मलेशियातदेखीलझकीर नाईकची कृष्णकृत्ये

विवेक मराठी    11-Apr-2017
Total Views |

 आता मलेशियातील हिंदरफ (Hindraf) ह्या संस्थेने मलेशियन कोर्टात सार्वजनिक जनहित याचिका (Public interest litigation) दाखल केली आहे. हिंदरफ ही संस्था मलेशियामध्ये तेथील हिंदूंच्या हक्काकरिता आणि स्वास्थ्याकरिता काम करत असते. त्यांनी कोर्टाला विनंती केली आहे की झकीर नाईक देशाला विघातक अशी प्रवचने व व्याख्याने देऊन अशांतता निर्माण करीत आहे. म्हणून त्याला ह्या देशातून हद्दपार करावे.

गेल्या सहा महिन्यांपासून इस्लाम धर्मप्रचारक झकीर नाईक आणि त्याने स्थापन केलेल्या 'इस्लामिक रिसर्च फाउंडेशन'संबंधी बातम्या प्रसिध्द होत आहेत. झकीर नाईक गेली कित्येक वषर्े मुंबईच्या डोंगरी भागांत कार्यरत असून इस्लामशी संबंधित 'धार्मिक तत्त्वे' ह्या संस्थेतर्फे प्रसारित करीत आहे. त्याच्याजवळ अद्ययावत यंत्रणा असून जगातील इतर मुस्लीम संस्थांशी त्याचे संबंध आहेत. केवळ मुस्लीम धर्माचे श्रेष्ठत्व जगाला सांगत नसून त्याचबरोबर हिंदू धर्माविषयी घाणेरडी विधाने करून हिंदू धर्म किती हिणकस आहे हीदेखील शिकवण दिली जाते. त्यामुळे भारतात हिंदू-मुस्लीम यांच्यामधील दरी वाढत असून परस्परांविषयी द्वेषभावनादेखील पध्दतशीरपणे वाढविण्यात येत आहे. तसे करण्यात झकीर नाईकचा उद्देश असा की त्यामुळे हिंदू-मुसलमान दंगे होऊन मुसलमानांवर हिंदू लोक कसे अत्याचार करीत आहेत व त्यामुळे मुसलमान समाजाला असुरक्षित वाटते असा जगभर डांगोरा पिटण्याचा कार्यक्रम आहे.

हे सगळे उघडकीला आल्यावर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ह्या गुप्तचर संस्थेने बेकायदेशीर कृत्ये करणे, हिंदू-मुसलमानांमध्ये द्वेषभावना निर्माण करणे ह्यासंबंधी पोलिसांत तक्रार (F.I.R.) केली आहे. ह्या तक्रारीत असे म्हटले आहे की झकीर नाईक हा मुस्लीम तरुणांना हाताशी धरून त्यांना भारतात दंगेधोपे, घातपाती कृत्ये (Unlawful activities) घडविण्यासाठी चिथावणी देत असतो. त्याचबरोबर झकीर नाईकच्या मुंबईतील दहा ठिकाणांवर धाडी टाकून त्यातून मिळालेल्या माहितीचा एफआयआरमध्ये उल्लेख आहे. Islamic Research Foundation (आयआरएफ) ही संस्था गेली 5 वर्षे घातपाती कृत्यांशी संबंधित होती, असे भारताच्या गृहखात्याने जाहीर केले आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या उपस्थितीत हे सगळे निर्णय घेण्यात आले. झकीर नाईक ओसामा बिन लादेनचे समर्थन करून प्रत्येक मुसलमानाने दहशतवादी असले पाहिजे व इस्लामने मनांत आणले तर भारतातील 80 टक्के हिंदूंचे भवितव्य धोक्यात येईल असेही म्हटले आहे. ह्या कारणास्तव आयआरएफवर भारताने बंदी धातली आहे. ह्या आयआरएफने ऑक्टोबर 1995मध्ये दहशतवादी अबू अनस ह्याला 80 हजार रुपये शिष्यवृत्ती देऊ केली होती. हा अबू अनस हैदराबादमध्ये एका इंजीनिअरिंग कंपनीत कामाला होता. त्याला 2016मध्ये पोलिसांनी अटक केली. तेव्हा तो सीरियात इसिसमध्ये दाखल होण्याकरिता चालला होता.

हे फक्त भारतापुरते झाले. आता मलेशियातील हिंदरफ (Hindraf) ह्या संस्थेने मलेशियन कोर्टात सार्वजनिक जनहित याचिका (Public interest litigation) दाखल केली आहे. हिंदरफ ही संस्था मलेशियामध्ये तेथील हिंदूंच्या हक्काकरिता आणि स्वास्थ्याकरिता काम करत असते. त्यांनी कोर्टाला विनंती केली आहे की झकीर नाईक देशाला विघातक अशी प्रवचने व व्याख्याने देऊन अशांतता निर्माण करीत आहे. म्हणून त्याला ह्या देशातून हद्दपार करावे.

