची सहधर्मचारिणी, पत्नी माता शारदादेवी ही त्याच मार्गाची प्रवासी झाली. ‘गोपालेर मासारख्या अन्य माता-भगिनीही या दिव्य साखळीतल्या कड्या झाल्या, परिवर्तन कार्यात जोडल्या गेल्या.

मध्यकाळाचे विवेचन इथे संपते. या दैवी घटनेचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे भगिनी निवेदिताचे भारतात येणे, हे शुभागमन. रीतभात, देश, धर्म या दृष्टीने ती नवागत होती. तरीही ती म्हणजे जणू जगद्धात्री अंबेला वाहिलेला नैवेद्य! सनातन धर्माच्या पुण्यप्रवाहातली ती मंगल पुण्यात्माच होती. इथल्या धर्मजीवनाशी लोकजीवनाशी ती इतकी समरस झाली की जेव्हा तिला संधी मिळाली, तेव्हा तिने वेदांनी कथन केलेलेअर्ध वृगलंसूत्र पकडून सांगितले - ‘जर या भूतलावर जेवढे पुरुष प्राणी आहेत, तेवढ्याच स्त्रिया आहेत असे मानले, तर पुरुषांना स्वविकासाचा जो अधिकार आहे, तोच स्त्रियांनाही आहे. अगदी पूर्णविकासाचा अधिकार आहे. पुरुषाचा लिंग उल्लेख करताना जो संकोच केला जातो, तसाच स्त्रियांबद्दल बोलतानाही असला पाहिजे. पुरुषालाआदर्शपुरुष घडवण्यासाठी जे परिश्रम घेतले जातात, तसेच आदर्श स्त्री घडवण्यासाठी घेतले गेले पाहिजेत. स्त्रियांचा विकास हा एक स्वतंत्र पवित्र उद्देश ध्येय आहे, असले पाहिजे. ते कधीही पुरुषांच्या विकासाचे उपांग मानले जाऊ नये, ते आनुषंगिक मानले जाऊ नये.’

सामाजिक पातळीवर याहूनही मोठे, भरीव व्यापक योगदान आर्य समाजाच्या महिलांचे होते. आर्य समाजाचे संस्थापक पूजनीय महर्षी दयानंदांनी स्त्रियांचे उपनयन, मौंजीबंधन पुन्हा सुरू केले आणि स्त्रियांनी यज्ञोपवित घालण्याचा, म्हणजेच त्यांच्या ज्ञानार्जनाचा वैदिक संस्कार पुनर्प्रस्थापित केला. परिणामत: पश्चिमोत्तर भारतात स्त्रियांच्या सहभागाने यज्ञ करण्याची पद्धत पुन्हा सुरू झाली. स्त्रिया यज्ञाच्या अध्वर्यू, उद्गाता ब्राह्मण, ब्रह्मवादिनी होऊ शकतात हे समाजावर ठसले. त्यांना वेदाधिकार पुन्हा प्राप्त झाला. आर्य समाजाच्या झेंड्याखाली धर्मप्रचारासाठी कित्येक स्त्रिया समुद्रलंघन करून मॉरिशस, फिजी या देशांपर्यंत गेल्या. या आधुनिक नव्या ब्रह्मवादिनी स्त्रियांनी देश-विदेशातल्या देशबांधवांमध्ये आर्यधर्म जिवंत ठेवण्याचे महान कार्य केले.

 

संक्षेपाने सांगायचे झाले, तर स्त्री-पुरुषांच्या उत्पत्तीसंबंधातली महान ऋषींची, द्रष्टह्मा विभूतींची जी संकल्पना होती, त्याच प्रकारे विशेषत: स्त्रियांची समाजात भूमिका होती. स्त्री आणि पुरुष सृष्टीचे समान घटक होते, दोनीही समान ध्रुव होते व आहेत. दोन्हींच्या संयोगाशिवाय सृष्टिकार्य असंभव होते व आहे. त्यांच्यात कोण उच्च, कोण नीच हा प्रश्न असयुक्तिक होता व आहे. तरीही दोघांमध्ये जो नैसर्गिक फरक आहे, त्याकडे आपल्या व्यावहारिक पूर्वजांनी डोळेझाक केली नव्हती. त्यालाही सृष्टीसाठी उपयोगी आवश्यक मानले होते. त्या नैसर्गिक फरकांबरोबर सृष्टिचक्र फिरत राहिले, त्यातून लिंगोचित व लिंगाधारित भाव-भावना व गुण विकसित झाले.

