देशविरोधाचे निर्लज्ज समर्थन आणि खुलासे करण्यात सेक्युलॅरिस्टांना काही विशेष वाटत नाही. मानवतेचा द्रोह तर त्यांच्या आध्यात्मिक शौर्याचा भाग बनलेला आहे. त्यामुळे कोणालाही काफिर ठरवून गळे चिरायचे, गोळया घालून मारायचे, अंगावर गरम पाणी टाकायचे असले क्रूर आणि हिंस्र प्रकार चालले आहेत. इसिस आणि डॉ. झाकीर नाईक यांचे एकापेक्षा एक कारनामे समोर येत आहेत. महिलांच्याबाबत, पूजापध्दतीच्या स्वातंत्र्याबाबत, अभिव्यक्तीबाबत अत्यंत आक्षेपार्ह विधाने हे लोक धडधडीत करतात, त्याचे व्हिडिओ यू टयूबवर टाकतात; पण एरवी स्त्री-पुरुष समानता आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य याबाबत तावातावाने बोलणारे, बेंबीच्या देठापासून किंचाळणारे तमाम डावे, समाजवादी, मल्टीकम्युनल अगदी तोंडाला कुलूप लावून गप्प आहेत. निषेधाचा एक स्वर यांच्या तोंडातून निघत नाही. शहाबानो प्रकरणाच्या वेळी हेच घडले आणि देशातील जनमानस संतप्त होऊन राजकीय प्रवाहाला एकदम वेगळे वळण लागले. गोध्रानंतर एक वेगळी जागृती देशभर दिसली. आता झाकीर नाईक प्रकरणात सगळया भंपक आणि ढोंगी सेक्युलॅरिस्टांचा बुरखा टराटरा फाटला आहे.
भारतातील तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांनी एक अत्यंत चुकीचा समज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सतत रूढ केला. हिंदूंच्या विरोधात जे जे काही असेल ते ते सर्व सेक्युलर! अल्पसंख्याकांचे टोकाचे लांगूलचालन करणाऱ्यांनी त्याला आणखी एक जोड दिली. अल्पसंख्याकांना काहीही करण्याची मोकळीक देणे म्हणजे सेक्युलॅरिझम! या अतिशय आक्षेपार्ह, घाणेरडया वैचारिक मानसिकतेतून निष्पन्न झालेली विकृती म्हणजे डॉ. झाकीर नाईकसारखे लोक! इस्लामिक रिसर्च सेंटर या नावाखाली या महाशयाने जे भयंकर काम केले आहे, त्याचा परिणाम म्हणजे ढाका येथे झालेला दहशतवादी हल्ला. कुराणाचे आयत म्हणायला सांगून जो चुकला त्याला तिथल्या तिथे ठार मारण्याचा निर्दयी हल्ला. हल्लेखोराने सांग्ाितले की मला प्रेरणा मिळाली ती डॉ. झाकीर नाईक याच्या भाषणातून!
डॉ. झाकीरची भाषा पाहा कशी सेक्युलॅरिस्टांना मोहात पाडणारी आहे. याच्या संस्थेचे नाव म्हणे इस्लामिक रिसर्च सेंटर!
इस्लामिक हे नाव दिले की सेक्युलरांच्या गळयातला ताईत होणार. रिसर्च या नावाखाली काहीही मनमानी संशोधन करण्याला मोकळीकच. या महाशयांनी एक टीव्ही चॅनल सुरू केले आहे. त्याचे नाव आहे पीस. एकदा पीस नाव दिले की मग काहीही नंगानाच घालायला मोकळे! ढोंगी आणि भंपक सेक्युलरांच्या जगात इस्लामिक, रिसर्च आणि पीस या शब्दांना सर्वाधिक वजन आहे, हे ओळखून डॉ. झाकीर याने हे शब्द निवडले आणि या शब्दांच्या आडून हिंसेचा, द्वेषाचा, पंथांध अतिरेकाचा जो वेडाचार केला आहे, तो अतिशय भयानक आहे.
झाकीर नाईक सतत मांडत असतो, त्यातील काही मते पाहा-
- मुस्लिमांना आपल्या गुलाम स्त्रियांशी शारीरिक संबंध ठेवण्याचार् पूण अधिकार आहे.
