Enter your Email Address to subscribe to our newsletters
’सेवांकुर भारत’ हे वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक भान जागृत करणारं कार्य मराठवाड्यात उभं राहिलं आहे. या अंकुराचा वटवृक्ष आता विस्तारत आहे. हा उपक्रम नक्की काय आहे आणि त्याचं काम कसं चालतं याचा धांडोळा या लेखात घेतला आहे. लेख दीर्घ असल्याने दोन भागांत विभागला आहे.
लोकशाहीविरोधी कम्युनिस्ट माओवादी संघटनांनी गेल्या पन्नास वर्षात हजारो सुरक्षारक्षक, पोलीस, जवान तसेच शेकडो दलित, आदिवासी बांधवांचे हत्याकांड केलेले आहे. आज केंद्र व राज्य सरकार जंगलातील माओवाद्यांच्या विरोधात अत्यंत कठोर कारवाई करत आहे. अनेक माओवादी शरण येत आहेत. विकासाच्या योजना राबविल्या जात आहेत. शहरातील जास्त धोकादायक समाजविघातक माओवादी, फुटिरतावादी गट मोकाट सुटू नये यासाठी विशेष जनसुरक्षा कायद्याची गरज आहे.
नेपाळमध्ये बहुपक्षीय लोकशाही राज्यव्यवस्था असली तरी गेल्या काही महिन्यांपासून तेथे पुन्हा राजेशाही पद्धत आणण्याच्या मागण्या जोर धरू लागल्या आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी (9 मार्च) नेपाळची राजधानी काठमांडू येथे राजेशाहीचा पुरस्कार करणार्या हजारोंच्या जमावाने दिलेल्या घोषणांनी आसमंत दणाणून गेल्याने त्याची चर्चा जगभरात झाली. नेपाळने राजेशाही व्यवस्था 2008 साली मोडीत काढली. एवढेच नव्हे तर राजघराण्याने आपला प्रासाद देखील रिकामा केला. त्यानंतर गेल्या सतरा वर्षांत नेपाळला ना आर्थिक स्थैर्य लाभले आहे ना राजकीय स्थ
गरीब मुस्लीम कुटुंबातील मुले मदरशात जाऊन शिक्षण घेतात. मात्र येथे देशातील इतर धर्मांतील नागरिकांना काफिर संबोधून द्वेषाचा पगडा मुलांवर निर्माण करून या माध्यमातून जिहादी मुसलमान घडविले जातात. हीच मुले पुढे दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होतात. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मदरसा शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची आणि बेकायदा मदरशांना जरब बसण्याची गरज आहे. त्यासाठी मोदी सरकारने पावलं उचलली आहेतच पण प्रत्येक राज्याने सर्वेक्षण करणं आवश्यक आहे.
ग्रोकचे गारुड सध्या भारतीयांवर आहे; पण एकदा त्यातील नावीन्य संपले की त्या गारुडाचा प्रभावही कमी होईल. प्रश्न ग्रोक की चॅटजीपीटी की डीपसीक एवढाच नाही. प्रश्न केवळ उजवी विचारसरणी की डावी विचारसरणी एवढयापुरता मर्यादितही नाही. प्रश्न व्यापक आहे आणि तो म्हणजे नित्यनूतन तंत्रज्ञानाच्या लाटांना सामोरे जाण्यासाठी समाजाला तयार कसे करायचे हा.
‘स्टँड अप कॉमेडी’च्या नावाखाली विचारदारिद्य्राचे प्रदर्शन मांडणार्या आणि विडंबनाच्या नावाखाली विटंबनेचा उद्योग आरंभलेल्या कुणाल कामरा याच्या आक्षेपार्ह वर्तनाचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्याचे नाव घेऊन निषेध करतो.
