सात-आठ वर्षांपूर्वी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचे दुष्परिणाम हळूहळू समोर येत होते. मोठया मोठया गणेशमूर्तींना ऑईल पेंट लावलेले असल्याने त्यांना विसर्जनात जलाशयात टाकल्यानंतर त्या विरघळत नसल्याने व रासायनिक ऑईल पेंट पाण्यात विरघळत नसल्याने या मूर्ती तशाच भग्नावस्थेत पडून राहणे, रासायनिक तवंग पाण्यावर दिसणे अशा गोष्टी सररास अनुभवाला येत होत्या. गणेशोत्सव संपल्यानंतर अनेक महिन्यांनी जलाशयातील गाळ काढला, तर भंगलेल्या मूर्तींचे अवशेष दिसणे म्हणजे भाविकांच्या श्रध्देचा एक प्रकारे अवमानच होता. ही विटंबना, पर्यावरणाचा ऱ्हास, पाण्याचे प्रदूषण, जलाशयातील पाण्याच्या झऱ्याच्या तोंडाशी हा रासायनिक गाळ बसला तर पाणी येथे बंद होणे अशा समस्या निर्माण होत होत्या. या सगळया समस्यांवर उपाय काय करावा अशी चर्चा सुरू होती. पर्यावरणस्नेही (इकोफ्रेंडली) गणेशमूर्तींची कल्पना पुढे आली. शाडू मातीचे गणपती हा यावर उपाय होऊ शकतो, असे पुढे आले.
आपला समाज वरचेवर अधिक प्रगल्भ आण्ाि पर्यावरणाचे महत्त्व जाणून त्या दिशेने आपल्या जीवनरचना आखत आहे. पर्यावरणाच्या नावाखाली भारतीय सण आण्ाि उत्सव साजरे करण्याला विरोध किंवा विरस करण्यापेक्षा या उत्सवांनाच पर्यावरणपूरक आण्ाि अधिक अर्र्थपूण कसे करता येऊ शकते, याचे उदाहरण म्हणजे पर्यावरणस्नेही गणेशमूर्तींची वाढत चाललेली चळवळ होय. शाडू मातीचे गणपती - तेही स्वत: तयार करून घरात त्यांची प्रतिष्ठापना करणे ही आता आनंदाची एक चळवळ बनते आहे. औरंगाबादमध्ये या मूर्तीच्या प्रश्ािक्षणाच्या बातम्यांनीच आता सर्वांना गणेशोत्सवाची चाहूल लागते आहे.
सात-आठ वर्षांपूर्वी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचे दुष्परिणाम हळूहळू समोर येत होते. मोठया मोठया गणेशमूर्तींना रासायनिक ऑईल पेंट लावलेले असल्याने त्यांचे जलाशयात विसर्जन केल्यानंतर त्या विरघळत नसल्याने या मूर्ती तशाच भग्नावस्थेत पडून राहणे, रासायनिक तवंग पाण्यावर दिसणे अशा गोष्टी सररास अनुभवाला येत होत्या. गणेशोत्सव संपल्यानंतर अनेक महिन्यांनी जलाशयातील गाळ काढला, तर भंगलेल्या मूर्तींचे अवशेष दिसणे हा भाविकांच्या श्रध्देचा एक प्रकारे अवमानच होता. ही विटंबना, पर्यावरणाचा ऱ्हास, पाण्याचे प्रदूषण, जलाशयातील पाण्याच्या झऱ्याच्या तोंडाशी हा रासायनिक गाळ बसला तर पाणी येथे बंद होणे अशा समस्या निर्माण होत होत्या. या सगळया समस्यांवर उपाय काय करावा अशी चर्चा सुरू होती. पर्यावरणस्नेही (इकोफ्रेंडली) गणेशमूर्तींची कल्पना पुढे आली. शाडू मातीचे गणपती हा यावर उपाय होऊ शकतो, असे पुढे आले. मात्र प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती न बसवता आपण स्वत: बनविलेले शाडू मातीचे गणपती तयार करून बसवावेत, अशी एक कल्पना पुढे आली. गणेश प्रतिष्ठापनेला आपल्या स्वनिर्मितीच्या आनंदाचा एक आयाम जोडला गेला.
ही चांगली कल्पना शहरांमध्ये आधी पर्यावरणप्रेमींनी छोटया प्रमाणात स्वीकारली. मात्र याचा प्रचार मोठया प्रमाणात झाला पाहिजे, त्यासाठी अशा गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रश्ािक्षण मोठया प्रमाणात दिले गेले पाहिजे, असे वाटू लागले होते. औरंगाबादमध्ये यशवंत कला महाविद्यालयाने मोठया हिरिरीने, अगदी आपली जबाबदारी समजून हे काम केले आहे.
