चक दे इंडिया

विवेक मराठी    19-Jul-2016   
Total Views |

अनेक वर्षांपासून चीनने ऑलिम्पिकमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. भारतातील ऑलिम्पिकचा प्रवास म्हणावा तेवढा समाधानकारक नव्हता. हॉकी हा खेळ सोडल्यास भारताला इतर खेळांत म्हणावे तेवढे यश कधीच मिळाले नाही. वैयक्तिक खेळात एक किंवा दोन पदकांवर समाधान मानावे लागले होते. एकल, दुहेरी व सांघिक अशा विभागांमध्ये भारतीय खेळाडूंना आपला ठसा उमटवायचा आहे. भारतीय खेळाडूंकडून अपेक्षा वाढल्या आहेत, कारण या वर्षी काही नवोदित खेळाडूंची कामगिरी लक्षणीय असणार आहे. या लेखामध्ये आपण भारताचा ऑलिम्पिक खेळात असलेला सहभाग आणि त्यात सहभागी होत असलेले खेळाडू यांचा आढावा घेणार आहोत.

गेल्या दोन आठवडयांमध्ये आपण ऑलिम्पिकच्या इतिहासाचा आणि रिओ ऑलिम्पिक 2016चा आढावा घेतला होता. ऑलिम्पिक सोहळयाची जय्यत तयारी ब्राझीलमध्ये सुरूच आहे. 21 जुलैपर्यंत सगळेच खेळाडू ब्राझीलमध्ये दाखल झाले असतील. ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या देशाने उत्तम कामगिरी करावी या जिद्दीने प्रत्येक खेळाडू स्पर्धेत उतरेल. ही जिद्द का नसावी? एवढया मोठया आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळाडूला आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते ही अभिमानाची गोष्ट आहे. या वर्षी ऑलिम्पिकमध्ये 10,500 खेळाडू  सहभागी होणार आहेत. दक्षिण सुदान आणि कोसोवो हे दोन देश यंदाच्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये पर्दापण करत आहेत.

अनेक वर्षांपासून चीनने ऑलिम्पिकमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. भारताचा ऑलिम्पिकचा प्रवास म्हणावा तेवढा समाधानकारक नव्हता. हॉकी हा खेळ सोडल्यास भारताला इतर खेळांत म्हणावे तेवढे यश कधीच मिळाले नाही. वैयक्तिक खेळात एक किंवा दोन पदकांवर समाधान मानावे लागले होते. भारतासारख्या सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशातून या स्पर्धेला जाणाऱ्यांची संख्या कमी असते. आणि त्यातही एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी कमी पदके घेऊन भारतीय खेळाडू परततात ही गोष्ट नक्कीच भूषणावह नाही. जे पदक मिळवतात त्या खेळाडूंविषयी अभिमान आहेच, पण एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात क्रिकेट वगळता इतर खेळांना कधी महत्त्व दिले जाणार, हा प्रश्न आहे. या परिस्थितीत हळूहळू का होईना, सुधारणा होते आहे ही दिलासादायक बाब आहे. 2008 साली झालेल्या बीजिंग ऑलिम्पिकच्या तुलनेत या आठ वर्षांत भारताच्या कामगिरीचा आलेख चढता राहिला आहे. या वर्षी 56 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. अनुभवी खेळाडूंसोबतच आणि काही नवीन खेळाडू असे समीकरण असणार आहे.

या वर्षी ऑलिम्पिकचे सदिच्छादूत (goodwill ambassador) म्हणून अभिनेता सलमान खान, सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा, गायक ए.आर. रहमान आणि सचिन तेंडुलकर यांची निवड करण्यात आली आहे. 

एकल, दुहेरी व सांघिक अशा विभागांमध्ये भारतीय खेळाडूंना आपला ठसा उमटवायचा आहे. भारतीय खेळाडूंकडून अपेक्षा वाढल्या आहेत, कारण या वर्षी काही नवोदित खेळाडूंची कामगिरी लक्षणीय असणार आहे. या लेखामध्ये आपण भारताचा ऑलिम्पिक खेळात असलेला सहभाग आणि त्यात सहभागी होत असलेले खेळाडू याचा आढावा घेणार आहोत.