श्रीमद्भगवद्गीतेची एक शुद्ध आणि निर्दोष प्रत छापण्याच्या ध्यासापोटी 1923 साली सुरू झालेल्या आणि गेल्या शंभरांहून अधिक वर्षांच्या वाटचालीत केवळ गीतेच्याच नव्हेत, तर इतरही हिंदू धर्मग्रंथांच्या तब्बल 92 कोटी प्रती विकण्याचा विक्रम नोंदवणार्या ‘गीता प्रेस, गोरखपूर’ची यशोगाथा सर्व हिंदुत्वप्रेमी वाचकांनी मुळातूनच वाचायला आणि तपशीलवार समजून घ्यायला हवी आहे.
रामभेटीवाचून होणारी व्यथा सहन न होऊन भक्त रामालाच अत्यंत तळमळीने आतुरतेने विनवणी करीत आहे की, रामराया तू आता सिंहाप्रमाणे झेप घेऊन वेगाने धावत ये व मला या वासनांपासून सोडव, नाहीतर या वासना मला तुझ्यापासून दूर नेतील. रामराया धावून येईल यावर भक्ताचा दृढ विश्वास आहे.
सध्याच्या वैचारिक कोलाहलात लेखाचे शीर्षक वाचून काही लोकांना प्रश्न पडू शकतात. श्रद्धास्थानांचा गौरव म्हणजे काय, तर हा गौरवाचा भाव प्रत्येकाच्या मनात असतोच आणि हे श्रद्धास्थाने माणसाला जीवनात सर्वच दृष्टीने त्याचे उन्नयन होण्यासाठी प्रेरणा देत असतात आणि त्याच्या मनात आत्मगौरवाचा भाव जागृत करीत असतात. प्रेरणादायक स्मृतिस्थाने देखील कमीअधिक प्रमाणात हेच कार्य करीत असतात, मात्र हे प्रमाण अधिक वाढण्यासाठी त्या स्मृतिस्थानांचे काळजीपूर्वक योग्य प्रकारे उचित संवर्धन करण्याची गरज असते.
HMPV या आजाराची भिती ओसरत असतानाच GBS म्हणजे गिलान बार या आजाराचा उद्रेक झाला आहे. याविषयी सर्वात महत्त्वाची म्हणजे, वैद्यकीय क्षेत्राला गेली अनेक दशके या आजाराविषयी माहिती आहे. मात्र हा आजार संसर्गजन्य नसल्याने तसेच हा दुर्मिळ आजार असल्याने या आजाराचा उद्रेक होणे ही घटना नवी आहे. यानिमित्त अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, मात्र एकजुटीने आणि वैज्ञानिक पद्धतीने त्याचा प्रतिकार करायला हवा.
HMPV व्हायरसची बातमी चीनच्या कोणा एका व्यक्तीने ट्वीट केली, ही एवढी एकच बाब सर्व मीडियाच्या ओव्हर रिअॅक्शनला कारणीभूत ठरली. HMPV च्या बातम्या सर्वच मीडियाने उलटसुलट रंगवल्या. या बातम्यांमुळे भीतीचे सावट निर्माण झाले. खरं तर HMPV या विषाणूमुळे कोणताही धोका नाही. गरज आहे ती काळजी घेण्याची.
केवळ रोग, आजार, विकार नव्हे, तर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक घटकदेखील आरोग्यावर परिणाम करतात. त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये केवळ वैद्यकीय सेवा न पुरवता सामाजिक प्रश्नांची उकल लक्षात घेऊन श्री गुरुजी रुग्णालयामार्फत सामाजिक कार्य करण्यात येते. एक सुदृढ, निरामय समाज घडावा यासाठी ही चळवळ सुरू आहे. म्हणूनच नाशिक जिल्हा व परिसरात अल्प दरात उत्तम, दर्जेदार आरोग्यसेवा मिळविण्यासाठी श्री गुरुजी रुग्णालयाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. सर्वसामान्य जनतेला आधार व दिलासा देण्याचे काम येथे सातत्याने करण्यात येते.
कमल ग्रुप्सअंतर्गत जनजागृती ‘पे बॅक टू सोसायटी’ या संकल्पनेतून मुलींना आरोग्य आणि मासिक पाळी याविषयी शाळा-शाळांतून मार्गदर्शन करणार्या डॉ. उन्नती शिंदे हिच्या निःस्वार्थी वृत्तीचा आणि समाज निरोगी ठेवण्याच्या कार्याचा घेतलेला आढावा.