झकीर नाईकच्या वक्तव्यामुळे व प्रवचनांमुळे 'सुन्नी' पंथीय व देवबंद दारूल उलूम ही संस्थादेखील अस्वस्थ आहे. हिंदरफचे कायदेतज्ज्ञ कार्तिगेसन षण्मुगम ह्यांनी मलेशियाचे उपपंतप्रधान व गृहमंत्री अहमद झहीद बीन हमीदी ह्यांच्याकडील निवेदनात लिहिले आहे की झकीर नाईक ह्यांच्या भाषणामुळे व वक्तव्यामुळे मलेशियातील जनतेत असंतोष निर्माण झाला असून असुरक्षितता वाढत आहे, ह्याची सरकारने दखल घ्यावी. जगातील काही प्रमुख राष्ट्रांनी झकीर नाईकवर बंदी घातली असून त्याचे दहशतवादी संघटनेशी संबंध व पैशाची अफरातफर (Money laundering) संबधांत त्याच्यावर भारतात आरोप असून त्याच्यावर वॉरंट काढले आहे.

ह्या झकीर नाईकची 78 बँकांत खाती असून जवळजवळ 100 कोटी रुपयांचे गैरव्यवहार उघडकीस आले आहेत. 1967च्या बेकायदेशीर चळवळीसंबंधी कायद्यानुसार आयआरएफवर बंदी घालण्यात आली आहे. शिवाय केरळ व मुंबईमध्ये तेथील तरुणांनी इसिसमध्ये भाग घ्यावा म्हणून झकीर नाईक प्रयत्न करीत होता, ह्यासंबंधी चौकशी चालू आहे. फेब्रुवारी 2017च्या शुक्रवारी पेर्लिस इस्लामिक रिलिजिअस अफेअर्स, मलाया कस्टम्स काउन्सेलिंग आणि पेर्लिस मुफ्ती या संघटनांनी आयोजित केलेल्या समारंभात 'अराऊ' ह्या मशिदीत झकीर नाईकने प्रक्षोभक प्रवचन केले व त्यामुळे खळबळ माजली आहे. नाईकबद्दल विरोधी निवेदन केल्याबद्दल हिंदरफचे अध्यक्ष पी. वायथा मूर्ती ह्यांच्यावर पेर्लिसने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याबद्दल मूर्ती यांनी गृहमंत्र्यांकडे तक्रार करून झकीर नाईक हा एक धोकादायक इसम असून धार्मिक असहिष्णुता वाढवून देशाच्या सुरक्षेला धोका असून त्याच्यावर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर झकीर नाईकला मलेशियन सरकार येथे राहण्यास परवानगी का देत आहे, असेही विचारले आहे.

ह्यासंबंधात मूर्ती ह्यांनी मलेशियाचे पंतप्रधान अब्दुल रझाक, उपपंतप्रधान डॉ. हमीदी, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव रेक्स टिलरसन आणि मलेशियाचे पोलीस प्रमुख खलीद अबू बकर ह्यांना पत्रे लिहून झकीर नाईकच्या वक्तव्याची दखल घेऊन त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली आहे. ह्याबाबतीत दाखला देऊन त्यांनी सांगितले की इंग्लंडमध्ये ह्या झकीर नाईकला प्रवेश देण्यावर बंदी घातली होती. ह्या निर्णयावर कोर्टाने शिक्कामोर्तब केले. (Case No. CA/2010/2913.) निर्णय देताना कोर्टाने झकीर नाईकची कितीतरी वक्तव्ये उद्धृत करून सांगितले की अशा तऱ्हेची वक्तव्ये कोर्ट स्वीकारू शकत नाही. (Unacceptable Behaviour) त्यातील कितीतरी वक्तव्ये घातपाती कृत्याच्या समर्थनाबाबत (Terrorist related activity) होती. उदाहरणार्थ.

1) मी मुस्लिमांना नेहमीच दहशतवादी व्हा म्हणून सांगतो.  दहशतवादीचा अर्थ काय? ह्याचा अर्थ जो घातपात घडवून आणून दहशत निर्माण करतो.

2) पोलीस दृष्टीस पडल्यावर एखाद्या लुटारू त्याला घाबरतो. ह्याचा अर्थ लुटारूच्या दृष्टीकोनातून तो पोलीस दहशतवादी आहे. म्हणजेच प्रत्येक मुस्लीम हा लुटारूच्या दृष्टीकोनातून दहशतवादी असतो तसा.

मूर्तींनी मलेशियाच्या पोलीस प्रमुखाला पत्रात विचारले की मसूदच्या येथे राहण्याने मलेशियाला धोका आहे, हे तुम्ही लक्षात घेतले आहे का?

झकीर नाईकने घातपाताचे उघड उघड समर्थन केले आहे. 1 जुलै 2016 रोजी ढाक्यामध्ये जो बाँबस्फोट घडवून आणला गेला व ज्यांत 20 निष्पाप लोकांचे बळी गेले, त्यात हा घातपात घडवून आणणाऱ्यांनी जबानी दिली की आम्ही झकीर नाईकच्या प्रवचनातून हे करण्यास प्रवृत्त झालो.