- मुस्लीम समाजात पत्नीला मारहाण करणे ही वाईट गोष्ट नाहीच.
- मौलवींनी आत्मघाती हल्ले करणे चुकीचे म्हटलेले नाही.
- कुराणाच्या मते समलैंग्ािक लोकांना ठार मारले पाहिजे.
- इस्लामिक देशात मुस्लिमांश्ािवाय अन्य धार्मिक स्थळे निर्माण करण्याची परवानगी नसलीच पाहिजे.
- सानिया मिर्झाने खेळताना गरीमा असलेले कपडेच वापरले पाहिजेत.
- मुलींना अशा शाळांमध्ये पाठविले पाहिजे की जेथे त्यांचा कौमार्यभंग होणार नाही.
- पाश्चिमात्य देश स्वातंत्र्याच्या नावाखाली आयाबहिणींना विकत आहेत.
- विवाहबाह्य संबंधात दगड मारून ठार मारले पाहिजे.
- मुस्लिमांनी अल्लाहश्ािवाय कोणाचीच मदत घेता कामा नये.
ही मते म्हणजे काय सेक्युलॅरिझम आहे? सेक्युलॅरिस्टांना ही मते मान्य आहेत? हा काय शांततेचा संदेश आहे? हे विषवमन करायला कसला लागतो डोंबलाचा रिसर्च? एरव्ही खुट्ट वाजले की हिंदूंना श्ािव्याशाप देणारे, शहाणपणा श्ािकविणारे, आक्षेप घेणारे इतके दिवस झाकीर नाईक रोज विष ओकत होता तेव्हा मूग ग्ािळून गप्प का बसले होते?
कोण आहे हा डॉ. झाकीर नाईक? याचे कारनामे कुठपर्यंत पोहोचले आहेत? हे पाहिले, तर भारतातील भंपक सेक्युलॅरिस्टांच्या सुपीक वातावरणात मानवतेचे शत्रू कसे तयार झाले आहेत ते लक्षात येते.
हे महाशय मुंबईत 1965मध्ये जन्मलेले आहेत. त्यांनी एमबीबीएस पदवी मिळविल्याने डॉक्टर हे बिरुद लावले आहे. मात्र वैद्यकीय व्यवसाय न करता धर्मगुरू होण्याचा धंदा बरा आहे, असे पाहून ते तिकडे घुसले आहेत. इस्लामिक रिसर्च सेंटर या नावाखाली यांची द्वेष पसरविण्याची फॅक्टरी चालू आहे. फेसबुकवर यांचे एक कोटी 14 लाख फॉलोअर्स आहेत. इस्लाम, रिसर्च, पीस या नावाने काम केल्यावर बारा खून माफ आणि दहा दिशा मोकळया, अशी भारतीय सेक्युलॅरिस्टांची तऱ्हा असल्याने या महाशयांची मनमानी वाढतच गेली आहे. भारतात जरी मोकळीक असली, तरी जगातल्या लोकांनी यांचा धोका ओळखला. इंग्लंड, कॅनडा, मलेश्ािया अशा पाच देशांत डॉ. झाकीर नाईक यांच्यावर बंदी आहे.
आता पीस म्हणजे शांतता या नावाने चालणाऱ्या या डॉ. झाकीर याच्या टीव्ही वाहिनीवर काय तारे तोडले जातात, त्याचे नमुने पाहिले तर हे किती भयंकर प्रकरण आहे ते लक्षात येते.