तिरंदाजी -
पहिल्यांदाच या वर्षी भारताकडून चार तिरंदाज ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत. पुरुष गटात अतनू दास (Atanu Das) भारतीय तिरंदाजीच्या यादीत सध्या अव्वल क्रमांकावर आहे. त्यामुळेच ऑलिम्पिकमध्ये त्याची वर्णी लागली आहे. तर मंगल चम्पिया (Mangal Champia) हा तिरंदाजीच्या विश्वचषकात चार वेळा सुवर्णपदक मिळवलेला खेळाडू या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये आपली चमक दाखवणार, यात काही शंका नाही. महिला गटात भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी हिच्याकडून भारतीयांच्या अपेक्षा आहेत, तर लक्ष्मीराणी माझी (Laxmirani Majhi) आणि बोम्बायला देवी (Bombayla Devi) यांच्या जोडगोळीचाही समावेश असणार आहे. भारतीय तिरंदाजी संघाचे प्रशिक्षक धमर्ेंद्र तिवारी यांच्या मते या वर्षीच्या संघामध्ये अनुभवी आणि नवोदित अशा दोघांचा समावेश असल्यामुळे एक परिपूर्ण संघ ऑलिम्पिकमध्ये जात आहे.

ऍथलेटिक्स - 2016च्या ऑलिम्पिक स्पर्धेत 19 ऍथलीट्सचा समावेश असणार आहे. यामध्ये महिला आणि पुरुष असे कॉम्बिनेशन असणार आहे. पुरुषांमध्ये इंद्रजीत सिंग (गोळाफेक), विकास गौडा (थाळीफेक),गुरमीत सिंग, बलजिंदर सिंग आणि इरफान कोलोथॉम थोडी (20 किलोमीटर चालणे) संदीप कुमार, मनीष सिंग रावत (50 कि.मी. चालणे), नितेंद्र सिंह रावत, थोनाकल गोपी आणि खेता राम (मॅरेथॉन) मोहमद अनस (400 मीटर धावणे), अंकित शर्मा (उंच उडी) आहेत.

महिलांमध्ये सीमा अंटील (थाळीफेक), मनप्रीत कौर (गोळाफेक), ललिता बाबर (3000 मी. स्टिपलचेस), टिंटू लुका व कविता राऊत (धावणे), सुधा सिंग, ओ.पी. जिशा (मॅरेथॉन), खुशबीर कौर व सपना पुनिया (20 कि.मी. चालणे), दौती चंद (महिला 100 मीटर धावणे), श्राबनी नंदा (100 मी., 200 मी. धावणे, 4#100 मी. रिले) या खेळाडूंचा समावेश आहे. 

रंजीत महेश्वरीने तिहेरी उडीत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करून ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला आहे. तिहेरी उडी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारा रंजीत हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. अर्पिदर सिंग याचाही लांब उडी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याचप्रमाणे धावपटू धरमबीर सिंग (200 मीटर) तर जिन्सन जॉन्सन (800 मीटर) धावण्याच्या शर्यतीत भाग घेणार आहे.


सपना पुनिया, कविता राऊत, ललिता बाबर व नितेंद्र सिंह रावत या खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा आहे.

बॅडमिंटन - भारताची 'फूलराणी' आणि स्टार प्लेयर सायना नेहवाल हिला 2012 साली बीजिंग ऑलिम्पिकमध्ये  कांस्यपदक मिळाले होते. त्यानंतरची तिची कामगिरी खऱ्या अर्थाने स्तुत्य आहे. खरे पाहिले तर सायनाबद्दल कितीही लिहिले, तरी तिची कामगिरी शब्दांत मांडता येणे अशक्य आहे. सायनासोबतच रायझिंग स्टार म्हणून ओळख असलेली पी.व्ही. सिंधू हिचादेखील संघामध्ये समावेश आहे. ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोन्नप्पा यांच्या जोडगोळीचा करिश्मा या ऑलिम्पिमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. तर पुरुष गटामध्ये किदंबी श्रीकांत, मनू अत्री रेड्डी यांना ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले आहे.

मुष्टियुध्द (बॉक्सिंग) - खरे तर मोहम्मद अली यांच्यानंतर मेरी कोम आणि विजेंदर सिंग यांच्यामुळे भारतीयांना बॉक्सिंग माहीत झाले. पण त्यानंतर या खेळाची आवड वाढत गेली. 2012 साली बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सात पुरुष आणि एक महिला असा संघ भारताकडून दाखल झाला होता. चार वर्षे लोटली, आता 2016च्या ऑलिम्पिकमध्ये भारताकडून तीन नवीन बॉक्सर रिंगणात उतरणार आहेत. शिवा थापा (56 किलो), मनोज कुमार (64 किलो) विकास कृष्णन (75 किलो).

पण भारतीयांसाठी एक दुःखद बातमी अशी की रिओ ऑलिम्पिकच्या बाद फेरीत मेरी कोमची निवड झाली नाही. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये मेरीला कांस्यपदक मिळाले होते. या वर्षीच्या ऑलिम्पिकला ती मुकणार आहे. यामुळे या वर्षी भारताकडून एकही महिला मुष्टियोध्दा सहभागी होणार नाही.