शेतकर्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, फळ व भाजीपाल्याचे काढणीपश्चात नुकसान कमी करणे व त्यांची साठवणूक क्षमता वाढविणे, मागणीनुसार मालाची मूल्यवृद्धी करणे व त्यासाठी शेतकरी उत्पादक संस्था व कंपन्यांची मूल्यसाखळी विकसित करण्याकरिता महाराष्ट्र राज्यात सहकार विभाग, पणन वस्त्रोद्योग विभागाच्या मदतीने व आशियाई विकास बँकेच्या आर्थिक सहकार्याने ’महाराष्ट्र व्हिजन 2030’ नुसार अर्थसाहाय्यित ’महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) हा विकासाभिमुख प्रकल्प राबविण्यात येत आहे.
मधमाशा हे पृथ्वीवरील परागीकरणाचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. फळधारणेसाठी मधमाशीपालन अत्यंत उपयोगी आहे. वनस्पतींची जैवविविधता टिकवून ठेवण्यातही मधमाशांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे शेतीचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर मधमाशीपालन हा एक समर्थ पर्याय आहे.
देशी गोवंश आधारित सेंद्रिय शेतीची मुहूर्तमेढ रोवणारे, ऋषी-कृषी तंत्र विकसित करणारे आणि सर्वसामान्य शेतकर्यांना देशी गायी पाळण्यास प्रवृत्त करणारे गो-कृषी संशोधक मोहन देशपांडे यांचे कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या विचारांचे, कार्याचे स्मरण...
स्वयम् शिक्षण प्रयोग (एसएसपी) ही स्वयंसेवी संस्था महाराष्ट्रासह सात राज्यांत कृषी, जलस्वच्छता, ग्रामविकास, महिला सक्षमीकरण आदी क्षेत्रांत भरीव कार्य करत आहे. विशेषतः ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना व्यवसाय व उद्योजकतेचे संस्कार दिले आहेत. या माध्यमातून असंख्य महिला स्वयंसिद्वा झाल्या आहेत.
ऑस्ट्रेलियातील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघाने मिळवलेलं हे यश आहे. या दोन अपयश आणि यशांमध्ये तुलना नाही होऊ शकणार. ऑस्ट्रेलियातील कामगिरीनंतर झालेली चर्चा एकदम थांबणार आहे. रोहित आणि विराट आणखी किती काळ भारतीय संघात खेळणार? विराट जून महिन्यांत इंग्लंड दौर्यावर जाणार हे जवळ जवळ नक्की आहे. पण, रोहितला ती संधी मिळणार का? ही चॅम्पियन्स करंडकानंतर तो निवृत्तीचा निर्णय जाहीर करणार? रोहितनंतर संघाचं एकदिवसीय आणि कसोटीतील नेतृत्व नेमकं कुणाकडे जाणार? मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांच्या कामगिरीचं मूल्यमाप
यंदाची 24 वी राष्ट्रीय वनवासी खेलकूद प्रतियोगिता छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे 27 ते 31 डिसेंबर या कालावधीत संपन्न झाली. या स्पर्धा म्हणजे प्रचंड ऊर्जेने भारलेला क्रीडा महोत्सव असतो. तिरंदाजी आणि फुटबॉल या दोन प्रकारांमध्ये यंदाची स्पर्धा झाली. यानिमित्त वनवासी क्षेत्रातील युवकांची खेळामधील प्रतिभा शोधतानाच त्यांना राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवणे आणि खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता दृढ करणे हे वनवासी कल्याण आश्रमाचे प्रमुख उद्दिष्ट साकार होत आहे.
12 डिसेंबर 2024. भारताच्या बुद्धिबळ इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद करावी असा दिवस. 11 वर्षांनी भारताला पुन्हा एकदा बुद्धिबळाचा जगज्जेता मिळाला. अठरा वर्षांच्या गुकेशने हा पराक्रम केला. जगज्जेतेपदापर्यंतचा गुकेशच्या प्रवासाचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.