या पीस टीव्हीचा प्रमुख आहे इसरार अहमद. हा माणूस सतत या चॅनलवरून भडक विषवमन करत असतो. 'जे लोक इस्लाममधून बाहेर गेले आहेत आणि नव्या पंथाचा प्रचार करत आहेत त्यांना शरियत नुसार ठार मारले पाहिजे.' पाहा यूटयूबवर -
डॉ. झाकीर नाईक म्हणतो की ''जेवढे गैरमुस्लीम आहेत, ते सगळे नरकात जाणार आहेत. अगदी मदर टेरेसासुध्दा. आणि मुस्लीम दहशतवादी ओसामा बिन लादेन याला मात्रर् स्वगातील जागा पक्की आहे.'' पाहा -
त्याच्या धार्मिक सत्तेत कोणी गैरमुस्लीम धर्मप्रचार करूच शकत नाही. तो मात्र तुमच्या लोकशाही शासनात प्रचार करणार, सत्ता मिळविणार आणि नंतर इतरांना प्रचार करू देणार नाही. पाहा -
हा झाकीर नाईक स्त्री-पुरुष समानतेचा शत्रूच आहे. त्याच्या मते 'महिला - विशेषत: मुस्लीम नसलेल्या महिला बेवकूफ, शातीर आणि उपद्रवी असतात. त्यांना चोपले पाहिजे. एक व्यक्ती चार महिलांशी लग्न करू शकतो. महिलांना रखेल, सेक्स गुलाम केले पाहिजे. इतके करूनही या महिला नरकातच जाणार आहेत.' पाहा -
दुसऱ्या धर्माच्या देवतांची टिंगल उडविणे, त्यांना अपमानित करणे असे हा माणूस सररास करतो.
पीस टीव्ही नावालाच पीस टीव्ही आहे. प्रत्यक्षात या वाहिनीवरून तथाकथित विद्वान मुस्लीम नसलेल्या लोकांना मारण्यासाठी चिथावणी देत असतात. या टीव्हीचा प्रमुख इसरार अहमद म्हणतो, ''अहमदियों/कादियानियों को कतल करो क्योंकि वे अब वफादार नहीं रहे, धर्म से ग्ािर चुके इन लोगों को मार दो।'' पाहा -
वंदे मातरम्ला विरोध करणे तर पीस टीव्हीवर सररास चालते. पीस टीव्हीचा प्रमुख वक्ता इसरार अहमद म्हणतो की, ''पाकिस्तान और अफगानिस्तान से गाजियों के लश्कर मिलकर हिंदुस्तान में खिलाफत लाने के लिए जल्द ही हमले करेंगे। यह खुदाई बात है और होकर रहेगी।'' पाहा -
आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेशी, तसेच मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदशी पीस टीव्हीचा संबंध आहे. या टीव्हीच्या प्रमुखाच्या संघटनेच्या कार्यक्रमात आयएसआयचे हमीद गुल, हाफीज सईद भाषण करताना यूटयूबवर दिसले आहेत.
या असल्या कारनाम्यांमुळे या पीस टीव्हीला अनेक देशांत बंदी घातलेली आहे. भारतात परवाना न काढताच या वाहिनीचे प्रसारण चालू होते. बंदी असली तरी या वाहिनीवरील कितीतरी आक्षेपार्ह प्रसारणे यूटयूबवर सररास टाकली जातात. दहशतीचा प्रचार होतच राहतो.
याच प्रकारची भाषणे यूटयूबवर ऐकून प्रभावित होऊन ढाका येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यातील मारले गेलेले दोन दहशतवादी निब्रास इस्लाम आणि रोहन इम्तियाज हे झाकीर नाईक यांची भाषणे ऐकून भडक र्मागावर होते. इम्तियाजने गेल्या वर्षी झाकीरचे एक भाषण फेसबुकवर शेअरही केले होते. हैदराबादमध्ये तपास यंत्रणांनी इसिसच्या दहशतवाद्यांना पकडले, तेव्हा त्यांनीही झाकीरच्या भाषणांमुळे प्रेरित झाल्याचे सांग्ाितले होते.
ढाका येथील या दहशतवाद्यांनी झाकीर नाईक याचे नाव घेताच जोरदार चर्चा सुरू झाली. कोण हे झाकीर नाईक? असा प्रश्न लोकांना पडला. वास्तविक झाकीर नाईक आणि दहशतवादी हा संबंध काही आताच समोर आलेला नाही. मात्र आपल्या देशात ढोंगी आणि भंपक सेक्युलॅरिस्टांनी जो टोकाच्या पक्षपाताचा आणि लांगूलचालनाचा राक्षस उभा केला आहे, त्यामुळे झाकीरकडे दुर्लक्ष करण्यात आले. 2007मध्ये ग्लासगो हल्ल्यातील आरोपी सबील अहमद यानेही आपण झाकीर नाईकच्या भाषणाने प्रेरित झाल्याचे सांग्ाितले होते. मात्र तेव्हाच्या काँग्रेसच्या ढोंगी मल्टीकम्युनल सरकारने कुठलीच कारवाई केली नाही. 2013मध्ये झाकीर नाईकने गणेशोत्सवाच्या वेळी आक्षेपार्ह भाषण केल्याने त्याच्या विरोधात वेंगुर्ला, कुर्ला, सावंतवाडी येथे गुन्हे दाखल झाले होते.