ज्यूदो - 2013-14चा आणि 2014 -2015चा आशियाई सुवर्णपदक विजेता अवतार सिंग याची ऑलिम्पिकमध्ये वर्णी लागली आहे. 90 किलो वजनी गटात त्याची निवड झाली आहे. ज्यूदोच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीमध्ये तो 79व्या क्रमांकावर आहे.


नेमबाजी - बारा खेळाडूंचा दमदार संघ रिओसाठी सज्ज आहे. 2012 बीजिंग ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा (10 मीटर एअर रायफल), राष्ट्रकुल आणि आशियाई खेळात सुवर्णपदक पटकवणारा जितू राय (50 मीटर एअर पिस्तूल), गगन नारंग (10 मीटर एअर रायफल), गुरप्रीत सिंग (26 मीटर रॅपिड फायर पिस्तूल), प्रकाश नानजंप्पा (50 मीटर पिस्तूल), चेन सिंग (50 मीटर रायफल), मिराज अहमद (शॉटगन), मानवजीत सिंग संधू, क्यान चैनई (टॅ्रप शूटिंग), हीना सिंधू (10 मीटर एअर पिस्तूल), अवोनिका पॉल, अपूर्वी चंडेला (10 मीटर एअर रायफल) या वर्षी ऑलिम्पिकसाठी जाणार आहेत. या वर्षीच्या नेमबाजांकडून अधिकाधिक पदके मिळण्याची आशा आहे.

टेबल टेनिस - मौमा दास आणि मानिका बत्रा या महिला गटात, तर पुरुष गटामध्ये सौम्याजीत घोष आणि अचंता शरथ कमल यांची निवड करण्यात आली आहे.

 टेनिस - लिएंडर पेस खेळणार की नाही? त्याचे ऑलिम्पिक स्वप्न भंग होईल का? अशा बऱ्याच शंकाकुशंकांनंतर शेवटी इंडियन टेनिस असोसिएशनने यावर पडदा पाडला. त्यांच्या हस्तक्षेपानंतर लिएंडर पेसला ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले. महेश बोपन्ना आणि लिएंडर पेस या वर्षी पुरुष दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्याचबरोबर महिला दुहेरीत टेनिस स्टार सानिया मिर्झाला महाराष्ट्रातील बार्शीच्या प्रार्थना ठोंबरेची साथ मिळणार आहे. मिश्र दुहेरीत सानिया आणि महेश बोपन्ना खेळणार आहेत.

वेटलिफ्टिंग - आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये उझबेकिस्तानमध्ये झालेल्या स्पर्धा, त्याचप्रमाणे पतियाळा येथील बाद फेरीत भारतीय वेटलिफ्टिंगच्या खेळाडूंनी नैपुण्य दाखवले. त्यांच्या कामगिरीच्या बळावरच वेटलिफ्टिंगसाठी पुरुषांमध्ये शिवालिंगम सतीश कुमार (77 किलो) आणि महिलांमध्ये 2014 साली राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती साइखोम मीराबाई (Saikhom Mirabai) (48 किलो) हिची निवड झाली आहे. हे दोघेही उत्तम खेळाडू आहेत. त्यामुळे यांच्याकडून पदकांची अपेक्षा आहे.

कुस्ती - गेल्या काही महिन्यांपासून भारतात चचर्ेचा विषय ठरलेला खेळ आणि त्याचे खेळाडू. या वर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धेत नरेंद्रसिंग किंवा सुशीलकुमार यांच्यापैकी कोण भारताचे प्रतिनिधित्व करणार, याविषयी वाद होता. सुशीलकुमार हा एकमेव असा भारतीय खेळाडू आहे, ज्याने कुस्तीच्या वेगवेगळया प्रकारांमध्ये 2012 सालच्या ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळवली होती. पण नरेंद्रसिंगच्या गेल्या दोन वर्षांतील कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय कुस्ती समितीने त्याची निवड  केली. त्यामुळे या वर्षी ऑलिम्पिकसाठी नरसिंग यादव (74 किलो), योगेश्वर दत्त (65 किलो फ्री स्टाईल), हरदीप सिंग (96 किलो ग्रीको-रोमन शैली), संदीप तोमर (57 किलो), रवींद्र खत्री (85 किलो) आणि महिलांमध्ये बबिता कुमारी (53 किलो), विनिश फोगट (48 किलो) व साक्षी मलिक (58 किलो) असा संघ पाठविण्यात येणार आहे.