हंगेरीतील बुडापेस्ट येथे नुकत्याच पार पडलेल्या चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. दोन सांघिक आणि चार वैयक्तिक सुवर्णपदकांची कमाई भारताने या स्पर्धेत केली. या लेखात आपण जाणून घेणार आहोत या स्पर्धेबद्दल तसेच भारताच्या बुद्धिबळातील यशस्वी वाटचालीबद्दल.
ज्येष्ठ संघप्रचारक, विश्व विभाग प्रमुख डॉ. शंकरराव तत्त्ववादी यांचे नुकतेच निधन झाले. अनेक देशातील त्यांच्या कार्यामुळे, आज हिंदू स्वयंसेवक संघ 50हून अधिक देशांमध्ये सक्रिय आहे. काही कार्यक्रम विश्व विभागासाठी मैलाचे दगड सिद्ध झाले. विश्व विभाग संयोजक सौमित्र, विश्व विभाग सह-संयोजक डॉ. राम वैद्य आणि विश्व विभाग सह-संयोजक अनिल वर्तक यांनी शंकररावजी सोबतच्या आठवणींना उजाळा प्रस्तुत लेखातून दिला आहे.
डॉ. दत्ता नाईक सरांनी कधीही बडेजाव केला नाही. ‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’ असे जीवन ते जगले व शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांनी प्रेरणा व विश्वास दिला. सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला जीवनाचा मंत्र दिला. त्यांच्या स्मृतीस अभिवादन!
ज्येष्ठ संघप्रचारक श्री. शंकरराव तत्त्ववादी यांच्या निधनाने संघ-क्षितिजावरील एक देदीप्यमान तारा निखळला आहे. 1987 ला शंकरराव पूर्णकालीन संघप्रचारक निघाले. प्रारंभी, विदेश विभागात इंग्लडमधील संघ दृढ करण्याचे दायित्व त्यांच्यावर आले. 1994 ते 2012 असे सलग 18 वर्षे शंकरराव, ’विश्व विभाग प्रमुख’ म्हणून काम बघत होते. या काळात 50 पेक्षा अधिक देशात त्यांचा प्रवास होत असे. विदेशातील कित्येक कुटुंबांना शंकरराव आपल्याच परिवारातील घटक वाटत. एवढी आत्मीयता त्यांनी घराघरांत निर्माण केली होती .
क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीशकाका प्रभुणे यांचे चिरंजीव व प्रसिद्ध चित्रकार मुकेश प्रभुणे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज निधन झालेे. निधनसमयी त्यांचे वय 49 वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आईवडिल, भाऊ, बहिण असा परिवार आहे.
आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि श्रीगुरुजी गोळवलकर या दोन विभूतींनी संघभाव कसा जगला, याचे सखोल चिंतन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक रमेश पतंगे यांनी या पुस्तकातून केले आहे.
संस्था हा संघकामाचाच एक भाग आहे, याचे भान नानांनी कधी सोडले नाही. म्हणून मीपणाचा लोभ, सामूहिक निर्णय प्रक्रिया, राष्ट्रभक्तीचा भाव असे सगळे विषय त्यांनी प्रत्येक संस्थेत रुजविले. नानांनी जो उपक्रम हाती घेतला, तो सक्षम कार्यकर्त्यांच्या हाती सोपविला आणि दुसर्या उपक्रमात रममाण झाले.
विनिता तेलंग लिखित लतादीदींनी गायिलेल्या नवरसांवरील गाण्यांच्या रसास्वादाचे पुस्तक… साहित्य, संगीत क्षेत्राची आवड असलेल्यांसाठी खास मेजवानी…
पालावरचं जिणं या पुस्तकातून पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी भटके-विमुक्त समाजाचे जीवन समाजापुढे आणले आहे.