 

इंग्लिश शिक्षणापासूनही इथल्या मुली विन्मुख राहिल्या नाहीत. इंग्लिश साहित्यरचना करण्यातही त्या अग्रेसर होत्या. त्यात विशेष उल्लेखनीय नाव म्हणजे कवयित्री तोरू दत्त. ती स्वामी विवेकानंदांपेक्षा सात वर्षांनी मोठी. तिचे जीवन अवघे बावीस वर्षांचे. इतक्या तोकड्या आयुष्यातही तिने इंग्लिश फ्रेंच भाषांत कविता लिहिल्या. एकोणिसाव्या शतकात ‘Aलिळशिीं इरश्रश्ररवी रवि ङशसशविी षि कळर्विीीींरिया नावाने लंडनमध्ये तिचा कविता संग्रह प्रसिद्ध झाला. सावित्री, लक्ष्मण, श्रवण, एकलव्य, धुव्र, प्रल्हाद हे तिच्या कवितांचे विषय आहेत. त्या कोवळ्या वयातही तिची सनातन धर्माबद्दलची जाण अलौकिक दैवी आहे. एक उदाहरण देतो, ‘वडील हिरण्यकश्यपूची आज्ञा स्वत:चे ईश्वरला समर्पित केलेले जीवन यामध्ये वडिलांच्या कर्कश आग्रहामुळे जेव्हा द्वैत उत्पन्न झाले. प्रल्हाद अत्यंत समर्पक उत्तर देतो, ‘हे आदरणीय पिताश्री, तुम्हा दोघांच्या आज्ञांचे पालन करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, पण जर कधी मोठा धर्म छोटा धर्म यांमध्ये द्वंद्व निर्माण झाले, तर अशा वेळी छोटा धर्म सोडून दिला पाहिजे. तसे नाही केले तर भयंकर हानी होईल, चहूबाजूंनी सत्यानाश होईल.’

या ओळी वाचताना महर्षी व्यासांनी सांगितलेली राजा शिबीची गोष्ट आठवते. त्या कथेत देवेंद्र शिबी राजाला श्येन पक्षाच्या रूपाने हेच सत्य सांगतो. ‘महाराज, जास्त महत्त्वाचे काय आहे, काय गौण आहे हे पाहूनच धर्म-अधर्माचा निर्णय करावा लागेल.

कुमारी तोरू दत्तने ही जाज्वल्य परंपरा आपल्या कवितेतून मांडली आणि नंतर राज्याराज्यात, प्रांताप्रांतात अनेक कवयित्रींचा उदय झाला. त्यांच्या लिखाणाने त्यांनी भारतीय भाषांना संपन्न बनवले. अलंकारशास्त्र पारंगत विद्वान कविवर्य राजशेखराने म्हटले होते, ‘स्त्री किंवा पुरुष, कल्पनावैभवाच्या आधारे, प्रतिभेच्या जोरावर कवी होऊ कवी होऊ शकतात, मनातले दिव्यत्व हा त्याचा आधार आहे, लिंगभेद हा आधार असू शकत नाही!’ या महान राष्ट्रातल्या स्त्रियांनी ते सिद्ध करून दाखवले. प्राचीन काळात ज्या लेखकांनी लिंगभेदावर आधारित संस्कृत-प्राकृत हा भेद केला होता, त्यांना या प्रबुद्ध स्त्रीरत्नांनी आपल्या मौल्यवन लेखनकृतींनी मार्मिक, समर्पक उत्तर दिले.