डॉ. झाकीर नाईक हे प्रकरण या देशातील ढोंगी आणि भंपक धर्मनिरपेक्षतेवर झगझगीत प्रकाश टाकणारे आहे. आधीच मर्कट तशात मद्य प्याला या धर्तीवर सांगायचे झाल्यास,
आधी मुस्लीम, तशात रिसर्चचे नाव
तशातही विद्वान नाव लागले तयाला
दहशतवादी बंधू जया सोबतीला
अशी या झाकीरची अवस्था आहे. हिंदूंना श्ािव्या देत कोणी निघाला की या देशातील कथित डावे आणि समाजवादी यांना त्याच्याबद्दल प्रेमाचे भरते येते. माध्यमे तर त्याला विद्वान म्हणून डोक्यावर घेतात. मग तो देशाच्या, मानवतेच्या, नीतिमूल्यांच्या विरोधात नंगानाच जरी करत असेल, तर त्याला सर्व काही माफ असते. त्याने कितीही देशद्रोही चाळे केले, तरी त्याला कोणी काही बोलायचे नाही. त्याच्या विरोधात कोणी नर्िदशने करील, कोणी घोषणा देईल तर हे तमाम भंपक मल्टीकम्युनल बेंबीच्या देठापासून अभिव्यक्तिस्वातंत्र्याबाबत शंख करू लागतात. त्यात जर भाजपासारख्या हिंदुत्ववादी पक्षाचे सरकार असेल, तर मग त्याचा संबंध सरकारशी जोडून सरकारमधील लोकांचे राजीनामे मागण्याची, पुरस्कार परत करण्याची यांची शर्यत सुरू होते. यांच्या अशा थयथयाटामुळे काळ सोकावतो. दहशतवाद्यांचे आणि त्यांना हवा देणाऱ्या झाकीर नाईकसारख्या लोकांचे भलतेच फावते. यांचा देशविरोधी आणि मानवताविरोधी नंगानाच सुखनैव चालूच राहतो. डॉ. झाकीर नाईक याचे बिंग फुटल्यावर काँग्रेसचे महासचिव दिग्विजयसिंह यांनी झाकीर नाईक यांच्याबरोबर कार्यक्रम केल्याचे पुढे आले. 2012मध्ये हे दोघे एका परिसंवादात एकत्र होते. त्या वेळी दिग्विजयसिंह यांनी झाकीर नाईक याला शांतिदूत अशी पदवी दिली होती! जे जे देशविरोधी, हिंदुत्वविरोधी असतील, ते कोण आहेत आणि त्यांचे कारनामे काय आहेत, हे न पाहता दिग्विजयसिंह तिथे इमानेइतबारे जाऊन त्यांची भलामण करणार, हे ठरलेलेच आहे. दिग्विजयसिंह यांचे हे जुने संबंध बाहेर येताच महाशय ''झाकीर नाईक यांच्या विरोधात पुरावे असतील, तर त्यांच्यावर कारवाई करावी'' असे म्हणून मोकळे. म्हणजे पुराव्याबद्दल, हा झाकीर नाईक देशविरोधी असल्याबद्दल यांना अजून शंकाच आहे. सुधारणावादी मुस्लीम विचारवंतांनी आता झाकीर नाईकपासून सावध राहण्याची मुस्लीम तरुणांना सूचना केली आहे. दहशतवाद्यांच्या जबानीतून झाकीर नाईकचे हे बिंग फुटल्यानंतर चर्चा सुरू झाली. हा माणूस त्या वेळी दक्षिण आफ्रिकेत होता. भारतात परत आलो तर आपल्याला अटक होईल, या भीतीने हे महाशय परत आलेच नाहीत. आता हा झाकीर नाईक म्हणे त्याच्यावरील आरोपांबाबत खुलासे करणार आहे.