‘विवेक प्रकाशन’ गेली अनेक वर्षे राष्ट्र व समाजोपयोगी विषयांवर अभ्यासपूर्ण अशी पुस्तके प्रकाशित करीत असतेच. त्याशिवाय मानवाचे आरोग्य व्यवस्थित असेल तर समाज निरोगी राहू शकेल, या भावनेने योगाचार्य मनोज पटवर्धन यांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. यंदाच्या योग दिनानिमित्त योगाचार्य मनोज पटवर्धन यांचे ‘प्राणायाम - एक अमृतानुभव’ हे पुस्तक प्रकाशित करीत आहे. याच पुस्तकातील ही प्रस्तावना.
‘पुत्र ज्ञानदेवतेचा’ या गौरवग्रंथाच्या रूपाने बाळशास्त्रींच्या कर्तृत्वाचा पट वाचकांसमोर प्रस्तुत होत आहे. संपादक आशुतोष अडोणी यांनी प्रस्तुत ग्रंथाच्या प्रस्तावनेतून बाळशास्त्रींच्या विचारांचे सूत्र आणि चिंतनाची व्यापकता यांचे उत्कृष्ट विवेचन केले आहे.
अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा प्रसिद्ध देशांवर अनेक प्रवासवर्णने वाचायला मिळतात; पण एक असा देश ज्याबद्दल मी तरी फारशी पुस्तके बघितली नाहीत. ते नाव म्हणजे नायजेरिया. हे नुसतंच प्रवासवर्णन नाही, तर ही लेखकाची एक छोटीशी कहाणी आहे. फारसा नावारूपाला न आलेला असा हा नायजेरिया. लेखक राजेश कापसे यांनी आरोग्य विभागातील नोकरी करून तिथली माणसं, परंपरा, चालीरीती समजून घेऊन हे पुस्तक लिहिले आहे.
"Hindus in Hindu Rashtra" या पुस्तकात काश्मिरी हिंदूंवर झालेला अन्याय, 1995 वक्फ कायदा, शिक्षण क्षेत्रातील घटना दुरुस्तीचा हिंदू शाळांवर झालेला परिणाम, देशात कशा प्रकारे हिंदूंवर अन्याय झाला आहे. याची पुराव्यानिशी मांडणी लेखकांनी केली आहे भारतात हिंदू बहुसंख्याक (तेही विभागलेले) असले, तरी जगात अल्पसंख्याक आहेत. अत्यंत छोट्या पण हिंदूंच्या डोळ्यात अंजन घालणार्या पुस्तकाविषयी...
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.
‘केशवार्पण’ हे पुस्तक म्हणजे प्रकल्प चालवणारे कार्यकर्ते आणि लाभार्थी यांच्या भावबंधनाचे अप्रतिम चित्रण आहे. यानिमित्त प्रकल्पाच्या मूळ प्रेरणेचे आणि त्या प्रेरणेला मध्यवर्ती ठेवून कार्य करणार्या कार्यकर्त्यांच्या मनोभावाचे दर्शन झाले आहे. आपल्या आसपास दिसणार्या समस्यांवर शोधलेले उत्तर म्हणजे हे प्रकल्प आहेत. त्यांचे स्वरूप कमी-जास्त असेल, पण त्यामागची भावना उदात्त आहे, हे या पुस्तकातून लक्षात येते.
प्रयागराज कुंभमेळ्यात सर्व काही अद्भुत आहे. डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. त्यातून विराट हिंदू राष्ट्राचे दर्शन घडत आहे. मराठीत एक म्हण आहे, ‘मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’, त्याचप्रमाणे महाकुंभात गेल्याशिवाय आणि डुबकी मारल्याशिवाय आनंद कळणार नाही! त्यामुळे मनात किंतुपरंतु न ठेवता महाकुंभात अवश्य जा! त्रिवेणी संगमात डुबकी मारा. प्रत्यक्ष कुंभमेळ्याचा अनुभव कथन करणारा लेख...