पारतंत्र्यात असलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जी मोठी लढाई, जो संघर्ष झाला, त्यात अग्रेसर होत्या मादाम कामा! विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातवंदे मातरम्लिहिलेला भारताचा स्वतंत्र ध्वज क्रांतिकारिणी मादाम कामा यांनी जर्मनीत झालेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात फडकवला होता. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून भारतातल्या शेकडो स्त्रियांनी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली. त्यात ग्रामीण-शहरी, शिक्षित-अशिक्षित, मुली-स्त्रिया, क्रांतिकारी शांततेचा पुरस्कार करणार्या अशा अगणित स्त्रिया होत्या.

समाजसुधारणेच्या कामात अनेकींनी स्वत:चे कार्यक्षेत्र निवडले, विकसित केले, कालबाह्य रूढींवर प्रहार केले. त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कार्य केले. त्यांनी नव्या नव्या संस्था स्थापन केल्या, त्या चालवण्यात, मोठ्या करण्यात स्वत:चे कर्तृत्व निर्विवादपणे सिद्ध केले. श्रीमती सावित्रीबाई फुले श्रीमती कर्वे यांचा दाखला इथे देता येईल. वास्तविक पाहता रूढी-परंपरांचा सामना करणे कठीण असते. त्याचे रणांगण म्हणजे समाज! तिथे परिवर्तन घडवायचे तर ब्रह्मास्त्र आहेकुटुंब प्रबोधन’! त्याच्या यशस्वी प्रवक्त्या आहेत या महिला! या एका वेगळ्या प्रकारच्या संघर्षात आमच्या गृहिणी, माता-भगिनी जिंकल्या. बालविवाह, जरठविवाह, सतीमृत्यू यासारख्या कुप्रथा संपवण्यात त्यांची भूमिका आहे. पुनर्विवाह, विधवाविवाह, सागरलंघन अशा सुधारणा समाजमान्य झाल्या. इथे मात्र नि:संकोच मान्य करायला हवे की, हा संघर्ष आजही संपलेला नाही. सामाजिक सुधारणांचा संग्राम सुरुच आहे. याहून वेगळ्या कुप्रथा समाजात अस्तित्वात आहेत. प्रगल्भ विचारांनी त्यांचा सामना करणे त्या बदलून टाकणे सहज शक्य आहे. त्याचप्रमाणे नव्या पद्धती, आधुनिक रितींचा स्वीकार, नव्या पद्धती सुरू करणे हेही शक्य आहे.

स्वातंत्र्योत्तर भारतातले, वर्तमानातले भारतीय स्त्रियांचे चित्र अत्यंत आशादायक आहे. समानतेच्या विचाराने भारलेली नवी पिढी जन्माला आली आहे. जल-स्थळ-अंबर तिन्ही ठिकाणच्या कार्यकलापांमध्ये ते केवळ सहभागी नव्हे, तर अग्रेसर आहेत. विज्ञानाच्या आधाराने त्या रूढीग्रस्ततेतून त्या बाहेर पडल्या आहेत. आजच्या कार्यमग्न, यशस्वी स्त्रिया पाहिल्या की मनात ती प्रतीक्षा उदयाला येते, ती आकांक्षा पल्लवित होते की पुन्हा एकदा या महान देशात अष्टावधानी, शतावधानी विद्वान स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात विराजमान होतील याची!

8. अरुणोदय

एखादी गोष्ट, काम जुने आहे, प्राचीन आहे म्हणून बरोबर, चांगले आणि जे नवे, आधुनिक आहे ते वाईट किंवा चूक असे म्हणणे योग्य नाही. ज्ञानी, विद्वान लोक चिंतन-मनन करून निर्णय करतात, तर मूढजन्य दुसर्यांच्याहोला हो म्हणतात. हे महान तत्त्व सांगितले आहे महाकवी कालिदासाने. या रूढीवादावर उपाय सुचवणारी कविराज मैथिली शरण गुप्तांची एक कविता आहे (भारत भारती-3-38)