मलेशियातील रॉयल पोलीस फोर्सने नाईकच्या वास्तव्याने येथे असुरक्षितता निर्माण झाली आहे ह्याचा विचार केला आहे का? मलेशियात 10 लाख बांगला देशी आणि इंडोनेशियन नागरिक काम करीत आहेत, त्यांच्यावर झकीर नाईकच्या भाषणांचा परिणाम होऊन जी परिस्थिती ओढवेल, त्याचा विचार करण्यात आला आहे का?

त्याचबरोबर येथील रॉयल पोलीस फोर्सने भारत, पाकिस्तान, बांगला देश, इंग्लंड येथील सुरक्षा अधिकाऱ्यांना झकीर नाईकच्या घातपाती कृत्ये व पैशांच्या अफरातफरीसंबंधीची माहिती कळविण्यास सांगितले आहे का? घातपाती कृत्ये करणाऱ्या संघटनांना मलेशियामध्ये येऊन तेथून ही कृत्ये घडविण्यासंबंधी झकीर नाईकची कल्पना आहे, त्याबद्दल रॉयल पोलीस फोर्सला काही माहिती आहे का? झकीर नाईक ह्याचा मलेशियात येण्याचा विचार होता, पण तो रद्द करून तो नेपाळमध्ये गेला व तेथून कारवाया चालू केल्या. भारतात येण्याचा विचार त्याने सोडून दिला आहे. त्याचा अर्थ तो दुसऱ्या देशातून सूत्रे हलविण्यासाठी विचार करीत असणार.

दुसरी एक नमूद करण्यासारखी बाब म्हणजे पेर्लिस ह्या संघटनेने आपल्या ऑनलाइन पोर्टलमध्ये वायथा मूर्ती ह्यासंबंधी अतिशय घाणेरडा प्रचार केला असून त्यांत त्याने मूर्ती हे देशद्रोही असे सुचवून मूर्ती मुस्लीम धर्मासंबंधी अपप्रचार करीत असून ते विघातक कृत्ये करीत आहेत असे पुढे लिहिले आहे. ज्याप्रमाणे पाकिस्तान, सौदी अरेबिया, इराण ह्या देशांत गैरमुस्लीम प्रजेवर बंधने आहेत, त्याप्रमाणे मलेशियाच्या सरकारने गैरमुस्लिमांवर बंधने टाकण्याचा विचार करावा असे लिहिले आहे.

ह्या सगळया प्रकारांमुळे व झकीर नाईकच्या वक्तव्यांमुळे मलेशियातील मुस्लीम लोकांची मने कलुषित होऊन तेदेखील घातपाती कृत्ये करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उदाहरणार्थ, जे लोक डुकरांचे मास (पोर्क किंवा बेकन) खातात, त्या संबंधात त्याने लिहिले की डुक्कर हा बेशरम प्राणी आहे. आपल्याबरोबर असलेल्या डुकरिणीबरोबर संबंध ठेवण्याकरिता तो आपल्या मित्रांना निमंत्रित करतो. पार्टी झाल्यानंतर ते आपापसांत देवाण-घेवाण (Swapping of wives) करून लैंगिक सुख उपभोगतात. तुम्ही जर डुकरांचे मास खाल्ले, तर तुम्हीदेखील डुकरांसारखे वागाल (हे उद्गार इंग्लंडमधील कोर्टानेदेखील (Western mail August 2016) ह्या मासिकांतील मजकूर उद्धृत करून निकालपत्रकात उल्लेख केला आहे.

हिंदू लोकसुध्दा क्वचित डुकरांचे मास खातात, पण त्याचबरोबर हे लक्षात ठेवले पाहिजे की, ख्रिश्चन, बुध्द आणि इतर धर्मीयांवर हा भावनिक आघात आहे. झकीर नाईकच्या वक्तव्यांचा परिणाम इतर देशांतील गैरमुस्लिमांमध्ये घबराट निर्माण करणारा आहे. मलेशियन सरकारने ह्यासंबंधी देशातील सर्व धर्मांच्या प्रमुखांना विनंती करून अशा तऱ्हेची घातक वक्तव्ये करू नयेत असा सल्ला दिला आहे.

भारतातील Enforcement Directorateने झकीर नाईकचा आर्थिक सल्लागार अमीर गझदर याला अटक करून झकीरने आपल्या पैशाचा ओघ पाकिस्तान व दाऊदकडे वळविल्याचा शोध घेतला आहे. कराचीतील कांही श्रीमंत व्यापाऱ्यांनी झकीरच्या आयआरएफला पैसे दिले असल्याचे आढळून आले आहे. हे सगळयात मोठे हवाला प्रकरण असल्याचे समजते. साहजिकच झकीर नाईक भारतात परत येण्याचा कधीच विचार करणार नाही.

022-28728226