याविषयी माहिती देताना या महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र तोरवणे म्हणाले की, ''सात वर्षांपूर्वी आमच्या महाविद्यालयाने या उपक्रमाला सुरुवात केली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आधी प्रश्ािक्षण दिले. श्ािल्पकलेची माती आणून त्यापासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रश्ािक्षण देण्यात आले. समाजातील सर्वांना हे प्रश्ािक्षण द्यावयाचे आहे, याची कल्पना विद्यार्थ्यांना देण्यात आली. प्रश्ािक्षण कसे द्यायचे, सामाजिक संपर्क कसा करायचा, काय सांगायचे, कोणते प्रश्न आण्ाि शंका विचारल्या जाऊ शकतात असे सर्व सांगून या विद्यार्थ्यांची तयारी करण्यात आली. नंतर जेथे आमंत्रण येईल, तेथे समूहांना र्मार्गदशन करत प्रश्ािक्षण देण्याला सुरुवात झाली. हे प्रश्ािक्षण विनामूल्य देणे सुरू झाले.''
आता गेल्या सात वर्षांत समाजात ही गोष्ट चांगलीच पसरली आहे. समाजाने ती स्वीकारली आहे. आता अनेक गणेश मंडळे, व्यक्ती, शाळा या महाविद्यालयाशी संपर्क साधतात. मोठया संख्येने ते लोकांना, मुलांना एकत्रित करून पर्यावरणस्नेही गणेशमूर्तीचे प्रश्ािक्षण आयोजित करतात. तेथे प्रश्ािक्षणासाठी या महाविद्यालयाचे विद्यार्थी जातात. अशा प्रश्ािक्षणात व नंतरही गणेशमूर्ती बनविण्यासाठी लागणारी मातीही पुरविण्याचे सहकार्य हे महाविद्यालय करते. आता ही एक मोठी चळवळ झाली आहे.
गेल्या वर्षी ही शाडूची माती मोठया प्रमाणावर विकत आणून गणेश मंडळांना, प्रश्ािक्षणर् वगात दिली. त्यातून दहा हजार रुपये जमा झाले होते. ते महाविद्यालयाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून शासनाकडे दिले आहेत.
श्ािल्पकलेची माती घेऊन सुंदर गणेशमूर्ती कशा करायच्या, याची एक पध्दत त्यांनी तयार केली आहे. या गणेशमूर्तीला वॉटर कलर, पोस्टर कलर कसे द्यायचे हेही सांग्ाितले जाते. ''गणेशमूर्ती अशी एक गोष्ट आहे की ती कशीही केली तरी सुंदरच दिसते'' असे या महाविद्यालयातील एका प्रश्ािक्षकाने म्हटले. ''गणेशमूर्ती तयार करण्याचे समाजाला प्रश्ािक्षण देणे हे एक सामाजिक कार्य आहे अशा बांधिलकीने आम्ही हे काम करतो. कला आपल्यापुरती न ठेवता समाजात तिचा उपयोग झाला पाहिजे या भावनेने हे प्रश्ािक्षण देणे ही एक चळवळ बनली आहे. समाजाची सर्जनशीलता आण्ाि आपल्या निर्मितीचा आनंद समाजाला मिळतो. मूर्ती बनविणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे कलासक्त मन यामुळे जागे होते. उगाच एक गणेशमूर्ती न बसवता ती आपण बनविलेली मूर्ती आहे, हे त्या मूर्तीशी त्या व्यक्तीचे एक भावनिक नाते तयार होते'' असे प्राचार्य तोरवणे सांगतात. या महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक हे सर्व जण गणपतीच्या काळात झपाटल्यासारखे या पर्यावरणस्नेही मूर्तींचे प्रश्ािक्षण देण्यासाठी काम करत असतात.
या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रभू इंगळे यांनीही मौर्य फाउंडेशन या त्यांच्या संस्थेतर्फे मोठया प्रमाणात ही चळवळ सुरू केली आहे. गारखेडा येथे एका हॉलमध्ये रोज सातत्याने गणेशमूर्तींचे प्रश्ािक्षण देण्यात येत आहे. याश्ािवाय बहुभाषिक ब्राह्मण संघ, राजा रविवर्मा महाविद्यालय अशा अनेक संस्था, निगडित व्यक्ती यांनी या गणेशमूर्तींच्या प्रश्ािक्षणाचा विषय समाजात सर्वदूर पोहोचविण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. माध्यम प्रायोजक म्हणून दै. दिव्य मराठीने या उपक्रमाला जोरदार प्रसिध्दी दिली आहे, असे प्राचार्य तोरवणे म्हणतात.
या सगळया चळवळीत दीपश्ािखा फाउंडेशनने मोठा सहभाग दिला आहे. दीपश्ािखा फाउंडेशनने अनेक ठिकाणी गणेशमूर्ती प्रश्ािक्षणाच्या कार्यशाळा घेण्याचा उपक्रम केला आहे. गेल्या वर्षी 1 सप्टेबरला औरंगाबादच्या प्रोझोन मॉलमध्ये या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यशाळेला तब्बल 2883 नागरिक उपस्थित होते. इतक्या मोठया संख्येने एकाच वेळी गणेशमूर्ती तयार करण्याचा हा विक्रम लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदला गेला आहे. गेल्यार् वषी वीस हजार शाडूच्या गणेशमूर्ती आमच्या प्रयत्नातून तयार झाल्या होत्या. ''वर्ल्ड रेकॉर्डमुळे उत्साह वाढल्याने या वर्षी आम्ही चाळीस हजाराचे उद्दिष्ट ठेवले आहे'' असे दीपश्ािखाच्या मनीषा चौधरी यांनी सांग्ाितले. 9423778202