हिंदू समाज सेवा हाच धर्म मानणारा आणि प्रसिद्धीपराङ्मुख होऊन कृती करणारा आहे. भारताच्या समृद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन आणि त्या माध्यमातून अखंड सेवाकार्य करणार्या संस्कृतीचे दर्शन नुकत्याच पार पडलेल्या ’हिंदू आध्यात्मिक सेवा फाऊंडेशन’ मेळाव्यात झाले. राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर मैदान, गोरेगाव येथे सलग चार दिवस दि. 9 ते 12 जानेवारीपर्यंत हा मेळावा संपन्न झाला.
मनुष्यप्राण्यांचे समूहीकरण म्हणजे समाज होय. समाजाची स्वतःची अशी मूल्ये आणि विचार असतात. समाजाच्या या मौलिक गोष्टींचे जर विस्मरण झाले, तर समाजाची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही आणि समाजाचा एक घटक म्हणून व्यक्तिशः आपलीदेखील अधोगतीकडे वाटचाल सुरू होते. व्यक्तीला जसे मन असते तसे समाजालादेखील मन असते. त्याला समाजाची सदसद्विवेकबुद्धी असे म्हणतात. ही सदसद्विवेकबुद्धी समाज जेव्हा हरवून बसतो तेव्हा त्याची अवस्था अत्यंत वाईट होते. ही अवस्था म्हणजे आजचा हरवलेला महाराष्ट्र आहे. आजचा महाराष्ट्र हा वारसा हरवलेला महाराष्ट्र
श्रीराम मंदिराची उभारणी व घटनेतील 370 कलम रद्द करणे अशा एके काळी अशक्यप्राय वाटणार्या गोष्टी या सरकारने साध्य करून दाखविल्या, जिहादी दहशतवादावर नियंत्रण मिळविले, डाव्या व समाजवादी विचारप्रणालीमुळे दडपल्या गेलेल्या हिंदू इतिहास, परंपरा आणि गौरवस्थाने यांना महत्त्व प्राप्त करून दिले. तसेच गेल्या दहा वर्षांत कोणत्याही अन्य पक्षांनी केली नसतील एवढी विकासकामे या भाजप सरकारच्या काळात झाली. व्यावसायिक सर्वेक्षणापासून बूथ नियोजनापर्यंत सर्वत्र व्यावसायिकता आणली. या सर्व गोष्टी असतानाही व विरोधात पर्याय देण्यासाठी
आजच्या युगात कॉम्प्युटर सिस्टम्सशिवाय उद्योग चालवायची कल्पनाही अशक्य आहे. गेल्या दोन वर्षांत प्रचंड चर्चेत असलेलं एआय तंत्रज्ञान ही ह्याच बिझनेस सिस्टम्स वापराची पुढची पायरी आहे. दुर्दैवाने सगळ्या चर्चेचा रोख हा आता हे तंत्रज्ञान सगळ्या नोकर्या खाणार आणि प्रलय येणार असाच आहे. आज एआयचा उदोउदो बरोबर औद्योगिक उत्पादकता वाढवण्यासाठी ऑटोमेशनने आधीच आणि जास्त जोरात मुसंडी मारली आहे. खरं तर एआय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या सर्वांच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकतो. भीतीपोटी विरोध करण्यात किंवा ‘मला काय त्याच
माणसं निघून जातात आयुष्यातून. त्यांची आत्मचरित्रं अमर होतात. पुनःपुन्हा लोक वाचत राहतात. हरवलेलं शोधतात. कधी सापडतं, कधी नाही. प्रकाशाचे कवडसे दिलासादायक असतात. जिथून गोफ विणायला सुरुवात करतात तिथेच तो सुटावा म्हणून एक गाठ असते. ती सोडवता आली की गुंतागुंत होत नाही. आठवणींचा गोफ नक्षीदार असतो, त्यात रमावं.
लोकमान्यांनी बसवलेल्या गणपतीची नावे कशी बदलत गेली ?
‘हा’ गणपती आहे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक
…आणि लोकमान्य भावूक झाले
आकर्षक देखावे हे ‘या’ गणेशोत्सव मंडळाचे वैशिष्ट्ये