भारतात सेक्युलॅरिझमच्या नावाखाली एकतर्फी बहुजातीयवाद (मल्टीकम्युनॅलिझम) पोसला गेला आहे. हिंदुत्वाचा द्वेष करणाऱ्या लोकांनी सर्वधर्मसमभाव, सेक्युलॅरिझम, धर्मनिरपेक्षता या शब्दांचे अर्थच बदलून टाकले आहेत. या शब्दांचा भावार्थ व्यवहारात पार उलटा केला आहे. फक्त हिंदू, हिंदुत्व आणि हिंदुत्ववाद यांना श्ािव्या देईल तो सेक्युलर, फक्त अहिंदूंची बाजू घेणे म्हणजे सर्वधर्मसमभाव असे या लोकांनी वैचारिक दहशतवाद आणत रूढ केले आहे. आता पाणी डोक्यावरून चालले आहे. हिंदुत्वाच्या द्वेषापोटी अशा प्रकारच्या नकारात्मक विचारांचे फाजील लाड केल्याने ही मंडळी देशविरोधी कारवाया करण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. देशद्रोह करण्यात त्यांना काहीच गैर वाटत नाही. त्या देशविरोधाचे निर्लज्ज समर्थन आणि खुलासे करण्यात त्यांना काही विशेष वाटत नाही. मानवतेचा द्रोह तर त्यांच्या आध्यात्मिक शौर्याचा भाग बनलेला आहे. त्यामुळे कोणालाही काफिर ठरवून गळे चिरायचे, गोळया घालून मारायचे, अंगावर गरम पाणी टाकायचे असले क्रूर आणि हिंस्र प्रकार चालले आहेत. इसिस आणि डॉ. झाकीर नाईक यांचे एकापेक्षा एक कारनामे समोर येत आहेत. महिलांबाबत, पूजापध्दतीच्या स्वातंत्र्याबाबत, अभिव्यक्तीबाबत अत्यंत आक्षेपार्ह विधाने हे लोक धडधडीत करतात, त्याचे व्हिडिओ यूटयूबवर टाकतात; पण एरवी स्त्री-पुरुष समानता आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य याबाबत तावातावाने बोलणारे, बेंबीच्या देठापासून किंचाळणारे तमाम डावे, समाजवादी, मल्टीकम्युनल अगदी तोंडाला कुलूप लावून गप्प आहेत. निषेधाचा एक स्वर यांच्या तोंडातून निघत नाही. शहाबानो प्रकरणाच्या वेळी हेच घडले आणि देशातील जनमानस संतप्त होऊन राजकीय प्रवाहाला एकदम वेगळे वळण लागले. गोध्रानंतर एक वेगळी जागृती देशभर दिसली. आता झाकीर नाईक प्रकरणात सगळया भंपक आणि ढोंगी सेक्युलॅरिस्टांचा बुरखा टराटरा फाटला आहे. मल्टीकम्युनलांच्या ढोंगामुळे देशाला आणि मानवतेला असलेला धोका समोर आला आहे. आता सर्वसामान्य माणसाने सावध होण्याची गरज आहे. कोण उदार आणि कोण संकुचित, कोण पुरोगामी आणि कोण प्रतिगामी, कोण देशभक्त आणि कोण देशहिताचा सौदा करणारे, कोण मानवतावादी आणि कोण हिंस्र लोकांचे निर्लज्ज समर्थन करणारे हा फरक ओळखून प्रतिगामी, लाचार, संकुचित, देशविरोधी, मानवताविरोधी शक्तींना धडा श्ािकविण्याचा निश्चय केलाच पाहिजे. झाकीर नाईकसारखे समाजजीवनातील व्हायरस आणि त्यांना पाठीशी घालणारे राजकीय, सामाजिक भंपक लोक यांना वेळीच ओळखून प्रभावहीन केले पाहिजे.
9422202024
dilip.dharurkar@gmail.com