प्राचीन हों कि नवीन, छोडो रूढियाँ जो हों बुरी

बनकर विवेकी तुम दिखाओ हंस जैसी चातुरी

प्राचीन बातें ही भली है, यह विचार अलीक हैं

जैसी अवस्था हो जहाँ जैसी व्यवस्था ठीक है

या कवितेत कवी मैथिली शरण गुप्तनीर-क्षीरविवेकाने वागायचा संदेश देतात, तर याच मर्मावर बोट ठेवून स्वामी रंगनाथानंद म्हणतात, ‘हे विश्व परिवर्तनीय आहे, मूल्ये मात्र तत्व चिरंतन म्हणून अपरिवर्तनीय आहेत. अपरिवर्तनीय जीवनमूल्ये हा परिवर्तनीय जगाचा पाया आहे. तीच मूल्ये विश्वाचे कल्याण करणारी आहेत.

सुरुवातीपासून या देशाचा, समाजाचा दृष्टीकोन आणि व्यवहार असाच राहिलेला आहे हे दाखवून देताना दार्शनिक डॉ. राधाकृष्णन म्हणतात, ‘हिंदुत्व स्थितिशील नाही, तर गतिशील आहे, म्हणूनच सध्याच्या किंवा भविष्यातल्या प्रश्नांना भिडण्याचे सामर्थ्य त्यात आहे.’

त्यासाठी समाजाची तयारी असणे गरजेचे आहे. यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी एका सुभाषिताच्या ओळी सांगितल्या होत्या, त्याचा मथितार्थ असा : ‘वडिलांनी विहीर खोदली, त्याला खारे पाणी, लागले; पण विहीर वडिलांनी खोदली आहे म्हणून मी तेच खारे पाणी पिईन, असा हट्ट धरणारा मुलगा निंद्य आहे.’

भारतात स्त्री-पुरुषांचा विचार करताना, स्त्रियांबद्दलचा विमर्श करताना या सगळ्या पाथेय संचिताचा विचार विसरता कामा नये. पूर्वग्रहांमुळे हा विषय जटिल आहे, गुंतागुंतीचा आहे. समन्वयाचा मार्ग हेच त्यावरचे उत्तर आहे. समाजसुधारणेच्या अवघड मार्गावर समाजसुधारणेचा वसा घेऊन चालणारे, नेहमीच संख्येने कमी असतात आणि परंपरावादी बहुसंख्य असतात. परंतु हेही वैश्विक सत्य आहे की अंतत: सुधारणेचाच जय होईल.

प्रतिगामी, रूढीवादी, यथास्थितिवादी लोक नेहमीच म्हणतात की आचारांचे उल्लंघन आत्मघातक आहे. परंतु परिवर्तनीय समाजाचे आचारविचारही तसेच परिवर्तनीय असतात, हे समजून घेतले पाहिजे. तसेच मागच्या काळातले आचार-विचार नव्या काळाच्या कसोटीवर चुकीचे ठरू शकतात, अनाचार वाटू शकतात. अशा वेळी जुन्या आचार-विचारातल्या सुधारणा म्हणजे आचार उल्लंघन नव्हे, तर त्यांना आचारमार्जन म्हटले पाहिजे. इंग्लिश कवी टेनिसन म्हणतो, ‘जुन्या गोष्टी नवागताला जागा देऊन कडेला जाऊन बसतात, स्वत: दूर होतात. हेही परमेश्वराचे विधान आहे. नाहीतर तो जुना क्रम समाजालाही शिळेपणा देऊन प्रदूषित करेल.’ स्त्री विषयात तर हे सत्य म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मा. रंगा हरीजी यांच्याहमारे राष्ट्रीय जीवन मे नारी’ - ‘राष्ट्रजीवनात स्त्रीची भूमिकाया विषयावरील भाषणावर आधारित पुस्तिका पुणे येथील दृष्टी स्त्री अध्ययन व प्रबोधन केंद्राने प्रकाशित केली आहे. त्याचा नयना सहस्रबुद्धे यांनी केलेला हा मराठी अनुवाद.    

(चित्र : राजा रवी वर्मा - इंटरनेट सौजन्य

pasting