चक दे इंडिया

2016च्या ऑलिम्पिकमध्ये सगळयात जास्त अपेक्षा आहेत त्या हॉकीच्या संघाकडूनच. 2008 सालीच्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या रौप्यपदकापासून ते आजपर्यंत पुरुष भारतीय हॉकी संघाचा यशाचा आलेख उंचावत गेला आहे. ब्राझिलमध्ये आपला उत्तम खेळ दाखवण्यासाठी गोलरक्षक पी.आर. श्रीजेश याच्या नेतृत्वाखाली पुरुषांचा संघ सज्ज आहे. 36 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय महिला संघ ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणार आहे. सुशीला चानूच्या नेतृत्वाखाली खेळणारा पहिलाच महिला संघ ऑलिम्पिकमध्ये जाणार आहे. या वर्षी या संघाकडून पदकाच्या अपेक्षापेक्षा त्याच्या कामगिरीकडे जास्त लक्ष आहे.

खरे तर या वर्षीच्या ऑलिम्पिकमधील सर्वच भारतीय खेळाडूंकडून अपेक्षा बऱ्याच वाढल्या आहेत. जाणत्या चेहऱ्यांसोबतच नवोदित चेहऱ्यांना आपली चमक दाखवण्याची संधी आहे. 2012च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या तुलनेत या वर्षी भारताला अधिक पदके मिळविण्याची संधी आहे.

जिम्नॅस्टिक - पहिल्यांदाच या खेळप्रकारात भारतीय खेळाडूची निवड झाली आहे. मुंबईच्या मुलीला हा मान मिळाला आहे. दीपा कर्माकर - पहिली भारतीगोल्फ ऑन ऑलिम्पिक लॉन

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर तब्बल 112 वर्षांनी ऑलिम्पिक खेळांमध्ये गोल्फला स्थान मिळाले. रिओ ऑलिम्पिकमध्ये गोल्फसाठी पुरुषांमध्ये अनिर्बान लाहिरी आणि एसएसपी चौरसिया, तर महिलांमध्ये अदिती अशोक भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. अनिर्बान लाहिरी आणि शिव चौरसिया यांनी रिओ ऑलिम्पिकचे तिकीट मिळवून नवा इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय गोल्फ क्रमवारीतील या तिघांच्या स्थानाच्या जोरावर त्यांना ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळाला.य महिला जिम्नॅस्ट म्हणून तिची निवड झाली आहे. दीपाची खासियत म्हणजे आर्टिस्टिक जिम्नॅस्ट म्हणून तिची निवड आहे. व्हॉल्ट या प्रकारात जगातील केवळ पाच खेळाडूंनी यात नैपुण्य मिळवले आहे. या पाच खेळाडूंमध्ये दीपाचा समावेश आहे. पहिल्यांदा फ्रंट हँडस्प्रिंग दोन समरसॉल्ट्स या अवघड प्रकारात रशियाची जिम्नॅस्ट येलीना प्रोडोनोव्हानंतर भारताच्या दीपाचा क्रमांक येतो. व्हॉल्ट हे जिम्नॅस्टिक्स खेळातील एव्हरेस्ट शिखर आहे. फ्लो, बॅलन्स बीम व अनइव्हन बार या जिम्नॅस्टिक्स प्रकारांत ती तरबेज आहे. 2011 साली तिने राष्ट्रीय खेळात त्रिपुरा राज्याचे प्रतिनिधित्व करून सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर 2014 साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांमध्ये (कॉमनवेल्थ गेममध्ये) तिला कांस्यपदक मिळाले होते. रिओमध्ये जात असतानाच दीपाच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा रोवला गेला, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स संघटनेकडून दीपाला वर्ल्ड क्लास जिम्नॅस्टचा दर्जा मिळाला आहे. भारताकडून पहिली महिला जिम्नॅस्ट म्हणून ती या ऑलिम्पिकमध्ये स्वत:चा ठसा नक्की उमटवेल, अशी अपेक्षा आहे.

 नौकानयन (Rowing) - दत्ता भोकनल हा महाराष्ट्रातील मराठवाडयातील एक खेळाडू. जो भाग सतत दुष्काळाने ग्रस्त आहे, त्या भागातील खेळाडूने पाण्याशी संबंधित खेळात नैपुण्य दाखवावे - काय हा योगायोग! FISA Asia and Oceania या स्पर्धेत त्याने रौप्यपदक मिळवले आहे. याआधीच्या आशियाई स्पर्धेतदेखील त्याने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. या जोरावरच त्याला राष्ट्रीय समितीने ऑलिम्पिकसाठी निवडले आहे आणि त्याच्याकडून पदकाची अपेक्षा आहे.

मागील आठवडयात रिओमध्ये त्याच्यावर दुर्दैवी प्रसंग ओढवला. पैशांअभावी त्याला रिओतील एका हॉटेलमधून बाहेर काढण्यात आले. या प्रकारानंतर महाराष्ट्र राज्य शासनाने त्याला 5 लाख रुपयांची मदत केली.